शॉर्ट बाउल सिंड्रोम म्हणजे काय?
शॉर्ट बाउल सिंड्रोम हा क्वचित आढळणारा विकार असून यामध्ये आतडे पोषक घटक योग्यरितीने शोषून घेत नाहीत. हा विकार एखाद्या गंभीर आजारामुळे किंवा लहान आतड्यांचा भाग किंवा पूर्ण लहान आतडे काढून टाकल्यामुळे उद्भवतो. मोठ्या आतड्यांच्या बिघडलेल्या कार्याला सुद्धा काहीवेळा शॉर्ट बाउल सिंड्रोम म्हटले जाते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सामान्य लक्षणांमध्ये पुढील लक्षणांचा समावेश होतो:
- व्हिटॅमिन, मिनरल्स आणि पाण्याचे अर्धवट शोषण.
- अतिसार.
- निर्जलीकरण.
- वजन कमी होणे.
- आरोग्य बिघडल्याची सामान्य भावना.
- सुस्तपणा.
- कुपोषण.
इतर लक्षणांमध्ये पुढील लक्षणांचा समावेश होतो:
व्हिटॅमिनच्या कमतरतेशी संबंधित लक्षणांमध्ये पुढील लक्षणांचा समावेश होतो.
- व्हिटॅमिन ए: रातांधळेपणा, असामान्य कोरडेपणा आणि पापण्यांच्या आतील अस्तरपदर आणि नेत्रपटल राठ होणे आणि कॉर्नियल अल्सरेशन.
- व्हिटॅमिन बी: तोंड आणि जीभेची दाहक सूज, ओठांची कोरडी स्केलिंग, द्रवपदार्थ संचयाने सूज येणे, ॲनिमिया, डोळ्यांच्या काही स्नायूंना अशक्तपणा, हृदयाच्या ठोक्यांची अनियमितता, पेरिफेरल न्यूरोपॅथी आणि सीझर्स.
- व्हिटॅमिन डी: रिकेट्स आणि ऑस्टिओपोरोसिस.
- व्हिटॅमिन इ: टेटनी, पॅरेथेसिया, एडेमा आणि दृष्टी समस्या.
- व्हिटॅमिन के: सहजपणे जखम होणे आणि अधिक वेळ रक्तस्त्राव होणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
सामान्य कारणांमध्ये पुढील कारणांचा समावेश होतो:
- शस्त्रक्रियेद्वारे लहान आतड्यांचा भाग किंवा संपूर्ण आतडे काढून टाकणे. शस्त्रक्रियेची गरज नेक्रोटाईजिंग एन्टरोकॉलिटिस, क्रॉन्स रोग, आतडे आणि कर्करोग या परिस्थितींमध्ये पडू शकते.
- लहान आतड्यांच्या कार्यात बिघाड होणे.
इतर कारणांमध्ये पुढील कारणांचा समावेश होतो:
- आघातामुळे आतड्यांची इजा.
- हिर्शस्प्रंग रोग.
- विकिरण आंत्रशोथ.
- अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे आतड्यांचा बिघाड होणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
शॉर्ट बाउल सिंड्रोमच्या निदानासाठी वैद्यकीय इतिहास, परीक्षण आणि तपासणी केली जाते.
तपासणीसाठी पुढील चाचण्या केल्या जातात:
- रक्त चाचणी: मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सची पातळी तपासणे.
- मल चाचणी.
- लहान आणि मोठे दोन्हीही आतड्यांचा एक्स-रे.
- आतड्यांचा सीटी स्कॅन.
शॉर्ट बाउल सिंड्रोम चा उपचार हा आतड्यांचा खराब झालेला भाग आणि आजाराचे गांभीर्य यांवर अवलंबून असतात.
तुमचे डॉक्टर पोषणाची कमतरता भरून काढण्यासाठी मौखिक पुनर्जलीकरण आणि व्हिटॅमिन आणि खनिजांची कमतरता भरून काढण्यासाठी सप्लिमेंट्स वापरण्याचा सल्ला देतात.
कमतरता त्वरित भरून काढण्यासाठी अंतर्गत द्रवपदार्थ दिले जाऊ शकतात.
काही प्रकरणांमध्ये नाक किंवा तोंडातून नळीद्वारे भरवून अन्नाची गरज भागवली जाऊ शकते. रुग्णांना हलका आणि वारंवार आहार देणे आवश्यक असते.
गंभीर प्रकारणांमध्ये आणि परिस्थितींमध्ये शस्त्रक्रियेची भूमिका महत्वाची असते.
चरबीयुक्त अन्न आणि साखर, प्रथिन आणि चरबीयुक्त खाद्यपदार्थ खाणे टाळावे.