त्वचेचे संसर्ग - Skin Infections in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 04, 2019

March 06, 2020

त्वचेचे संसर्ग
त्वचेचे संसर्ग

त्वचेचे संसर्ग काय आहे?

त्वचा संपूर्ण शरीरावर बाह्य संरक्षणात्मक स्तर बनवते. याचा अर्थ असा आहे की वातावरणात उपस्थित असलेल्या सर्व एजंट्स - रसायने, बॅक्टेरिया आणि इतर बऱ्याच घटकांना त्वचा सामोरी जाते. कधीकधी, प्रतिकूल संसर्गामुळे त्वचेवर संक्रमण होऊ शकते.

याची मुख्य चिन्ह आणि लक्षणे काय आहेत?

जरी लक्षणे त्याच्या कारणांवर अवलंबून असली, तरी त्वचेच्या संसर्गाची काही ठराविक लक्षणे आहेत:

  • जळजळ होण्यामुळे लालसरपणा आणि खाजवणे.
  • त्वचा नाजूक आणि कोरडी होणे.
  • गंभीर प्रकरणांमध्ये त्वचेमधून रक्तस्त्राव होणे किंवा पस निघणे.
  • जर संक्रमण वाढले तर आपल्या त्वचेच्या पृष्ठभागावर लहान फोड किंवा उंचवटे होऊ शकतात.
  • हळूहळू, त्वचेच्या पातळ थरांमध्ये शेड किंवा स्लो ऑफ होण्यास सुरवात होते, खाली गडद थर होऊ लागतात आणि त्वचा फिकट दिसू लागते.
  • काही संक्रमणांमध्ये त्वचेवर स्केलिंग होऊ शकते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

त्वचेचा संसर्ग एकतर जीवाणू, विषाणू किंवा बुरशीजन्य जीवांमुळे होतो जसे,

  • हर्पिस झोस्टर विषाणूसारख्या व्हायरसमुळे त्वचेचा संसर्ग होऊ शकतो उदा. कांजण्या आणि शिंगल्स. मानवी पॅपिलोमाव्हायरसमुळे त्वचेच्या संसर्गामुळे वॉर्ट्स होऊ शकतात.
  • बॅक्टेरियामुळे त्वचेचा संसर्ग होतो जसे उष्मा आणि कार्बंक्ल किंवा सेल्युलायइट्स आणि कुष्ठरोग यांसारखे गंभीर संक्रमण. स्टॅफिलोकोकस हा एक जीवाणू आहे जो सामान्यत: त्वचेच्या संक्रमणास कारणीभूत ठरतो.
  • फंगल स्किन इन्फेकशन मध्ये समावेश आहे - गजकर्ण, कॅंडिडा बुरशीमुळे होणारा संसर्ग आणि ॲथलीट्स फूट. फंगल संसर्गाचा सामान्यतः नखे आणि नखां खालच्या त्वचेवर परिणाम होतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

  • प्रत्येक संसर्गामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण त्वचाविज्ञान असते त्याच्या आधारे निदान केले जाऊ शकते.
  • शारीरिक तपासणीनंतर सूक्ष्म तपासणीसाठी त्वचेच्या जखमेचा नमुना घेतला जातो.
  • रक्त तपासणी देखील शरीरातील संसर्गाच्या अस्तित्वाची पुष्टी करते.

उपचार

  • त्वचेचा किरकोळ संसर्ग काही आठवड्यांमध्ये सहजपणे बरे होते.
  • बॅक्टेरियल त्वचेच्या संसर्गासाठी उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. गंभीर प्रकरणांमध्ये हे तोंडी किंवा नसांमध्ये दिले जाते.
  • त्याचप्रमाणे, फंगल त्वचा संसर्गासाठी, अँटीफंगल औषधे स्प्रे, जेल, क्रीम किंवा टॅब्लेटस दिल्या जातात.
  • जळजळ कमी करण्यासाठी दाहकता कमी करणारी औषधे दिली जातात.
  • रुग्णाला सल्ला दिला जातो, की संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी इतरांशी संपर्क टाळावा आणि जलद परिणामांसाठी वैयक्तिक स्वच्छता राखावी.



संदर्भ

  1. Hani U et al. Candidiasis: a fungal infection--current challenges and progress in prevention and treatment.. Infect Disord Drug Targets. 2015;15(1):42-52. PMID: 25809621
  2. El Hayderi L,Nikkels-Tassoudji N,Nikkels AF. Incidence of and Risk Factors for Cutaneous Scarring after Herpes Zoster.. Am J Clin Dermatol. 2018 Dec;19(6):893-897. doi: 10.1007/s40257-018-0385-2. PMID: 30151702
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Skin Infections.
  4. Aly R. Microbial Infections of Skin and Nails. In: Baron S, editor. Medical Microbiology. 4th edition. Galveston (TX): University of Texas Medical Branch at Galveston; 1996. Chapter 98.
  5. National Health Service [Internet]. UK; Fungal skin and nail infections: diagnosis and laboratory investigation guide for primary care.

त्वचेचे संसर्ग साठी औषधे

Medicines listed below are available for त्वचेचे संसर्ग. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.