पायातील सूज म्हणजे पायात तरळ पदार्थ साठवले जाणें असे असते. एखाद्याच्या पाय, घोटा आणि टागाची सूज एवढी तीव्र असू शकते, की त्याच्या प्रभावित भागावर कुणी अथवा तिने स्वतः बोटाने दाबल्यास खळगा (पिटिंग एडेमा) पडू शकेल.
पायातील सूज खूप सामान्य आहे आणि तुम्ही खूप वेळ उभे राहिल्यास अगर खूप वेळ चालत असल्यास, उपचाराची गरज नसते. तरीही, खूप वेळ सूज टिकणें यासह श्वसनात त्रास, वेदना किंवा क्षता (अल्सर) असल्यास, एखाद्या गंभीर आरोग्य समस्येचे ते चिन्ह असू शकते .
ओडेमाच्या रुग्णाचा एखादा किंवा दोन्ही पाय सुजलेले असल्यास, त्या सुजेमुळे रुग्णाला त्याच्या दैनंदिन गतिविधी करण्यात गैरसोय, वेदना, बाधा आणि कठिनता होऊ शकते. तुम्ही स्त्री असल्यास आणि गरोदर असल्यास, तुमचे पाय नैसर्गिकरीत्या सुजतात, कारण गरोदर असतांना स्त्रीच्या शरिरामध्ये सामान्य परिस्थितीपेक्षा अधिक पाणी साचून जाते. तुम्ही गरोदर स्त्री असल्यास आणि काही वेळा तुम्ही खूप वेळ उभे राहिल्यास, दिवसाच्या शेवटी वेदना असह्य होते. ही गोष्ट आई किंवा येणार्र्या बाळासाठी गंभीर नसली खरी, तरी होणार्र्या आईसाठी ही गोष्ट खूप गैरसोयीची असते.
पायातील सुजेची यंत्रणा कॅपिलरी फिल्ट्रेशन वाढण्याशी जी रक्ताच्या कॅपिलरीमधून तरळ पदार्थ बाहेर ढकलते; किंवा लिंफ निकासीमध्ये घट होण्याशी, जी तुमच्या शरिरातील लिंफ प्रवाह अडवून टाकते, किंवा दोघांशीही संबंधित असू शकते. अनेक आजारांद्वारे पाय सुजत असल्यामुळे, तुमच्या डॉक्टरांद्वारे योग्य निदान आवश्यक आहे, ज्यामध्ये वैद्यकीय इतिहासाची इत्थंभूत माहिती आणि विभिन्न कारणे यांचे सखोल अन्वेषण सामील आहे. कोणत्याही अंतर्निहित कारणामुळे रुग्णाच्या पायात सूज होत नसल्यास, साधारणपणे उपचाराची गरज नसते, पण अंतर्निहित कारणामुळे किंवा काही औषधांमुळे पाय सुजत असल्यास, योग्य उपचाराची गरज पडते. म्हणून, सूज एखादे औषध किंवा वैद्यकीय कारणामुळे आहे का, हे तपासण्यासाठी डॉक्टराचा सल्ला घेणें महत्त्वाचे आहे.