स्जोग्रेन सिन्ड्रोम काय आहे?
1933 मध्ये डॉ. हेनरिक स्जोग्रेन यांनी या सिंड्रोमला प्रथम ऑटोमिम्यून रोग म्हणून ओळख दिली होती. यामध्ये शरीरातील आर्द्रता उत्पादक पेशी नष्ट होतात. 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हा विकार झालेला आढळतो आणि महिला बहुतेकदा याने प्रभावित असतात. बऱ्याचदा, हा विकार इतर ऑटोम्युन्यून रोग जसे र्यूमेटोइड आर्थराईटिस किंवा ल्यूपस च्या कॉम्प्लिकेशन मुळे होतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मुख्य लक्षणांमध्ये खालील बाबींचा समावेश असतो:
- डोळे कोरडे झाल्याने त्यांची आग, खाज, वेदना, आणि डोळे सुजल्याने दृष्टी धूसर होते.
- तोंड कोरडे पडल्याचे परिणामः
- तोंडात किंवा घश्यात अन्न चिटकणे.
- घोगरा आवाज आणि गुळगुळीत लाल जीभ.
- सुके तडे गेलेले ओठांचे कोपर.
- बदललेली चवीची संवेदना.
- दात किडणे, तोंडात फोड, आणि तोंडात थ्रश.
- कोरडी खाजणारी त्वचा.
- सांधे आणि स्नायूत वेदना.
- सुजलेल्या लाळ उत्पादक ग्रंथी.
- महिलांच्या योनीत कोरडेपणा.
- घामोळ्या (सन रॅशेस).
याची मुख्य कारणं काय आहेत?
या विकाराची कारणं अज्ञात आहे परंतु हा रोग असलेल्या बहुतेक लोकांच्या रक्तात असामान्य प्रथिने आढळतात. रोगप्रतिकारक यंत्रणा प्रथम नाक, डोळे आणि तोंडाजवळ असलेल्या शरीराच्या आर्द्रता उत्पादक ग्रंथींना लक्ष्य बनवते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
लक्षणांसाठी तुमचे डॉक्टर तुमचे डोळे आणि तोंड तपासतील. कधीकधी निदान करणे कठीण जाते कारण तोंडातला आणि डोळ्यातला कोरडेपणा बऱ्याच औषधांचे साइड इफेक्ट्स असतात. रक्त तपासणी, डोळ्यांचे परीक्षण, सियोलोग्राफी (लाळ प्रवाहाची तपासणी करण्यासाठी लाळ उत्पादक ग्रंथीमध्ये डाय इंजेक्ट केल्यानंतर एक्स-रे केला जातो), लाळ उत्पादक स्किन्टीग्राफी (यात रक्तात रेडियोॲक्टिव्ह आइसोटोप इंजेक्ट करून लाळ उत्पादक ग्रंथीपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ तपासाला जातो) आणि ओठांची बायोप्सी, या चाचण्यादेखील निदानाची पुष्टी करण्यासाठी केल्या जातात.
ल्युब्रिकेटिंग डोळ्याच्या थेंबांचा वापर करून डोळ्यातील कोरडेपणाचे व्यवस्थापन केले जाऊ शकते. वारंवार पाण्याचे सेवन, च्यूइंग गम्स, आणि तोंडातील कोरडेपणा कमी करण्यासाठी लाळेसाठी पर्यायी वस्तू वापरणे हा एक उपाय आहे. तोंडातील यीस्टच्या संसर्गाचा उपचार करण्यासाठी अँटिफंगल औषधे वापरली जातात. कधीकधी, प्रतिरक्षा प्रणाली नियंत्रित करण्यासाठी इम्यूनोसप्रेसंट औषधे वापरली जातात.