व्हजायनल अट्रोफी काय आहे?
व्हजायनल अट्रोफी हा विकार बहुधा रजोनिवृत्ती च्या वेळी उद्भवतो, ज्यामध्ये योनीच्या उती चिन्हे दाखवण्यास सुरवात करतात जसे कि कोरडेपणा, पातळपणा आणि कधीकधी संसर्ग. रजोनिवृत्तीनंतरच्या शरीरातील ओएस्ट्रोजेन च्या कमी झालेल्या पातळीमुळे असे होते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
योनी अट्रोफी ची काही सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- असामान्य स्पॉटिंग किंवा रक्तस्त्राव किंवा इतर अनपेक्षित योनिस्राव.
- योनीमध्ये जळजळ किंवा खाजवणे.
- योनी कोरडी होणे.
- त्रासदायक संभोग क्रिया.
- वारंवार लघवी येणे, लघवीला वेदना होणे, वारंवार होणारा मूत्रमार्गातील संसर्ग (जर मूत्रमार्ग संसर्गित झाला असेल तर).
याची मुख्य कारणं काय आहेत?
व्हजायनल अट्रोफी मुख्यतः शरीरातील ओएस्ट्रोजेन ची मात्रा कमी झालेल्या महिलांमध्ये आढळतो जे पुढील कारणांमुळे होते:
- अंडाशय काढून टाकणे.
- गरोदरपणा.
- त्वरित बाळंतपणानंतर.
- स्तनपान.
- स्तनांच्या कर्करोगाच्या उपचारानंतर एरोमॅट्स इनहिबिटर्स सारखे औषधोपचार.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डॉक्टर रुग्णाचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास आणि योनीच्या तपासणीद्वारे अट्रोफीचे निदान करतात. शारीरिक तपासणीमध्ये आजार दर्शवत असलेली चिन्हे म्हणजे लाल, सुजलेली, कोरडी, लहान किंवा संकुचित आणि पांढरट व लवचिकता नसलेली योनी.
लक्षणे कमी करणे किंवा ओएस्ट्रोजेनचे प्रमाण कमी होण्याचे कारण शोधणे हे अट्रोफी व्यस्थापनाचे उद्दिष्ट असते आणि त्यासाठी हे केले जाते:
- लोशन्स व तेलाच्या साहाय्याने ओलावा निर्माण करून कोरडेपणा कमी करणे.
- योनी ल्युब्रिकंट्स चा उपयोग करणे.
- योनी जेल चा उपयोग करणे.
- संयोजी हार्मोन थेरपीसह डायलेटर्सचा उपयोग करणे जे निरोगी त्वचेसह योनी अट्रोफी चे लक्षणे वाढवतात. ही प्रक्रिया योनीतील सामान्य आम्ल स्तर पुन्हा स्थापित करून, नैसर्गिक ओलावा टिकवून, त्वचेचा घट्टपणा वाढवून आणि जिवाणूंचा समतोल वाढवून साध्य केली जाते.
हार्मोनल उपचारांमध्ये पुढील प्रक्रियांचा समावेश होतो:
- योनीची लोकल एस्ट्रोजेन थेरपी जी क्रीम स्वरूपात किंवा गोळ्या किंवा रिंग्स च्या स्वरूपात केली जाते आणि योनीच्या कोरडेपणाची लक्षणे कमी करते.
- सिस्टेमिक हार्मोन प्रतिस्थापन थेरपी उपयोगात आणली जाऊ शकते.