रेय सिंड्रोम - Reye's syndrome in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 04, 2019

July 31, 2020

रेय सिंड्रोम
रेय सिंड्रोम

रेय सिंड्रोम काय आहे?

रेय सिंड्रोम (आरएस) हा विकार प्रामुख्याने मुलांमध्ये दिसून येतो आणि याचे वैशिष्ट म्हणजे यकृताला हानी होते आणि मेंदूमध्ये सूज येते, याचा इतर अवयवांवरही परिणाम होतो. हे क्वचितच प्रौढांमध्ये दिसून येते.

याची मुख्य चिन्ह आणि लक्षणे काय आहेत?

आरएसची चिन्हे आणि लक्षणे व्हायरल इन्फेक्शन (सर्दी, फ्लू किंवा कांजण्या) च्या काही दिवसांच्या आत विकसित होतात, जी प्रारंभिक लक्षणांसह सुरू होतात जसे:

  • थकवा.
  • वारंवार उलट्या होणे.
  • उत्साह कमी होणे किंवा कुतूहल कमी होणे.
  • जलद श्वास.
  • दौरे किंवा फिट.

रोग अधिक वाढल्यास लक्षणे अधिक गंभीर होतात आणि त्याच्या लक्षणात यांचा समावेश आहे:

  • आक्रमक वर्तन.
  • चिडचिड वाढणे.
  • गंभीर चिंता.      
  • भ्रमनिरासा सह गोंधळ.
  • चेतना कमी होणे आणि कधीकधी कोमा.

याची मुख्य कारणे काय आहेत?

मायटोकॉन्ड्रिया (शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये उपस्थित उर्जा उत्पादक घटक) मधील लहान संरचनांना नुकसान होते जे आरएसमध्ये दिसून येते. आणि याचा यकृतावर परिणाम होतो आणि शरीरात विषारी पदार्थांची निर्मिती होते. यामुळे संपूर्ण शरीराला नुकसान होते ज्यामुळे मेंदूत सूज येते. आरएसचे मुख्य कारण अज्ञात असले तरी काही संबंधित परिस्थितींमध्ये हे समाविष्ट कारणे आहेत:

  • व्हायरल इन्फेक्शन (सामान्य सर्दी, फ्लू किंवा कांजण्या).
  • ॲस्पिरिन सारख्या औषधांमुळे ट्रिगर होते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर लक्षणांचा पूर्ण इतिहास घेतात आणि संपूर्ण शारीरिक तपासणी केली जाते. पुढील चाचण्यांचा सल्ला दिला जातो:

  • काही रक्त चाचण्या जसे:         
    • अ‍ॅस्पार्टेट अमिनोट्रांस्फरंझ (एएसटी) और अलॅनिन अमिनोट्रांस्फरंझ (एएलटी) चाचणी.
    • सीरम इलेक्ट्रोलाइट्स.
    •  ब्लड शुगर लेव्हल.
  • सेरेब्रोस्पायनल फ्लुइड (सीएसएफ) मूल्यांकन.
  • मेंदू आणि यकृताचा संगणकीकृत टोमोग्राफी (सीटी) स्कॅन.
  • यकृताची अल्ट्रासोनोग्राफी.
  • यकृताची बायोप्सी.
  • लंबर पंचर.

रेय सिंड्रोमचे व्यवस्थापनः

जेव्हा आरएसचे निदान होते तेव्हा तत्काळ हॉस्पिटलायझेशन आणि इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये प्रवेश आवश्यक असतो. रक्तदाब, नाडी, श्वसन दर आणि शरीराचे तापमानावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते. उपचारांचे मुख्य उद्दिष्ट याची लक्षणे कमी करून शरीराची महत्त्वपूर्ण कार्ये सुरळीत चालू ठेवणे हे असते. यात समावेश आहे - श्वसन आणि रक्त परिसंचरण, आणि सूज आल्यामुळे मेंदूचे नुकसान होण्यापासून संरक्षण. कधीकधी, व्हेंटिलेटर देखील आवश्यक असू शकते. उपचारांसाठी आवश्यक औषधांमध्ये समाविष्ट आहेत:

  • इलेक्ट्रोलाइट्स आणि द्रवपदार्थ - मीठ, खनिज आणि पोषक घटकांची पातळी सुधारण्यासाठी.
  • डाययुरेक्टिक्स- शरीरातील अतिरिक्त पाणी कमी करण्यास मदत करते, यामुळे मेंदूमधील सूज कमी होते
  • अमोनिया डिटोक्सिफायर - शरीरातील अमोनियाचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.
  • जंतुनाशकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अँटीकॉनव्हल्झंट्स.

 



संदर्भ

  1. National Institute of Neurological Disorders and Stroke [internet]. US Department of Health and Human Services; Reye's Syndrome Information Page.
  2. National Health Service [Internet]. UK; Reye's syndrome.
  3. National Organization for Rare Disorders [Internet]; Reye Syndrome.
  4. Chapman J, Arnold JK. Reye Syndrome. [Updated 2019 Jan 17]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Reye syndrome.