स्पोरोट्रायकॉसिस म्हणजे काय?
फंगस स्पायरोथ्रिक्समुळे होणारा दीर्घकाळचा फंगल संसर्ग स्पोरोट्रायकॉसिस म्हणून ओळखला जातो.हे फंगस बहुधा उबदार वातावरणातील मातीमध्ये आढळतात आणि गुलाबाच्या रोपट्यांवरही आढळतात, त्यामुळे यास गुलाबाच्या माळीस होणारा आजार असेही म्हटले जाते. हा फंगल संसर्ग त्वचेवरील किरकोळ काप किंवा जखमेवर होतो. हा संसर्ग सामान्यपणे माळी किंवा शेतकरी लोकांना जास्त प्रमाणात होतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
स्पोरोट्रायकॉसिस ची लक्षणे ही फंगस स्पोरोथ्रिक्स स्कॅनकीच्या च्या जखमा किंवा काप वर संसर्ग झाल्यास 12 आठवड्यांच्या आत कधीही दिसून येतात.
यामध्ये त्वचेवर प्रथम वेदनाहीन लहान लाल बम्प्स होतात आणि त्याचे नंतर अल्सर मध्ये रूपांतर होते. जेव्हा फंगस श्वसनप्रणालीत प्रवेश करतो तेव्हा त्यामुळे श्वास, कफ, छातीत वेदना आणि ताप येतो.
स्पोरोट्रायकॉसिसचे दोन प्रकार आहेत, निश्चित आणि प्रसारित. निश्चित स्पोरोट्रायकॉसिस हा त्वचेच्या गाठींपर्यंतच मर्यादित असतो मात्र प्रसारित स्पोरोट्रायकॉसिस हा त्वचेपासून शरीराच्या इतर भागातही पसरतो. डायबेटिज मिलिटस, कर्करोग आणि एड्स झालेल्या रूग्णांमध्ये प्रसारित स्पोरोट्रायकॉसिस होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे संधिवात, डोकेदुखी आणि सीझर्स हे प्रसारित स्पोरोट्रायकॉसिसची सामान्य लक्षणे आहेत.
याची मुख्य कारणं काय आहेत?
क्युटेनियस स्पोरोट्रायकॉसिस हा खुल्या जखमा किंवा काप यातून प्रवेश करणारे फंगस किंवा संक्रमित रोपट्यांना हाताळणाऱ्या हातांच्या संसर्गामुळे होतो. फंगल बिजाणूंच्या श्वसन केल्याचा परिणामस्वरुप क्वचितच फुप्फुसांमध्ये स्पोरोट्रायकॉसिस होतो. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये प्रसारित स्पोरोट्रायकॉसिस वेगाने पसरतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डॉक्टर सोप्या शारीरिक तपासणीतून आणि वैद्यकीय इतिहासावरून स्पोरोट्रायकॉसिस चे निदान करु शकतात. जंतूंच्या कृत्रिम वाढीच्या तपासणीसाठी गाठीतील पसचे आणि बायोप्सीसाठी संक्रमित त्वचेचे नमुने घेऊन आजाराचे निदान निश्चित केले जाते. क्युटेनियस स्पोरोट्रायकॉसिस चे निदान रक्त चाचणीवरून केले जाते. हा संसर्ग जीवघेणा नसला तरी यावर योग्य उपचारांसाठी आयट्राकोनॅझोल सारखे अँटीफंगल औषधे वापरली जातात. पण ही औषधे गरोदरपणात वापरली जात नाहीत. गंभीर स्वरूपातील स्पोरोट्रायकॉसिसवर उपचार करण्यासाठी अँफोटेरीसीन बी चे इंट्राव्हीनस इंजेक्शन वापरले जातात.
फंगसचा शरीरात प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी जखम स्वच्छ करून ती झाकावी. तसेच जखम लवकर भरावी म्हणून ती खाजवणे टाळावे.