व्हिटॅमिन बी 3ची कमतरता - Vitamin B3 Deficiency in Marathi

Dr. Anurag Shahi (AIIMS)MBBS,MD

May 02, 2019

October 28, 2020

व्हिटॅमिन बी 3ची कमतरता
व्हिटॅमिन बी 3ची कमतरता

व्हिटॅमिन बी 3ची  कमतरता म्हणजे काय?

सामान्यतः नियासीन म्हणून ओळखले जाणारे, बी3 हे  बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन पैकी एक आहे. हे पाण्यात-विरघळणारे व्हिटॅमिन आहे, याचा अर्थ ते शरीरात संग्रहित केले जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याचा आहारातून दररोज पुरवठा आवश्यक आहे. मानवी शरीरात व्हिटॅमिन बी 3 निर्माण होत नसल्यामुळे ते बाह्य स्रोतापासून अर्थात आहार किंवा पूरक पदार्थांमधूनच घेतले गेले पाहिजे. पेशींच्या चयापचयांना मदत करणाऱ्या महत्वाच्या एंझाइमच्या संश्लेषणासाठी हे एक आवश्यक व्हिटॅमिन आहे. त्वचा, पचन आणि मानसिक आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी 3 महत्वाचे आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

  • सौम्य व्हिटॅमिन बी 3 च्या कमतरतेमुळे किरकोळ लक्षणे आढळतात, उदा. अपचन, उलट्या, निराशा आणि थकवा.
  • एखाद्या व्यक्तीला तीव्र कमतरता असेल तर, पेलेग्रा नावाच्या  रोगासारखी लक्षणं आढळतात जी 3 डी च्या वर्णनाद्वारे ओळखली जाते, उदा.
    • त्वचारोग: त्वचेला खाज आणि दाह. सूर्यप्रकाशाशी संपर्क आणि डीएनएच्या नुकसानामुळे याचा परिणाम होतो.
    • डिमेंशिया: संज्ञानात्मक आणि व्यक्तिमत्वातील बदल.
    • जुलाब : वारंवार जाणारे पातळ मल.
  • काही अभ्यासांनुसार, व्हिटॅमिन बी 3 च्या कमतरतेमुळे कॅन्सरचा धोकाही वाढतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?

अपूर्ण आणि अयोग्य आहार घेण्यामुळे नियासीनची कमतरता येते. आयर्न, व्हिटॅमिन बी 2 आणि बी 6 ची कमतरता यामुळे नियासीनची कमतरता येते. दीर्घकाळ मद्यपान हे पेलेग्राचे प्रमुख कारण आहे. नियासीनच्या कमतरतेमुळे, शरीर ट्रिप्टोफान नावाच्या अमीनो ॲसिडचे संश्लेषण करू शकत नाही आणि त्याच्या संबंधित लक्षणे दिसू शकतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

व्हिटॅमिन बी 3 च्या कमतरतेचे निदान सोपा आहे आणि त्यासाठी चिन्हे आणि लक्षणे, जसे की त्वचा आणि तोंडातील फोड तसेच जुलाब आणि डिमेंशिया यांचा थोडक्यात इतिहास आवश्यक आहे. सामाजिक सवयींचा इतिहास जाणून घेणे, जसे मद्यपान, विषाणूजन्यमुळे विटामिन बी 3 च्या कमतरतेचे निदान केले जाते. प्रयोगशाळेच्या चाचणीमध्ये एन-मिथाइल निकोटीनामाइडच्या पातळीत झालेल्या घटकाचे मूल्यांकन करण्यासाठी मूत्र चाचणी समाविष्ट असते.

अनेक कमतरता सामान्य आहेत म्हणून उपचारांमध्ये बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिनच्या मौखिक पुरवणीसह व्हिटॅमिन बी 3 आहाराचा समावेश असतो. कमतरतेचा उपचार करण्यासाठी व्हिटॅमिन बी 2 आणि बी 6 पूरकांना सामान्यतः व्हिटॅमिन बी 3 बरोबर प्राधान्य दिले जाते. आहारात पुरुषांसाठी 16 मिलीग्राम / दिवसाची आणि महिलांसाठी 14 मिलीग्राम / दिवसाची व्हिटॅमिन बी 3 ची शिफारस केली जाते. मासे, मांस, धान्य (मका व्यतिरिक्त), दाणे आणि कडधान्य हे व्हिटॅमिन बी 3 चे चांगले स्रोत आहेत.

 



संदर्भ

  1. Mirella Meyer-Ficca,James B Kirkland. Niacin. Adv Nutr. 2016 May; 7(3): 556–558. PMID: 27184282
  2. Fekih-Romdhane F,Belkhiria A,Ridha R. Severe neuropsychiatric symptoms due to vitamin b3 deficiency. Presse Med. 2017 Jul - Aug;46(7-8 Pt 1):779-782. PMID: 28579011
  3. Ikenouchi-Sugita A,Sugita K. Niacin deficiency and cutaneous immunity. Nihon Rinsho Meneki Gakkai Kaishi. 2015;38(1):37-44. PMID: 25765687
  4. Peechakara BV, Gupta M. Vitamin B3. [Updated 2019 May 15]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
  5. National Institutes of Health; Office of Dietary Supplements. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Niacin.

व्हिटॅमिन बी 3ची कमतरता चे डॉक्टर

Dr. Narayanan N K Dr. Narayanan N K Endocrinology
16 Years of Experience
Dr. Tanmay Bharani Dr. Tanmay Bharani Endocrinology
15 Years of Experience
Dr. Sunil Kumar Mishra Dr. Sunil Kumar Mishra Endocrinology
23 Years of Experience
Dr. Parjeet Kaur Dr. Parjeet Kaur Endocrinology
19 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

व्हिटॅमिन बी 3ची कमतरता साठी औषधे

Medicines listed below are available for व्हिटॅमिन बी 3ची कमतरता. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.