स्पोंडिलायटिस म्हणजे काय?
स्पोंडिलायटिस हा मणक्यातील संधीवात असून या मध्ये मणका (मणका बनवणारी हाडे) व मणका आणि श्रोणिमधील हाडावर सूज दिसून येते. याचा प्रभाव मणक्याच्या स्नायुबंध व अस्थिबंधावर देखील होतो. हा विकार पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात पाहिला जातो आणि त्यांना याचा त्रास देखील जास्त होतो. क्वचित, दुसऱ्या स्नायुंवर पण परिणाम होतो.
नव्या वर्गीकरणानुसार, स्पोंडिलायटिस हा ॲक्सीअल स्पोंडिलोअर्थरायटिस (मणका व श्रोणिवर परिणाम करणारा ) व पेरिफेरल स्पोंडिलोअर्थरायटिस (इतर सांध्यांवर परिणाम करणारा ) या दोन प्रकारांमध्ये विभागला आहे.
स्पोंडिलायटिसची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहे?
स्पोंडिलायटिसची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- बरगडी, नितंब, पाठीचा खालचा भाग, खांदे व टाचांमधील वेदना व कडकपणा.
- मणक्याच्या हालचालींचा पल्ला कमी होणे, परिणामी गतिक्षमता मंदावणे.
- ताप व थकवा.
- डोळे व आतड्यांची आग होणे.
- क्वचित हृदय व फुप्फुसांमध्ये जळजळ.
- म्युकस मेंम्बरेन, त्वचा, डोळे, मूत्राशय व लैंगिक अवयवांत वेदना व जळजळ होणे.
- टाचांमधील वेदना (इंथेसिटिस), आयराइटिस, गुडघेदुखी.
स्पोंडिलायटिसची प्रमुख कारणे काय आहेत?
जरी स्पोंडिलायटिसचे मूळ कारण अजून माहीत नसले तरी ते अनुवांशिक कारणे असल्याची शक्यता दर्शवली जाते. ते कारण HCA-B27 (एचसीए-बी27) या जीनशी संबंधित असल्याचे सांगितले जाते; तरी त्याचे नेमके कार्य अजून कळू शकले नाही.
स्पोंडिलायटिसची इतर कारणे पुढीलप्रमाणे आहेत:-
- पर्यावरणीय घटक.
- रोगप्रतिकारक घटक- शरीराच्या प्रतिकारक पेशी इतर पेशींवर हल्ला करतात, त्यामुळे जळजळ होते.
- फार काळापासून ची आतड्यातील जळजळ.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
स्पोंडिलायटिसचे निदान त्याच्या लक्षणांवर अवलंबून असते.
योग्य निदान करण्यासाठी डॉक्टरांकडून ज्या गोष्टी केल्या जातात त्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत:
- सखोल इतिहासाच्या तपासानंतर शारीरिक परीक्षा.
- योग्य निदानासाठी मणक्याचा मुख्यतः सॅक्रोलिक सांध्याचा एक्स रे.
- HLA-B27 (एचसीए-बी27) जीनच्या तपासणीसाठी रक्त चाचणी.पण याच्या उपस्थितीने निदान नक्की होत नाही.
स्पोंडिलायटिसचा उपचार:
सध्या स्पोंडिलायटिससाठी कोणतेही योग्य उपचार उपलब्ध नाही आहे. जे उपचार केले जातात त्यांचा उद्देश वेदना व कठोरपणा कमी करणे, दोषांपासून बचाव, कार्य व्यवस्थित होऊ देणे, आजाराची व्यापकता कमी करणे, शरीराची ठेवण जपणे हा असतो. उपचाराची तंत्रे पुढीलप्रमाणे आहेत:
- नियमित व्यायाम, ज्यामध्ये शरीराची लवचिकता व बळकटी, तसेच श्वसनाचे व्यायाम, शरीर वाकणे थांबवण्यासाठी शरीराच्या ठेवणीचे व्यायाम. व्यायामाच्या नियमिततेसाठी फिजिओथेरपिस्ट महत्त्वाची भूमिका बजावतो.
- औषधे वापरून केल्या जाणाऱ्या उपचारात ही औषधे वापरली जातात:-
- नॉन स्टिरॉइडल दाह नष्ट करणारी औषधे लक्षणे कमी करण्यासाठी वापरली जातात.
- कॉर्टीस्टोन व प्रेडनिस्टोन असलेली स्टिरॉइड्स क्वचित वापरली जातात.
- सल्फासलासिन किंवा मिथोट्रेक्झेट वापरली जाऊ शकतात पण मणक्याच्या आजारावर हे कमी परिणामकारक असतात.
- सध्या जैविक अँटी- टीएनएफ-α एजंट्स जसे इन्फ्लिक्सिमॅब, इंटनेर्सप्ट व अडलिमुमाब वापरली जात आहे जे लक्षणे कमी कण्यासाठी मदत करतात व आजारचा प्रसार थांबवतात. ती शीरेत दिली जातात.
- अँकिलुझिंग स्पोंडिलायटिस साठी शस्त्रक्रिया उपचार मर्यादित आहेत. मणक्यासाठी कोणतीही विशिष्ट शस्त्रक्रिया नाही आहे, तरी खांदे व कंबरेच्या हाडात शस्त्रक्रिया बऱ्याच बाबतीत फायदेशीर ठरते.