थ्रंबोफ्लॅबिटिस काय आहे?
थ्रंबोफ्लॅबिटिस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराच्या विशिष्ट भागांमध्ये, विशेषत: पायामध्ये, रक्ताच्या गाठी बनल्यामुळे शिरांमध्ये दाह होतो. रक्ताच्या गाठींमुळे शरीराच्या त्या भागास रक्त प्रवाह कमी होतो आणि कालांतराने कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
शरीराच्या त्या भागात रक्ताच्या गाठी बनल्यामुळे आणि रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे, प्रभावित भागात सूज येते. थ्रंबोफ्लॅबिटिसची इतर चिन्हे अशी आहेत:
- सूजलेल्या भागामध्ये वेदना.
- शरीराच्या इतर भागापेक्षा या भागात जास्त उष्णता जाणवते.
- सुजलेला भाग नरम आणि लालसर रंगाचा होतो.
- त्या भागातील शिरांमधून कमी रक्त जाण्यामुळे, त्वचा कोरडी होऊ शकते आणि एक्जिमा होऊ शकतो.
याची मुख्य कारणे काय आहेत?
नसांमध्ये रक्ताच्या गाठी होण्याची अनेक कारणे असू शकतात. हे दीर्घकाळापर्यंत विश्रांतीमुळे किंवा एकाच स्थितीत दीर्घकाळापर्यंत बसण्यामुळे होऊ शकते. ही स्थिती उद्भवण्याची इतर कारणे अशी आहेत:
- पेसमेकर.
- कर्करोग.
- लठ्ठपणा.
- गरोदरपणा.
- गर्भनिरोधक गोळ्या घेणे.
- नितंब, ओटीपोट किंवा पाय यांचे फ्रॅक्चर किंवा अलीकडील शस्त्रक्रिया.
- व्हेरिकोज व्हेन्स ( ट्विस्टेड किंवा इनलार्ज व्हेन्स).
- थ्रंबोफ्लॅबिटिसचा कौटुंबिक इतिहास.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
तपशीलवार इतिहास आणि शारीरिक तपासणीसह थ्रंबोफ्लॅबिटिस सहज ओळखला जातो.पण, रक्ताच्या गाठीच्या अस्तित्वाची पुष्टी करण्यासाठी डॉक्टर अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन करण्यास सांगू शकतात. गाठीची नेमकी जागा आणि आकार पाहण्यासाठी डॉपलर स्टडीचा सल्ला दिला जातो. जर स्थिती केवळ पृष्ठभागावर असेल तर डॉक्टर औषधे लिहून देऊ शकतात आणि आरामांसाठी सोप्या पद्धती सुचवू शकतात, ज्यात या समाविष्ट आहे:
- दाहकता काम करण्यासाठी औषधे.
- स्टॉकिंग्ज घालणे.
- प्रभावित भागाला गरम शेक देणे.
- प्रभावित भागाला आराम देणे. जर पायावर याचा परिणाम झाला असेल तर पाय उंच आणि सरळ ठेवला पाहिजे.
पण, वाढलेला आणि खोलवर बाधित थ्रंबोफ्लॅबिटिसच्या बाबतीत, रक्त पातळ करणारी औषधे लिहून दिली जातात आणि रक्ताचा प्रवाह पुन्हा स्थापित करण्यासाठी डॉक्टर शरीराच्या त्या भागावर शस्त्रक्रिया करतात.