युरेथ्रायटीस म्हणजे काय?
मूत्रमार्गाचा दाह होण्याच्या परिस्थितीला युरेथ्रायटीस म्हणतात. बहुतेकवेळा हा जिवाणू संसर्गामुळे होतो. मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग, जो मूत्राशयापासून मूत्रमार्गाच्या टोकापर्यंत कुठेही पसरू शकतो, त्यापेक्षा हा संसर्ग वेगळा असतो. दोन्ही रोगांची लक्षणे जरी सारखी असली तरी त्याची उपचार पद्धत वेगवेगळी असते. युरेथ्रायटीस जरी सर्व वयोगटातील व्यक्तींना होत असला तरी पुरुषांपेक्षा स्त्रियांना याचा जास्त धोका संभवतो.
याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
काही सर्वसामान्य चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- लघवी करताना दाह होणे.
- लघवी करताना वेदना होणे.
- वारंवार लघवीस जावे लागणे.
- पोटात आणि ओटीपोटात वेदना होणे.
- ताप.
- सूज.
- संभोगादरम्यान वेदना होणे.
- स्त्रियांमध्ये व्हजायनल स्त्राव होणे.
- पुरूषांमध्ये पेनाईल स्त्राव होणे.
- पुरूषांच्या वीर्यातून आणि लघवीतून रक्त पडणे.
- पुरूषांमध्ये पेनीसला खाज येणे.
- पुरूषांमध्ये वेदनादायक वीर्यस्खलन.
स्त्रियांमधील चिन्हे आणि लक्षणे स्पष्ट समजून येत नाहीत.
याची प्रमुख कारणं काय आहेत?
युरेथ्रायटीस हा विविध कारणांमुळे होऊ शकतो जसे की:
- इजा.
- स्पर्मिसाईड्स किंवा कॉंट्रासेप्टीव्ह जेली आणि फोम्स.
- मूत्राशय आणि किडनीचा जीवाणू संसर्ग.
- अडिनोव्हायरस.
- ट्रायकोमोनास व्हजिनॅलीस.
- एस्चेरेशिया कोलायसारखे युरोपॅथोजेन्स.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सूज किंवा स्त्राव अशा काही लक्षणांसाठी डॉक्टर शारिरीक तपासणी करतात. सर्व तपासणी करून काही चाचण्या केल्या जातात त्या म्हणजे:
- युरेथ्राची तपासणी.
- स्वॅब घेउन त्याच्या नमुन्याची मायक्रोस्कोपमध्ये तपासणी करणे.
- सिस्टोस्कोपी - कॅमेरा असलेली ट्यूब मूत्राशयात घालून काही समस्या आहे का ते तपासले जाते.
- मूत्राची चाचणी.
- संपूर्ण ब्लड काउंट.
- शरीरसंबंधातून संक्रमित होणाऱ्या रोगांसाठी विशिष्ट चाचण्या.
- स्त्रियांमध्ये पेल्व्हिक अल्ट्रासाउंड.
निदान झाल्यावर रुग्णावर पुढील विविध प्रकारांनी उपचार केले जातात:
- जीवाणू संसर्गासाठी योग्य ती ॲंटीबायोटीक्स सुचविली जातात.
- नॉन स्टेरॉइडल ॲंटी इंफ्लॅमेटरी ड्रग्स वेदनाशामके म्हणून दिली जातात.
- भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असलेला क्रॅनबेरी रस रुग्णाला दिला जातो ज्यामुळे दाह कमी होण्याची प्रक्रिया जलद होते.