पोटात बिघाड म्हणजे काय?
पोटात बिघाड किंवा अपचन हा एक अंतर्निहित गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसऑर्डर दर्शविणारा एक विकार आहे. कोणत्याही कारणास्तव आंत किंवा पोटात झालेली जळजळ (गॅस्ट्रोएन्टेरायटिस) अपचनाचे कारण होऊ शकते. विशिष्ट औषधे, व्हायरस, प्रवासादरम्यान किंवा दूषित अन्नांमुळे अपरिचित जिवाणूंना तोंड द्यावे लागते त्यामुळे हा त्रास होऊ शकतो. जवळजवळ प्रत्येकालाच त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात किमान एकदातरी अपचनाचा अनुभव येतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
पोटात बिघाडाशी संबंधित मुख्य चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :
- उलट्या होणे किंवा मळमळणे.
- पोटात गुडगुडणे.
- थकवा.
- पोटात पेटके येणे.
- डोकेदुखी.
- ढेकर येणे.
- ताप आणि थंडी.
- अशक्तपणा.
- छातीत जळजळ.
- अतिसार.
- भूक कमी होणे.
- पोट फुगणे.
- तोंड आंबट होणे.
- पोटात वात होणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
पोटात बिघाडाचे मुख्य कारणं खालीलप्रमाणे आहेत:
- खातांना खूप जास्त हवा पोटात गेल्याने पोट फुगते व अपचन होऊ शकते.
- दूषित अन्न किंवा पाण्यामुळे संसर्ग, उदा. टायफॉइड, कॉलरा इ.
- पचन संस्था आणि आतड्यांमधील अल्सर.
- कॅफीनयुक्त पेये आणि अल्कोहोलचा वाढलेला वापर.
- धुम्रपान.
- दूषित अन्न न पचणे.
- ॲस्पिरिन - ॲस्पिरिन काही लोकांच्या पोटाच्या आतल्या भागात त्रासदायक ठरते
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
अल्सरसारख्या कोणत्याही मूलभूत कारणाची शक्यता फेटाळण्यासाठी डॉक्टर रुग्णाचा वैद्यकीय इतिहास जाणून घेतील. पोटाचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी आणि अपचनाचे कारण ओळखण्यासाठी डॉक्टर पोटाच्या एक्स-रेची शिफारस करू शकतात किंवा एन्डोस्कोपी (लाईट आणि कॅमेरा असलेले ट्यूब सारखे एक साधन) वापरू शकतात. आवश्यक असल्यास गॅस्ट्रोस्कोपीची शिफारस केली जाते.
पोटातील बिघाडाचा उपचार हा नियम मूलभूत कारणावर अवलंबून असतो. सामान्यत:, कोणतेही औषधे न वापरता पोटातील बिघाडाचे लक्षण काही तासातच कमी होतात. पोटातील बिघाडाचा इलाज करण्यासाठी द्रवपदार्थांचा आहार हा सर्वात शिफारसीय आहार आहे.
खालील सवयी टाळल्याने बिघडलेल्या पोटाला आराम मिळेल:
- मसालेदार अन्न खाणे.
- रात्री उशीरा जेवणे.
- जेवणानंतर निष्क्रियता चयापचय कमी करू शकते.
- जेवणा दरम्यान द्रव पिणे.
बिघडलेल्या पोटाचे कार्य सुधारण्यासाठी अँटीबायोटिक्स, अँटासिड्स, मळमळ आणि उलट्या नियंत्रित करण्यासाठी औषधे आणि अँटी-डायरियाल औषधे यांसारखा परिणामकारक औषधोपचार डॉक्टर देऊ शकतात.