जेनिटल व्हार्टस काय आहे?
जेनिटल व्हार्टस हे, जननेंद्रियातील विषाणू मानवी पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) द्वारे हस्तांतरित झाल्याने होणारे लैंगिक संसर्गजन्य संक्रमण आहे. याच्या लक्षणांपैकी काही वेदना, अस्वस्थता आणि खाज येणे आहेत. यात पुरुष आणि महिला दोघांमध्ये जननेंद्रियाच्या क्षेत्राजवळ एक चामखीळ किंवा क्लस्टर बनतो. पुरुषांपेक्षा महिलांना हा रोग होण्याचा जास्त धोका असतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
जननेंद्रियातील व्हार्टस वेगवेगळ्या स्वरूपात वाढतात. जननेंद्रियातील व्हार्टसची सर्वसामान्य चिन्हे ही आहेत:
- लहान, विखुरलेले बंप्स (त्वचा फिकट किंवा गडद).
- जननांग क्षेत्रात बंप्सचा समूह.
- जननांगात खाज किंवा अस्वस्थता.
- संभोगानंतर वेदनेसह रक्तस्त्राव.
जेनिटल व्हार्टस खालील भागात दिसून येतात:
महिलांमध्ये:
- योनिमध्ये.
- योनी, गर्भाशय किंवा ग्रॉइन वर.
पुरुषांमध्ये:
- पुरुषाच्या जननेंद्रिया वर.
- स्क्रोटम, मांडीवर किंवा ग्रॉइनवर.
दोन्ही लिंगांमध्ये:
- गुदा मध्ये किंवा आसपास.
- ओठ, तोंड, जीभ किंवा गळ्यावर.
याची मुख्य कारणं काय आहेत?
जेनिटल व्हार्टसचे मुख्य कारण एचपीव्हीचा संसर्ग आहे. एचपीव्ही संक्रमित व्यक्तीपासून एका निरोगी व्यक्तीपर्यंत जेनिटल व्हार्टस पसरतो:
- लैंगिक संभोग (योनि, तोंडी, गुदा) - एचपीव्ही संक्रमित होण्याचा धोका अगदी लहान वयातच लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यामुळे किंवा अनेक भागीदारांसह असुरक्षित संभोग किंवा एखादा ज्याचा लैंगिक इतिहास ज्ञात नाही अशा असुरक्षित संभोगामुळे वाढतो.
- प्रसव (संक्रमित आईपासून नवजात मुलास).
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
त्वचारोग विशेषज्ञ शारिरीक तपासणीद्वारे व्हार्टचे आंशिकरित्या निदान करतात, एक वार्ट किंवा त्याचा भाग प्रयोगशाळेत पाठवून सूक्ष्मदर्शिकेखाली त्याचे परीक्षण करून याची पुष्टी केली जाते.
खालील औषधे त्वचारोग विशेषज्ञांद्वारे निर्धारित केली जाऊ शकतात:
- पॉडोफिलोटोक्सिन (वार्ट सेल्सच्या वाढीस थांबण्यासाठी).
- इमिकिमोड (एचपीव्हीशी लढण्यासाठी शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी).
कधी काही प्रक्रिया केली जाऊ शकते, ज्यात यांचा समावेश होतो:
- क्रायोसर्जरी (द्रव नायट्रोजन) व्हार्टस गोठवते.
- कापून किंवा शस्त्रक्रिया करून काढून टाकणे.
- इलेक्ट्रोकॉटरी (विद्युतीय प्रवाह) व्हार्टसचा नाश करतात.
- लेझर उपचार (लेझर लाइट) व्हार्टस नष्ट करतात.
जननांग व्हार्टसवर उपचार करण्याचा सर्वात महत्वाचे कारण म्हणजे एचपीव्ही संसर्ग गर्भाशयाच्या आणि योनिच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. एचपीव्ही विरूद्ध लसीकरण व्हार्टस तसेच कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.