लोहितांग ज्वर म्हणजे काय?
लोहितांग ज्वर हा स्ट्रेप्टोकोकाय नावाच्या बॅक्टेरिया मुळे होणारा संसर्ग आहे. बाधित व्यक्तीत आजाराची लक्षणे विकसित होण्यासाठी 2 ते 5 दिवस लागतात. हा एक संसर्गजन्य रोग असून सामान्यतः मुलांमध्ये आढळतो आणि याची सुरूवात घसा खवखवण्या पासून होते. तरीही, प्रौढ व्यक्ती बॅक्टेरियाचे मुख्य वाहक असू शकतात. ताप, उलट्या, सर्दी आणि पोटात दुखणे ही या आजाराची इतर लक्षणे आहेत, तर मुलांमध्ये जीभेवरती पांढरा थर विकसित होऊ शकतो. एकूणच, बॅक्टेरियममुळे टाॅन्सिलायटिझ, त्वचेचा संसर्ग, तीव्र संधीवात होण्याची शक्यता असते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
आजाराची चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :
- घसा खवखवणे.
- ताप.
- सुजलेले लाल टाॅन्सिल्स.
- सुजलेली किंवा स्ट्राॅबेरी (लाल आणि टेंगूळ आल्यासारखी) जीभ.
- मळमळ.
- उलट्या.
- भूक न लागणे.
- संपूर्ण शरीरावर सनबर्न सारखी सूक्ष्म लाल पुरळ, जे या रोगाला स्कारलेट फिवर असे नाव देते.
गंभीर प्रकरणात, पुढील लक्षणांमुळे कॉम्प्लिकेशन वाढू शकतात:
- टाॅन्सिल्सच्या भोवती पस पाॅकेट्स.
- लसिका सूजणे.
- त्वचेचा किंवा कानाचा संसर्ग.
- संधीवाताचा ताप.
- न्युमोनिया.
- सांधे सुजणे किंवा संधिवात
याची मुख्य कारणं काय आहेत?
संसर्ग खालील गोष्टींद्वारे प्रसारित होतो :
- बाधित व्यक्तीच्या खोकला किंवा शिंक यामधील बॅक्टेरिया असलेले श्वसनाचे थेंब.
- बाधित व्यक्तीशी थेट संपर्क.
- दूषित भागाशी संपर्क आणि नंतर तोंड किंवा नाकाला स्पर्श करणे.
- टाॅवेल, कपडे किंवा अन्न यांसारख्या वैयक्तिक गोष्टी शेअर करणे.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
घशाला घासणे आणि मायक्रोस्कोप खाली स्वॅब ची तपासणी करून स्थितीचे निदान करण्यासाठी स्ट्रेप टेस्ट केली जाते. शिवाय, लोहितांग ज्वराच्या अस्तित्वाची पुष्टी करण्यासाठी घश्याचा स्वॅब कल्चर केला जातो. मुलांसाठी आणि युवांसाठी हे महत्वाचे आहे कारण त्यांना उपचार न केलेल्या लोहितांग ज्वरामुळे संधिवात होण्याचा धोका असतो.
आजाराच्या उपचारामध्ये पेनिसिलिन किंवा ॲमाॅक्सिलिन चा वापर करून ॲन्टीबायोटीक थेरपी दिली जाते. 20 दिवसांसाठी पथ्ये सांगितली जातात जी पाळली पाहिजेत. बरेच रुग्ण पाचव्या दिवशीच बरे होतात. घरगुती उपायांमध्ये मीठाच्या पाण्याच्या गुळण्या, पुरेसे पाणी पिणे आणि उबदार सूप यासारखे आरामदायी पदार्थ घेणे समाविष्ट आहे.