थ्रश काय आहे?
थ्रश, हा कॅंडिडिआसिस किंवा कॅन्डिडा संसर्ग म्हणून देखील ओळखला जाणारा यीस्टचा संसर्ग आहे. हा शरीराच्या विविध भागांना प्रभावित करतो. कंडिडा/ कॅंडिडा अल्बिकन्स हा बुरशीजन्य एजंट त्याला कारणीभूत असतो; आणि सहसा पचन मार्गात व त्वचेवर असतो. सहजीवनात राहत असल्याने तो कोणतेही लक्षणं उत्पन्न करत नाही. कधीकधी कमी रोग प्रतिकारशक्तीमुळे, तो वाढण्यास सुरुवात होते आणि संसर्गा स कारणीभूत ठरतो. तोंड, अन्ननलिका, घसा, योनी किंवा पुरुषांचे इंद्रिय यांना संसर्ग होऊ शकतो. प्रभावित भागानुसार, ते खालीलप्रमाणे वर्गीकृत केले जाऊ शकतात:
- मौखिक कॅंडिडिआसिस.
- योनीचा कॅंडिडिआसिस.
- कॅंडिडा इसोफॅगटिस.
- ऑरोफॅरिंगल कॅंडिडिआसिस.
- पेनाइल यीस्ट इन्फेक्शन.
लहान बाळ व लहान मुलांसह वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना तो प्रभावित करू शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
शरीराच्या कोणत्याही भागांवर परिणाम झाला असला तरी खालील काही सामान्य चिन्हे आणि लक्षणे दिसून येतात:
याची मुख्य कारणं काय आहेत?
कॅंडिडा साधारणतः शरीरात असतो पण संसर्गाला कारणीभूत प्रमाणात नसतो. खालील घटक या बुरशीचे प्रजनन करतात ज्यामुळे संसर्ग होतो:
- जसे कॉर्टिकोस्टेरॉईड्स, गर्भनिरोधक गोळ्या आणि अँटीबायोटिक्स सारखी औषधे, जी प्रतिकारशक्ती कमकुवत करतात.
- गर्भधारणा.
- धूम्रपान.
- तोंडात कोरडेपणा.
- दाताच्या कवळीचे चुकीचे फीटिंग.
- अनियंत्रित मधुमेह.
- कॅन्सर आणि एचआयव्ही सारख्या संसर्गामुळे प्रतिकारशक्ती कमी होणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
मौखिक कॅंडिडिआसिसच्या निदानात प्रभावित भागाची शारीरिक तपासणी आणि नमुन्यांचे सूक्ष्म परीक्षण समाविष्ट असते. कॅंडिडा इसोफॅगटिसमध्ये सामान्यतः निदानासाठी एंडोस्कोपी केली जाते. जननेंद्रियाच्या कॅंडिडिआसिस मध्ये लक्षणांबरोबरच काही प्रश्नांसह शारीरिक तपासणी हे विकाराचे निदान करण्यात मदत करते.
निस्टाटिन, मायकोनाझोल आणि क्लोट्रिमाझोल हे कॅंडिडिआसिसच्या उपचारांसाठी सर्वसाधारणपणे निर्धारित केली जाणारी अँटीफंगल औषधे आहेत. मात्र, इसोफेगल आणि तीव्र कॅंडिडिआसिस असल्यास तोंडावाटे किंवा इंट्राव्हेनस फ्लुकोनाझोल निर्धारित केले जाते. इतर प्रकारात जिथे फ्ल्यूकोनाझोल विकाराचा उपचार करण्यास प्रभावी नसतो, इतर अँटीफंगल औषधे वापरली जातात.