वरील श्वसनमार्गाचा संसर्ग (यूआरटीआय) म्हणजे काय?
वरील श्वसनमार्ग ज्यामध्ये गळा, नाक आणि स्वरयंत्राच्या समावेश होतो, त्यास जिवाणू, बुरशी किंवा विषाणूंमुळे झालेल्या संसर्गास वरील श्वसनमार्गाचा संसर्ग असे म्हणतात. सायनसायटिस, र्हायनायटीस, लॅरिंजायटिस आणि फॅरेनजायटीस या संसर्गाचे सामान्य प्रकार आहेत. बहुतेक श्वसनसंसर्ग हे किरकोळ असतात पण काही प्रकरणांमध्ये वैद्यकीय उपचाराची गरज पडते, जर उपचार केला नाही तर हा संसर्ग गंभीर स्वरूपात वाढू शकतो. श्वसनमार्ग संसर्गासाठी सोपे ठिकाण आहे कारण तो नियमित हवेतील सूक्ष्मजीवांशी प्रत्यक्ष संपर्कात येतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
यूआरटीआयचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे हे त्यास कारणीभूत असलेल्या विषाणू किंवा जिवाणूंवर अवलंबून असतात. यूआरटीआयची काही सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- डोकेदुखी.
- चोंदलेले किंवा वाहते नाक.
- अंगदुखी.
- ताप.
- थकवा.
- थुंकीसह किंवा त्याशिवाय कफ.
- झोपण्यात व्यत्यय.
- शिंका येणे.
- घसा सुजणे.
- क्वचित प्रकरणांमध्ये छातीच्या वेदना.
याची मुख्य कारणं काय आहेत?
याची मुख्य कारणं पुढीलप्रमाणे आहेत:
- फ्ल्यू.
- सामान्य सर्दी.
- हंगामी ॲलर्जी किंवा वातावरणातील बदल.
- संसर्ग झालेल्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संपर्क.
- संसर्गजन्य शिंक किंवा खोकला ज्यामध्ये इन्फ्लुएंझा, ह्रायनोव्हायरसेस किंवा कोरोनाव्हायरस यांसारखे विषाणू असतात.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
बहुतेक यूआरटीआयचे निदान हे रुग्णाच्या लक्षणांवरून केले जाते. रॅपिड अँटीजेन संशोधन चाचणी(आरएडीटी), हेट्रोफील अँटीबॉडी चाचणी आणि आयजीएम अँटीबॉडी यासारख्या चाचण्या संसर्गाच्या लक्षणांना कारणीभूत असलेल्या जिवाणू व विषाणूंना शोधण्यासाठी केल्या जातात.
यूआरटीआयच्या सामान्य उपचारांमध्ये पुढील पद्धतींचा समावेश होतो:
- अँटिहिस्टमाईन्स आणि डिकंजेस्टंट ही औषधे नाकातील स्त्राव व शिंका कमी करण्यासाठी सुचवली जातात.
- घश्यातील खवखवीसाठी खाऱ्या पाण्याच्या गुळण्यांचा सल्ला दिला जातो.
- फॅरेनजायटीस सारख्या विषाणू किंवा जिवाणूंमुळे होणाऱ्या यूआरटीआयवर उपचार करण्यासाठी अँटिबायोटिक्स आणि अँटिव्हायरल्स दिले जातात.
- सायनसिटीस वर लॉझेंजेस आणि नाकाचे सलाईन ड्रॉप्स सारखे औषधोपचार आराम देतात.
- गरम उबदार पेय जसे की चहा आणि सूप घशाची सूज कमी करण्यात मदत करतात.
- वेदना कमी करण्यासाठी एसिटॅमिनोफेन सारखी वेदनाशामक औषधे दिली जातात.