र्हुमॅटॉईड संधिवात म्हणजे काय?
र्हुमॅटॉईड संधिवात या प्रकारात सान्ध्यांच्या आजूबाजूला सूज येते आणि दाह होतो तसेच सांधेदुखीही होते. हा एक ऑटोइम्युन आजार आहे ज्यात आपली इम्युन सिस्टम निरोगी पेशींना परकीय पदार्थ समजून त्यांच्यावर हल्ला करतात.
वेळेवर उपचार न केल्यास कार्टीलेजचे म्हणजेच हाडे आणि सांध्यांवर असलेल्या आवरणाचे नुकसान होऊ शकते. कार्टीलेजच्या ह्या नुकसानामुळे सांध्यांमधले अंतरही कमी होते. त्यामुळे परिस्थिति अतिशय वेदनामय होते परंतु औषधोपचारांनी नियंत्रणात आणता येऊ शकते.
र्हुमॅटॉईड संधिवात हाताच्या, पायांच्या, कोपरांच्या, गुढग्यांच्या, मनगटाच्या तसेच पावलाच्या सांध्यांवर परिणाम करतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून किंवा श्वसन संस्थेतून ह्याचा प्रसार होतो त्यामुळे याला सिस्टेमिक आजार असे म्हटले जाते.
याच्याशी निगडीत चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
या प्रकारची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- सकाळी उठल्यावर सांधे आखडतात परंतु दिवसभराच्या हालचालीमुळे नंतर मोकळे होतात.
- थकवा.
- अॅनिमिया.
- वेदनादायक सांधेदुखी.
- डोळे आणि तोंड कोरडे पडणे.
- कोपर, हात, गुडघे आणि इतर सांध्यांमधे गोळे येणे.
- सांधे सुजणे आणि त्यावर लालसरपणा दिसणे.
- छातीत दुखणे.
- ताप आणि वजन कमी होणे.
या प्रकाराचा हात आणि पाय या दोन्हीवर परिणाम होतो. वयाच्या तिशीनंतर सांधेदुखी सुरू होऊ शकते तसेच पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. कधी कधी वेदना आणि थकवा तसेच सांध्यांचा दाह अचानक सुरू होतो आणि परिस्थिति अजून गंभीर होते.
याची प्रमुख कारणे काय आहेत?
या आजाराला कारणीभूत असणारे घटक अजूनपर्यंत माहीत झाले नसले तरी पुढील दिलेले घटक या आजाराची पूर्वचिन्हे असू शकतात:
- जीन्सचे उत्परिवर्तन.
- वडिलांकडून असलेला सांधेदुखीचा पूर्वेतिहास.
- संसर्ग.
- हार्मोन्समधील बदल.
- मानसिक त्रास किंवा ताण.
- धूम्रपान.
- प्रदूषणकारक गोष्टींशी संपर्क.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
वर दिलेल्या लक्षणांमधून या आजारचे निदान होऊ शकते. तसेच शारीरिक तपासणी, क्ष-किरण आणि रक्ताच्या चाचण्या यामधुनही आजारचे निदान होऊ शकते. त्वरित निदान आणि उपचार झाल्यास ते या आजारावर प्रभावी ठरू शकतात.
उपचार:
उपचाराचे दोन प्रकार आहेत, प्री-एम्प्टिव्ह आणि रिअॅक्टिव्ह जसे की:
- वेदनाशामक औषधे.
- नॉन स्टेरोइडल अॅन्टी इन्फ्लेमेटरी औषधे जसे इब्युप्रोफेन.
- कॉर्टीकोस्टेरोइड्स जसे प्रेडनीसोलोन.
- डिसीज मॉडीफाइंग अॅन्टी र्हुमॅटीक औषधे जसे मिथोट्रीकसेट.
- बायोलॉजीकल औषधे जसे इन्फ्लिक्जीमॅब.
- स्ट्रेन्थ ट्रेनिंग आणि ताई ची सारखे व्यायाम.
- वेदना नियंत्रण तसेच सान्ध्यांची हालचाल कायम ठेवण्यासाठी फिजीओथेरपी.
- वेदना आणि दाब कमी करण्यासाठी उपयुक्त असे गॅजेट्स.
- विश्रांती.
- आरोग्यपूर्ण आहार आणि त्यात ओमेगा 3 या फॅटी अॅसिडचा समावेश.
- मालीश, अॅक्युपंक्चरसारखे इतर उपचार घेणे.