पाय सुजणे - Swelling in Feet in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

December 18, 2018

March 06, 2020

पाय सुजणे
पाय सुजणे

सारांश

पायातील सूज हिला एडेमा किंवा अतिरिक्त तरल पदार्थ साठवले जाणें असेही म्हणतात. पाय आणि घोट्यामध्ये सुजेसह वेदना एक सामान्य समस्या आहे, विशेष करून सर्वच वयस्कर व्यक्ती आणि गरोदर अशा स्त्रियांमध्ये. सूज स्वतःमध्ये एक आजार नसून एखाद्या अंतर्निहित आजाराचे महत्त्वपूर्ण असे लक्षण असते. ज्या आजारामुळे ही सूज आली आहे, त्या आजाराला धरून इतर संलग्न लक्षणे सुद्धा असू शकतात. निदानाची निश्चिती वैद्यकीय अन्वेषणांच्या आधारे केली जाते, उदा. संपूर्ण रक्त मोजणी (कंप्लीट ब्लड काउंट), यकृत व मूत्रपिंडांच्या कार्याची चाचणी आणि इमेजिंग चाचणी. सूज यावरील उपचार यात व्यायाम, शरिराचे वजन कमी करणे, ओडेमा यामागील अंतर्निहित आजारासाठी औषधे, आहारात बदल इ. सामील आहेत.

पाय सुजणे ची लक्षणे - Symptoms of Swelling in Feet in Marathi

पाय किंवा घोट्यातील सूज वेदनारहित असू शकते, जी वेळेसह वाढते आणि त्वचेच्या रंग व घडणामध्ये अंतर पडू शकतो. इतर लक्षणे म्हणजे त्वचेचे तापमान वाढण्यासोबत स्पर्श केल्याने गरम संवेदना आणि पू गळणें यासह क्षता (अल्सर) बनू शकतात. सूजेच्या कारणांप्रमाणे, खालील वेगवेगळी लक्षणे दिसू शकतातः

  • ओडेमाच्या रुग्णाच्या त्वचेवर बोटाने खालच्या दिशेने दाब दिल्यास तिथे खळगा किंवा खाच बनेल आणि बोट काढल्यास परत तो भाग सुजलेल्या अवस्थेत जाईल.
  • बूट आणि मोजे काढल्यानंतर दिसणारे लहान खळगे (प्रभावित क्षेत्र) पाहता येणें सुजेचे महत्त्वपूर्ण लक्षण आहे.
  • खळगे गडद दिसतात आणि त्याच्या भोवती असलेली त्वचा सामान्य त्वचेपेक्षा अधिक पिवळसर असते.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹712  ₹799  10% OFF
BUY NOW

पाय सुजणे चा उपचार - Treatment of Swelling in Feet in Marathi

पायाची सौम्य सूज साधारणपणें आपोआप जाते, विशेषकरून जर तुम्ही प्रभावित पाय हृदयाच्या उंचीपेक्षा अधिक ठेवले तर. सामान्य सूज तुमच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने काही सामान्य जीवनशैली बदलांनी जाऊ शकते, पण अंतर्निहित आरोग्य समस्येमुळे होणार्र्या सुजेमध्ये विस्तृत इतिहासाची माहिती, त्याचे प्रासंगिक अन्वेषण आणि जीवनशैली यामधील बदलांसह औषधांची गरज पडते.

  • खूप वेळ उभा राहिल्याने पायांमध्ये होणारी सूज विश्रांती घेऊन आणि पाय उंच धरून, जाऊ शकते. तुम्ही झोपत असतांना, तुमचे पाय उशींवर ठेवून तुमच्या हृदयाच्या उंचीपेक्षा वर ठेवा.
  • गरम हवामानामुळे सूज असल्यास, थेट गरम वातावरणामध्ये जाणें टाळा आणि तुमचे पाय थंड ठेवण्याचे प्रयत्न करा उदा. तुमचे पाय थंड पाण्यामध्ये 15-20 मिनिटे बुडवणे.
  • तरळ पदार्थ साचणी किंवा कोणत्याही हृदयरोगामुळे सूज असल्यास, तुमचे डॉक्टर खाण्यात मीठ व अत्यधिक तरळ पदार्थ कमी करण्याचा सल्ला देतील.
  • तुमच्या अतिरिक्त वजनामुळे सूज असल्यास, तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य आहार घेण्याचा आणि व्यायाम करण्याचा सल्ला देतील, ज्याने तुमच्या वजनात घट होईल.
  • कंप्रेशन आणि स्टॉकिंग्झ विरळेच लाभकारी असतात, आणि तीव्र सूज असलेले रुग्ण त्यांना सहनही नाही करू शकत.
  • गर्भावस्थेमुळे पायाला सूज आलेली असल्यास, कोणत्याही उपचाराची गरज नसते, पण तसेच अत्यधिक सूज हिला उपेक्षित करू नये, कारण ते एक्लॅंप्सिआ (आकड्या येणें)चे लक्षण असू शकते.
  • पायाच्या सुजलेल्या भागावर  15 ते 20 मिनिटे बरफ ठेवा. मग, याची दर तीन ते चार तासांनी पुनरावृत्ती करा. या उपचाराने पायाला तात्काळिक आराम मिळेल.
  •  सूज तीव्र असल्यास, औषध घ्यावे लागतात. तुमचे डॉक्टर हृदयरोगामुळे झालेली सूज कमी करण्याकरिता, शरिरातील अतिरिक्त तरळ पदार्थ निघावे म्हणून औषधे देऊ शकतात उदा. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरसाठी डाययुरेटिक्स.
  • तीव्र इजा असल्यास डॉक्टर कास्ट, शस्त्रक्रिया आणि विश्रांतीचा सल्ला देतात.
  • सुजेसह वेदना असल्यास, तुमचे डॉक्टर पॅरासिटामोल आणि आयबूप्रोफेनसारखी वेदनाशामके आणि आरामाचा सल्ला देतात.
  • भरपूर पाणी पिल्याने मदत मिळू शकते.
  • रक्तक्षय आणि उच्च रक्तदाब, उच्च कॉलेस्टरोल यांसारख्या अंतर्निहित हृदयरोगांसाठी डॉक्टर औषधोपचारासह कमी प्रथिनाचा आहार, कॅल्शिअम व ड जीवनसत्त्व पूरक आणि निरोगी जीवनशैलीचा सल्ला देतात.
  • औषधोपचारामुळी सूज असल्यास, डॉक्टर मात्रा कमी करतील अगर औषध बंद करतील.

जीवनशैली व्यवस्थापन

दैनंदिन जीवनामध्ये काही बदल हवेत, उदा. :

  • व्यायाम
    व्यायामामुळे रक्तसंचार वाढतो आणि लिंफ प्रवाह सुधारतो. म्हणून तुमचे डॉक्टर आणि फिटनेसतज्ञाकडून योग्य मार्गदर्शन घेऊन कमीत कमी एक व्यायाम करणे सुरू करा. तुम्ही पायी चालणे किंवा जॉगिंगसारखे सामान्य व्यायाम अवलंबवू शकता.
  • पाय उंच ठेवणे
    याने वाहिन्यांतील दाब कमी होऊन, वेनस फिल्ट्रेशन कमी होतो व रक्तसंचार वाढतो.
  • ग्रेडेड एक्स्टर्नल कंप्रेशन
    याने कॅपिलरी फिल्ट्रेशनाला अवरोध होऊन, तरळ पदार्थ वाहिनी प्रणालीत राहतात.
  • लिंफटिक मसाज
    लिंफटिक मसाज लिंफ निकासीला पुरेशी संप्रेरणा देऊन, तिचे संचार वाढवेल.

पाय सुजणे काय आहे - What is Swelling in Feet in Marathi

पायातील सूज म्हणजे पायात तरळ पदार्थ साठवले जाणें असे असते. एखाद्याच्या पाय, घोटा आणि टागाची सूज एवढी तीव्र असू शकते, की त्याच्या प्रभावित भागावर कुणी अथवा तिने स्वतः बोटाने दाबल्यास खळगा (पिटिंग एडेमा) पडू शकेल.

पायातील सूज खूप सामान्य आहे आणि तुम्ही खूप वेळ उभे राहिल्यास अगर खूप वेळ चालत असल्यास, उपचाराची गरज नसते. तरीही, खूप वेळ सूज टिकणें यासह श्वसनात त्रास, वेदना किंवा क्षता (अल्सर) असल्यास, एखाद्या गंभीर आरोग्य समस्येचे ते चिन्ह असू शकते .

ओडेमाच्या रुग्णाचा एखादा किंवा दोन्ही पाय सुजलेले असल्यास, त्या सुजेमुळे रुग्णाला त्याच्या दैनंदिन गतिविधी करण्यात गैरसोय, वेदना, बाधा आणि कठिनता होऊ शकते. तुम्ही स्त्री असल्यास आणि गरोदर असल्यास, तुमचे पाय नैसर्गिकरीत्या सुजतात, कारण गरोदर असतांना स्त्रीच्या शरिरामध्ये सामान्य परिस्थितीपेक्षा अधिक पाणी साचून जाते. तुम्ही गरोदर स्त्री असल्यास आणि काही वेळा तुम्ही खूप वेळ उभे राहिल्यास, दिवसाच्या शेवटी वेदना असह्य होते. ही गोष्ट आई किंवा येणार्र्या बाळासाठी गंभीर नसली खरी, तरी होणार्र्या आईसाठी ही गोष्ट खूप गैरसोयीची असते.

पायातील सुजेची यंत्रणा कॅपिलरी फिल्ट्रेशन वाढण्याशी जी रक्ताच्या कॅपिलरीमधून तरळ पदार्थ बाहेर ढकलते; किंवा लिंफ निकासीमध्ये घट होण्याशी, जी तुमच्या शरिरातील लिंफ प्रवाह अडवून टाकते, किंवा दोघांशीही संबंधित असू शकते. अनेक आजारांद्वारे पाय सुजत असल्यामुळे, तुमच्या डॉक्टरांद्वारे योग्य निदान आवश्यक आहे, ज्यामध्ये वैद्यकीय इतिहासाची इत्थंभूत माहिती आणि विभिन्न कारणे यांचे सखोल अन्वेषण सामील आहे. कोणत्याही अंतर्निहित कारणामुळे रुग्णाच्या पायात सूज होत नसल्यास, साधारणपणे उपचाराची गरज नसते, पण अंतर्निहित कारणामुळे किंवा  काही औषधांमुळे पाय सुजत असल्यास, योग्य उपचाराची गरज पडते. म्हणून, सूज एखादे औषध किंवा वैद्यकीय कारणामुळे आहे का, हे तपासण्यासाठी डॉक्टराचा सल्ला घेणें महत्त्वाचे आहे.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Swelling
  2. National Health Service [Internet]. UK; Swollen ankles, feet and legs (oedema)
  3. Emma J Topham, Peter S Mortimer. Chronic lower limb oedema. Clinical Medicine Vol 2 No 1 January/February 2002. Clin Med JRCPL 2002;2:28–31
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Foot, leg, and ankle swelling
  5. Jennifer M. Vesely, Teresa Quinn, Donald Pine. Elder care: A Resource for Interprofessional Providers. University of Minnesota, University of Arizona, Health Resources and Services Administration. July 2013.
  6. Kumar Natarajan. [internet]. Chapter 72. Practical Approach to Pedal Edema.

पाय सुजणे साठी औषधे

Medicines listed below are available for पाय सुजणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Medicine Name

Price

₹110.0

₹65.0

Showing 1 to 0 of 2 entries