सारांश
त्वचेवर पुरळ आल्याने त्वचेच्या रंगात आणि दिसण्यात बदल होतो जो सामान्य त्वचेपासून सहजपणे वेगळा असतो. मुलांमधील आणि प्रौढांमधील विविध अंतर्निहित अवस्थांमध्ये दिसणारे हे एक सामान्य लक्षण आहे.बऱ्याच वेळा अन्न किंवा औषधांच्या एलर्जीमुळे हे होते.सूर्यप्रकाशामुळे सुद्धा, विशेषतः उन्हाळ्यात, त्वचेवरील पुरळ होऊ शकतात. मूलतः विषाणू, जीवाणूजन्य, बुरशी किंवा परजीवींमुळे होणारे काही संसर्ग त्वचेवरील पुरळे वाढवू शकतात. कधीकधी, त्वचेची पुरळे काही औषधांचा दुष्परिणाम म्हणूनही होतात. याचे निदान त्वचातज्ञ पुरळ बघून आणि व्यक्तीच्या पूर्वेतिहासाच्या नोंदी घेऊन करु शकतात. कधीकधी, निदानासाठी प्रयोगशाळेतील चाचण्या आवश्यक असू शकतात. त्वचेवरील पुरळांच्या उपचारांच्या काळात संसर्ग झाला असल्यास औषधोपचारांसोबत आराम, भरपूर पाणी पिणे, त्वचेवर पुरळ आणणारी औषधे टाळणे, हानिकारक रसायनांपासून संरक्षण करणे, विषारी धातू आणि सूर्यप्रकाशांचा संपर्क टाळणे हे उपाय समाविष्ट आहेत. त्वचेच्या पुरळांचे लवकर निदान होणे उत्तम आहे कारण सामान्यतः ते काही अलर्जी किंवा संसर्गाशी संबंधित असेल तर बरे होऊ शकणारे आहे. कधीकधी त्वचेची पुरळे कुठल्या तरी अलर्जीच्या प्रतिक्रियेचे लक्षण असते, जी आधी संपूर्ण शरिरावर पसरणारी तीव्र खाज, सूज यात बदलते आणि नंतर टेंगूळ आणि फोडांमधे रुपांतरित होऊ शकते.