टोर्टिकोलिस काय आहे?
टोर्टिकोलिस हा एक विकार आहे ज्यामुळे मानेचे स्नायू अकडतात आणि डोके किंवा मान फक्त एकाच बाजूला वळवता येते. जेव्हा लक्षणे अचानक दिसतात तेव्हा त्याला अक्यूट टोर्टिकोलिस म्हणतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
टोर्टिकोलिसची लक्षणे खालील प्रमाणे आहेत :
- माने मध्ये ताठरता.
- मान दुसऱ्या बाजूला फिरवण्यास असमर्थता.
- डोके थरथरणे/ स्थिर न राहणे.
- अप्रभावित बाजूला डोके वळवण्याचा प्रयत्न करताना असह्य किंवा तीव्र वेदना.
- मानेच्या स्नायूंमध्ये सूज येणे.
- डोकेदुखी.
याची मुख्य कारणं काय आहेत?
टोर्टिकोलिसची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात :
- चुकीच्या अवस्थेत झोपणे.
- एकाच खांद्यावरुन जड वजन वाहून नेणे.
- मानेच्या स्नायूंचा गार हवेशी संपर्क.
क्रोनिक टॉर्टीकोलिस खालील कारणांमुळे होऊ शकतो:
- अनुवांशिक आजार.
- पाठीचा कणा किंवा मज्जासंस्थेमध्ये समस्या.
- मानेला दुखापत.
- मानेच्या स्नायूंत रक्त पुरवठा होण्यास अडचणी.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
टोर्टिकोलिसचे निदान करण्यासाठी डॉक्टरकडून शारीरिक तपासणी केली जाते. डॉक्टर आपल्याला डोके फिरवण्यास, पुढच्या किंवा मागच्या बाजूला वाकवणे, आणि मान स्ट्रेच करायला सांगू शकतात.
डॉक्टर खालील चाचण्या देखील करू शकतात जसे की:
- एक्स-रे.
- सीटी स्कॅन.
- रक्त तपासणी (इतर रोगाची लक्षणे शोधण्यासाठी ज्यामुळे याची लक्षणे दिसू शकतात).
जर टोर्टिकोलिस जन्मापासूनच असेल तर शस्त्रक्रियेने लहान आकाराच्या मानेचे स्नायू स्ट्रेच करून आणि त्यांना व्यवस्थित जागी सेट केले जाते.
अक्यूट टोर्टिकोलिसचा खालील बाबींचा वापर करून उपचार केला जाऊ शकतो:
- उष्णता देणे.
- स्ट्रेचिंगचे व्यायाम.
- आधाराकरता मानेच्या पट्ट्याचा वापर करणे.
- वेदना शमवणारी औषधे वापरणे.
- शस्त्रक्रिया (पाठीच्या कण्याचे दुखणे झाल्यास).
तीव्र टोर्टिकोलिस चे लक्षण घरगुती उपचार आणि वेदना शामक औषधोपचार घेऊन केला जाऊ शकतो. पण, जर अति तीव्र वेदना होत असतील तर, ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
भविष्यात याची पुनुरावृत्ती टाळण्यासाठी स्ट्रेचिंग व्यायाम आणि शरीराची ठेवण चांगली ठेवण्यासारख्या प्रतिबंधक उपायांची देखील शिफारस केली जाते.