टेटनी म्हणजे काय?
टेटनी लक्षणांचा एक गट आहे ज्यामुळे शरीरातील स्नायूंना वेदनादायक कळा येतात. हे हायपोपरॅथीयडिझमसारखे एंडोक्राइन विकारांशी संबंधित आहे ज्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी होते.
कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे टेटनी होतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
टेटनीची मुख्य लक्षणे अशी आहेत:
- अनियंत्रित आणि वेदनादायक स्नायूतील कळा.
- स्नायू हिसकणे.
- दौरे येणे.
- शुद्धी कमी होणे.
टेटनीशी संबंधित अतिरिक्त लक्षणे खाली नमूद केली आहेत:
- थकवा आणि अशक्तपणा.
- स्नायू दुखणे.
- डोकेदुखी.
- भीती वाटणे आणि चिंता करणे.
- त्वचा कोरडी पडणे.
- चट्ट्यांमध्ये केस जाणे.
- नखं ठिसूळ होणे.
- मुलांमध्ये दातांचा अयोग्य विकास आणि रचना.
- दात जास्त किडणे.
टेटनीशी संबंधित सर्वात गंभीर लक्षणे म्हणजे लॅरेन्क्स आणि ब्रोंकायचे स्नायू स्पॅम्स आहे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
टेटनीचे कारणे ही आहेत:
- कमी कॅल्शियमचे स्तर (हाइपोकॅल्सेमिया).
- कमी मॅग्नेशियम स्तर (हायपोमॅग्नेशिया).
- कमी पोटॅशियमचे स्तर (हाइपोकॅलेमिया).
- शरीरात ॲसिड-बेस बॅलन्स नसणे / असंतुलित असणे (अल्कोलोसिस).
सामान्यतः, पॅराथायरॉइड हार्मोन्सची पातळी कमी असणे किंवा पॅराथायरायड ग्रंथीला दुखापत होणे किंवा काढून टाकणे यामुळे कॅल्शियमचे प्रमाण कमी आणि अल्कोलोसिस हे टायटनीचे प्रमुख कारक आहेत.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
निदानांमध्ये सामान्यतः लक्षणे तपासली जातात. सीरम इलेक्ट्रोलाइट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे स्तर तपासण्यासाठी डॉक्टर रक्त तपासायला सांगतात आणि निदान पुष्टी करतात.
मुख्य कारण कॅल्शियमची कमतरता असणे आहे, ज्यामुळे सर्वोत्तम उपचार मूलभूत कॅल्शियमच्या स्वरूपात असलेले इंट्राव्हेन्सस कॅल्शियम सप्लिमेंटेशन चा 100 ते 200 मिलीग्राम डोज घेणे आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये कॅल्शियमसह व्हिटॅमिन डी उपचारासाठी देतात कारण शरीरातील कॅल्शियमच्या शोषणासाठी ते आवश्यक आहे. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे टेटनी झाल्यास मॅग्नेशियम सप्लीमेंट आवश्यक आहे. टेटनीच्या मूळ कारणांवर उपचार अवलंबून असतात.