आघात काय आहे?
आघात एक अशी स्थिति आहे, ज्यात व्यक्ती विशिष्ट परिस्थिति, घटनांची एक श्रृंखला किंवा हानिकारक किंवा घाबरवणारी घटनेमुळे भावनात्मक किंवा शारीरिकरित्या प्रभावित होतो. ही घटना व्यक्तीच्या सामाजिक, भावनिक, शारीरिक कार्य आणि तब्येतीवर दीर्घकाळापर्यंत प्रतिकूल प्रभाव पाडू शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
एका आघातपूर्ण घटनेच्या मानसिक प्रतिसादात याचा समावेश होतो:
- स्मृती आणि एकाग्रता कमी होणे.
- घटनेबद्दल चिंताग्रस्त विचार.
- गोंधळ.
- घटनेचे विचार पुन्हा पुन्हा मनात येणे.
आघातपूर्ण घटनेच्या शारीरिक प्रतिसादांमध्ये खालील समाविष्ट आहे:
- झोपण्याच्या सवयीत फेरबदर.
- चक्कर, मळमळ आणि उलट्या.
- डोकेदुखी.
- फार घाम येणे.
- हृदयाची धडधड वाढणे.
आघातपूर्ण घटनेच्या वर्तनात्मक प्रतिसादात हे समाविष्ट आहे:
- भूकेमध्ये बदल.
- नित्यक्रम बदलणे.
- झोपेच्या समस्या.
- आघातातून मुक्त होण्यासाठी कामात व्यस्त राहणे.
- सिगारेट, अल्कोहोल आणि कॉफीच्या सेवनाची सवय विकसित होणे.
- घटनेबद्दल विचार करणे थांबविण्यात असमर्थता.
- घटने संबंधित कोणत्याही आठवणी टाळणे.
घटनेच्या भावनिक प्रतिसादांमध्ये खालील समाविष्ट आहे:
- घाबरणे, चिंता आणि भय.
- भावनाहीन वाटणे.
- धक्कादायक स्थिती.
- गोंधळल्यासारखे आणि अलिप्त वाटणे.
- लोकांपासून दूर जाणे आणि त्यांच्याशी संबंध जोडण्याची इच्छा नसणे.
- घटना अजून होत आहे असे वाटणे आणि आजूबाजूला धोका असल्यासारखे वाटणे.
- घटना संपल्यानंतर थकवा अनुभवणे.
- घटना संपल्यानंतर निराशाजनक वाटणे.
- नैराश्याच्या टप्प्यात, अपराधीपणा, नैराश्या, टाळले जाणे आणि अतिसंवेदनशीलतेच्या भावनांचा अनुभव येणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
खालील घटनांचा अनुभव घेण्यामुळे एखादी व्यक्ती आघाताचा प्रतिसाद देऊ शकते:
- नुकसान.
- शारीरिक आणि लैंगिक अत्याचार.
- समुदायिक, घरगुती, कामाच्या ठिकाणी हिंसा.
- अपराध.
- नैसर्गिक आपत्ती.
- वंचित वाटणे.
- त्रासदायक दुःख.
- वैद्यकीय प्रक्रिया, दुखापत किंवा आजार.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
जेव्हा एखाद्या प्रौढ व्यक्तीमध्ये कमीतकमी एका महिन्यापेक्षा जास्त काळ ही लक्षणे दिसतात तेव्हा आघाताचे निदान होते:
- कमीतकमी दोन प्रतिक्रियात्मकता आणि उत्तेजना संबंधी लक्षणे.
- कमीतकमी, पुन्हा अनुभवलेल्या लक्षणांपैकी एक.
- किमान दोन, मूड आणि अनुभूतीची लक्षणे.
- कमीत कमी एक टाळल्याचे लक्षण.
आघाताचा उपचार याचा वापर करून केला जातो:
- कॉग्निटिव्ह बिहेव्हियर थेरपी.
- एक्सपोजर थेरपी.
- संज्ञानात्मक पुनर्गठन.
- व्यवस्थित डीसेन्सेटायझेशन.
- चिंतेचे व्यवस्थापन.
- तणाव कमी करण्याची थेरपी.
- डोळ्यांच्या हालचालीवरून डीसेन्सेटायझेशन आणि रिप्रोसिसिंग करणे.
- अँटीडिप्रेसंट्स आणि इतर औषधे.