टॅकीकार्डिया म्हणजे काय?
आराम करतांना हृदयाचे ठोके 70 ते 90 बिट्स प्रति मिनिट असे असताण. जेव्हा हृदयाचा दर प्रति मिनिट 100 बीट्सच्या पलीकडे जातो तेव्हा त्याला टॅकीकार्डिया असे म्हणतात. हा ॲरिथेमियाचे सर्वात सामान्य प्रकार आहे. टॅकीकार्डिया शारीरिक (शारीरिक श्रम किंवा गरोदारपणा) किंवा पॅथॉलॉजिकल परिस्थितीमुळे होऊ शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
टॅकीकार्डिया म्हणजे हृदयाचे ठोके खूप जास्त वाढणे आणि ते रक्त प्रभावीपणे पुरवण्यास अक्षम होणे. यामुळे महत्त्वपूर्ण अवयवांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते आणि पुढील लक्षणे दिसू शकतात:
- डिस्पनिआ (श्वासोच्छवास कमी होणे).
- पाल्पिटेशन्स (हृदयाच्या ठोक्यांची जागरूकता)
- छाती दुखणे
- डोके हलके वाटणे
- बेशुद्धावस्था
याचे मुख्य कारणं काय आहेत?
हृदयात एक विद्युत आवेग उत्पन्न होतो जो हृदयाच्या पंपिंगला नियंत्रित करतो. जेव्हा या प्रणालीमध्ये बदल होतो तेव्हा टॅकीकार्डिया होतो. या बदलाचे कारण खाली नमूद केल्यांपैकी असू शकतात:
शारीरिक
- व्यायाम.
- धावणे.
- चिंता.
- गरोदरपणा.
पॅथोलॉजिकल
- हृदयाच्या स्नायूंना इजा होणे.
- जन्मजात हृदय रोग.
- ॲनिमिया.
- उच्च रक्त दाब.
- ध्रुमपान.
- ताप.
- काही औषधांचे साइड इफेक्ट्स.
- औषधांचे दुरुपयोग / अमली पदार्थांचे सेवन.
- इलेक्ट्रोलाइट असंतुलन.
- हायपरथायरॉईडीझम.
हृदयाच्या ठोक्यावर आधारावर टॅकीकार्डिया खालील प्रकारचे असू शकतात:
- ॲट्रियल फायब्रिलेशन - हृदयाच्या वरच्या चेंबर (ॲट्रिया) चे जलद, नॉन सिंक्रोनाइझ्ड संकुचन.
- ॲट्रिअल फ्लटर - ॲट्रिया नियमित दरापेक्षा खूप वेगवान काम करतो.
- सुप्राव्हेन्ट्रिक्युलर टॅकीकार्डिया - वाढलेले हृदयाचे ठोके व्हेंट्रिकल्सच्या (हृदयाच्या खालचे चेम्बर्स) फक्त वरच्या भागात दिसून येतात.
- व्हेंट्रिक्युलर फ्रिब्रिलेशन - हृदयाच्या व्हेंट्रिकल्सचे ठोके अनियमित, वेगवान आणि अराजक असतात.
- व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया - नियमित, वेगवान ठोके जे हृदयाच्या व्हेंट्रिकल्समध्ये सुरू होतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
क्लिनिकल तपासणी (पल्स रेट मोजणे) सहसा टॅकीकार्डियाच्या निदानासाठी पुरेसे असते. पण याने त्याचे कारण स्पष्ट होत नाही. म्हणून, टॅकीकार्डियाचे कारण निश्चित करण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय इतिहास जाणून घेणे आणि काही तपासण्या आवश्यक आहेत. या तपासणीत हे समाविष्ट आहे:
- इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी) - हृदयाच्या विद्युतीय आवेगांची तपासणी करण्यास मदत करते आणि हृदयाच्या स्नायूंची समस्या निश्चित करण्यात मदत करते.
- इलेक्ट्रोफिजियोलॉजी - हृदयाच्या परिसंवादाशी संबंधित समस्यांचे पुष्टीकरण करण्यास मदत करते.
- इकोकार्डियोग्राम - हृदयाच्या पंपिंग तपासण्यास / पाहण्यास मदत करते.
- सीटी आणि एमआरआय स्कॅन - हृदयाच्या संरचनेत आणि हृदयाला झालेले नुकसान ठरविण्यास मदत करते.
- स्ट्रेस टेस्ट - शारीरिक तणावा दरम्यान हृदयाचे कार्य ठरविण्यात मदत करते.
जर टॅकीकार्डिया शारीरिक किंवा ताण झाल्याने असेल तर तो आपोआप बरा होतो.पण, या वाढीव हृदयाच्या दरात व्यवस्थापन करण्यासाठी कधीकधी विशिष्ट उपचारांची आवश्यकता भासू शकते.
- औषधे - तोंडी किंवा इंजेक्टेबल अँटी-अरिथॅमिक औषधे टॅकीकार्डिया कमी करण्यात मदत करू शकतात.
- शॉक थेरेपी किंवा कार्डियोव्हर्शन - हृदयाच्यी विद्युत लय पुनर्संचयित करण्यासाठी बाह्य डिफिब्रिलेटरचा वापर केला जातो.
- पेसमेकर - पेसमेकर एक कृत्रिम विद्युत आवेग जनरेटर आहे जो हृदयाचे ठोके नियमित करण्यात उपयुक्त ठरतो.