मूत्रमार्गाचा कर्करोग - Urethral Cancer in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 02, 2019

March 06, 2020

मूत्रमार्गाचा कर्करोग
मूत्रमार्गाचा कर्करोग

मूत्रमार्गाचा कर्करोग काय आहे?

मूत्रमार्गांच्या पेशींची अनियंत्रित आणि असंबद्ध वाढ म्हणजे मूत्रमार्गाचा कर्करोग. हा खूप दुर्मिळ आहे आणि यामुळे सामान्यतः, पुरुष प्रभावित होण्याची शक्यता अधिक असते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

काही सामान्य चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

  • मूत्रमार्गावर गाठ किंवा सूज येणे.
  • मूत्रातून रक्त जाणे.
  • वारंवार मूत्रविसर्जन.
  • कमकुवत मूत्र प्रवाह.
  • लघवी करताना त्रास किंवा वेदना होणे.
  • कमी मूत्र प्रवाह.
  • मूत्रमार्गातून स्त्राव वाहणे जो रक्तस्त्राव असू शकतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?

या कर्करोगाचे अचूक कारण अद्याप ज्ञात नाही. परंतु, याला कारणीभूत ठरणारे काही घटकं खालीलप्रमाणे आहेत:

  • यूरेट्रल डायव्हर्टिक्युलम.
  • मूत्रमार्गात तीव्र संसर्ग.
  • ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) संसर्ग.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

संभाव्य गाठी किंवा कोणतेही असामान्य चिन्ह बघण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी करतात. रुग्णाच्या आरोग्याचा इतिहास पूर्णपणे गोळा केला जातो. केल्या जाणाऱ्या काही चाचण्या खालीलप्रमाणे आहेत:

  • पेल्व्हिक परिक्षण - योनी, गर्भाशयाचे मुख, गर्भाशय, अंडनलिका, अंडाशय आणि गुदाशय दोषांची तपासणी करतात.
  • जंतुशास्त्रदृष्ट्या किंवा रासायनिकदृष्ट्या केलेले लघवीचे पृथकरण - मूत्रातील शुगर, प्रथिने, रक्त आणि पांढऱ्या रक्त पेशी आणि मूत्राचा रंग देखील तपासला जातो.
  • डिजिटल रेक्टल परिक्षण.
  • मूत्र सायटोलॉजी - बॅक्टेरियासाठी मायक्रोस्कोपिकरित्या मूत्र तपासले जाते.
  • पूर्ण रक्तपेशी गणना/ब्लड काउंट - लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्त पेशी, प्लेटलेट आणि हेमोग्लोबिनची गणना याद्वारे केली जाते.
  • रक्ताचा रसायनशास्त्र अभ्यास.
  • सीटी(सीटी) स्कॅन, एमआरआय(एमआरआय) आणि अल्ट्रासाऊंड.
  • यूरेट्रोस्कोपी - असामान्यपणासाठी कॅमेरा वापरुन मूत्रवाहक नलिका आणि मूत्रपिंडाच्या आतडीच्या आत योग्यरित्या पाहिले जाते.

निदानानंतर, रुग्णावर वेगवेगळ्या पद्धतींनी उपचार केले जातात. ते खालीलप्रमाणे आहेत:

  • शस्त्रक्रिया.
  • बायोप्सी.
  • रेडिओथेरपी - गामा आणि इतर किरणांचा वापर करून कर्करोग किंवा ट्यूमर पेशींना मारण्यात मदत करते.
  • किमोथेरपी - याद्वारे कर्करोगाच्या पेशींचा आणि त्यांच्या विभागातील वाढीचा विकास थांबतो किंवा त्यांना विशेष औषधे वापरुन विभागणी होऊ देत नाही.
  • सक्रिय देखरेख - याचा अर्थ चाचणी परीणामांमध्ये काही बदल नसल्यास, कोणतेही उपचार केले जाऊ शकत नाहीत. नियमित वेळेवर निरीक्षण आणि परीक्षण केले जाते.

 



संदर्भ

  1. National Institutes of Health; National Cancer Institute. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Urethral Cancer Treatment (PDQ®)–Patient Version.
  2. Urology Care Foundation [Internet]: American Urological Association. Linthicum, MD: What is Urethral Cancer?
  3. G. Gakis et al. EAU Guidelines on Primary Urethral Carcinoma European Association of Urology 2016
  4. University of Rochester Medical Center Rochester, NY; Urethral Cancer: Stages
  5. PDQ Adult Treatment Editorial Board. Urethral Cancer Treatment (PDQ®). : Health Professional Version. 2015 Jun 2. In: PDQ Cancer Information Summaries [Internet]. Bethesda (MD): National Cancer Institute (US); 2002-.

मूत्रमार्गाचा कर्करोग साठी औषधे

Medicines listed below are available for मूत्रमार्गाचा कर्करोग. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Medicine Name

Price

₹391725.0

₹277708.0

₹222166.0

Showing 1 to 0 of 3 entries