शिंगल्स काय आहे?
शिंगल्स विषाणूंचे एक संसर्ग आहे जो त्वचेच्या स्पष्ट सीमांकन केलेल्या भागावर फोड किंवा रॅशला कारणीभूत ठरतो. हा रोग कांजण्यांसाठी कारणीभूत विषाणू व्हॅरिसेला झॉस्टर मुळे होतो. या विषाणू चे सुप्त संसर्ग पुनः सक्रिय झाल्याने शिंगल्स होतात. कांजण्या बर्या झाल्यानंतरही हे विषाणू मज्जातंतूंच्या टिश्यू मध्ये निष्क्रिय राहतात आणि नंतर सक्रिय झाल्याने शिंगल्स च
या स्वरुपात दिसून येतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
याची प्रारंभिक चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत:
उशीरा दिसून येणारी चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- शरीराच्या एका भागात किंवा एका बाजूला लाल रॅश. ( सामान्यतः रॅश एका बाजूला दिसून येतात. हे फक्त काही कमकुवत रोग प्रतिकारशक्तीच्या विशिष्ट प्रकरणात खूप जास्त प्रमाणात आणि साधारणपणे पाहिले जाते.)
- द्रवाने भरलेले लहान फोडं जे शेवटी फुटतात आणि त्यावश खपली चढते.
इतर लक्षणे पुढील प्रमाणे आहेत:
- ताप.
- प्रकाश आणि स्पर्शाची संवेदनशीलता.
- डोकेदुखी.
- थकवा.
- हुडहुडी भरणे.
- पोट बिघडणे.
- शिंगल्स सामान्यतः कंबरेवरील किंवा छातीवरील बँडच्या स्वरूपात दिसून येतात.
गंभीर प्रकरणात रोग प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने ही लक्षणे दिसून येतात:
- कांजण्यासारखे सर्वी कडे पसरलेले फोड आणि रॅश.
- डोळ्यावर परिणाम होऊ शकते ज्यामुळे अधंत्वाची शक्यता आहे.
- त्वचेचा बॅक्टेरियल संसर्ग.
याचे मुख्य कारणं काय आहेत?
हर्पिस व्हायरस या समूहाचा भाग असणाऱ्या व्हॅरिसेला झॉस्टर या विषाणूंमुळे शिंगल्स होतो.
पूर्वी कांजण्या झालेल्या व्यक्तीला शिंगल्स होतो. हे विषाणू मज्जातंतूंच्या टिश्यू मध्ये निष्क्रिय राहतात आणि नंतर रोग प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने सक्रिय होतात.
वयोवृद्ध, एचआयव्ही किंवा कर्करोगानी पिडीत किंवा खूप काळापासून स्टेरॉइड्स सारखे औषधे घेणाऱ्या लोकांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते. म्हणून या गटातील लोकांमध्ये शिंगल्स सामान्यपणे पाहिला जातो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
वैद्यकीय इतिहास आणि सखोल शारीरिक चाचणी करून शिंगल्स चे निदान करता येते.
खरवडून काढलेला टिश्यूंचा समूह किंवा फोडातून घेतलेला स्वाब यांचे परिक्षण केले जाते.
शिंगल्स नैसर्गिकरित्या काही आठवड्यात आपोआपच बरे होतात. संसर्ग टाळायला याच्या रुग्णाची काळजी घेणाऱ्यांना आणि लहान मुलांना शिंगल्स ची लस घ्यायचा सल्ला दिला जातो.
औषधे: लवकर बरे वाटण्यासाठी आणि लक्षणे कमी करायला अँटी व्हायरल दिले जातात. ओपिऑइड चे डेरिव्हेटिहस, पॅरासिटामोल, इब्युप्रोफिन सारखे पेनकिलर आणि स्टेरॉइड्स वापरले जाऊ शकतात.
स्वतःची काळजी:
- कोल्ड कंप्रेस.
- कॅलमाइन लोशन वापरणे.
- ओटमील बाथ घेणे.
- झॉस्टर विषाणूंची पूर्वी बाधा झालेल्या लोकांशी संपर्क टाळावा कारण कांजण्यांच्या स्वरुपात या संसर्गाचा प्रसार होऊ शकतो.