त्वचेचे विकार आणि रोग काय आहेत?
त्वचा मानवी शरीरातील एक संरक्षक आणि शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. कोणत्याही त्रासदायक वस्तूमुळे, त्वचेवर सूज, खाज, जळजळ आणि त्वचा लालसर होऊ शकते. याच्या त्वचेच्या दिसण्यावर परिणाम होतो. त्वचेतील बदल रोग किंवा संसर्गामुळे देखील होऊ शकतात. त्वचेचे विकार, त्वचेचे वाढलेले /कमी झालेले रंगद्रव्य, संवेदना, स्केलिंग, फोड, नोड्युल्स, रॅश असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
त्वचेच्या विकारांची मुख्य चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत:
- अल्सर.
- उघड्या जखमा.
- कोरडी त्वचा.
- पस बनणे.
- त्वचेचा रंग बदलणे.
- ब्रेकआउट्स.
- खाजऱ्या आणि वेदनादायक रॅशेस.
- डाग.
- उंचावलेले वेल्ट्स.
- क्रिस्टी त्वचा.
- त्वचेवर फिकट डाग.
- लालसरपणा.
- द्रव-भरलेले फोड.
- उघडे सोर्स.
- सुरकुत्या.
- गाठी.
- रॅशेस.
- नरमपणा.
- सूज.
याची मुख्य कारणं काय आहेत?
त्वचेच्या विकार आणि रोगाची कारणे खालील प्रमाणे आहेत:
- औषधे, अन्न, परागक किंवा कीटकाच्या चावण्यामुळे अॅलर्जी.
- वय.
- गरोदरपणा.
- त्वचेचा कर्करोग.
- थायरॉईड, यकृत किंवा किडनी रोग.
- कमकुवत प्रतिकार शक्ती.
- त्वचेची योग्य स्वच्छता न राखणे.
- आनुवंशिक घटक.
- औषधांचे साइड इफेक्ट्स.
- त्वचेस त्रासदायक रसायने वापरणे.
- भाजणे.
- प्रकाशाची संवेदनशीलता.
- मधुमेह.
- व्हायरस, बुरशी किंवा बॅक्टेरिया.
- ऑटोइम्यूनची स्थिती, उदाहरणार्थ, ल्युपस.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
संपूर्ण शारीरिक तपासणीसह आणि तपशीलवार इतिहास घेतल्यानंतर, त्वचेच्या आजार आणि विकाराचे खालील पद्धतींचा वापर करून निदान केले जाते:
- पॅच चाचणी - कोणत्याही पदार्थावरील संसर्ग आणि प्रतिक्रियांची उपस्थिती ओळखण्यासाठी.
- कल्चर चाचणी - रोगास कारणीभूत असलेल्या बुरशी, जिवाणू किंवा व्हायरसची उपस्थिती ओळखणे.
- त्वचेवर कर्करोगाचे टिश्यू किंवा सौम्य ट्यूमरचा शोध घेण्यासाठी बायोप्सी.
त्वचा विकारांचे उपचार मूलभूत कारणांवर आधारित असतात. खालील औषधे सामान्यत: त्वचा विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात:
- टॉपिकल कॉर्टिकोस्टिरॉईड्स.
- टॉपिकल अँटीबायोटिक क्रीम आणि मलम.
- ओरल स्टेरॉईड्स आणि अँटीबायोटिक्स.
- अल्ट्राव्हायलेट (यूव्ही) -ए1.
- नॅरोबँड यूव्ही-बी लाइट.
- अँटी-हिस्टामाइन्स.
- क्रीम आणि मलम.
- अँटीफंगल स्प्रे.
- एक्सायमर लेझर थेरपी.
- ओव्हर-द-काउंटर स्किनकेअर उत्पादने.
- टार्गेटेड प्रिस्क्रिपशन मेडिकेशन.
- काही घरगुती उपचार, जसे मध.
- ब्लू लाइट फोटोडायनामिक थेरेपी.
- ॲक्यूपंक्चर.
- सोरालेन आणि यूव्ही लाइट ए (पुवा).
- शस्त्रक्रिया.
- स्टेरॉईड किंवा व्हिटॅमिन इंजेक्शन.
- मेडिकेटेड मेकअप.