रेनॉड्स फिनॉमेना काय आहे ?
रेनॉड्स फिनॉमेना ही अशी स्थिती आहे जी हाताच्या आणि पायांच्या बोटांचा रंग बदलल्याने (पांढरा, निळा आणि लाल) ओळखली जाते. हे अतिशय थंड वातावरणामुळे आणि ताणामुळे होते कारण या परिस्थितीत हातापायामध्ये रक्तप्रवाह खूप कमी होतो. ते अंतर्निहित कारणांनुसार प्राथमिक किंवा दुय्यम असू शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?
या स्थितीची लक्षणे अधूनमधून उद्भवतात जेव्हा व्यक्ती याचे दौरे अनुभवतात आणि त्यामध्ये यांचा समावेश होतो:
- प्रभावित भागांमध्ये खालील संवेदना होऊ शकतात:
- वेदना.
- टाचण्या आणि सुया टोचल्यासारख्या संवेदना.
- बधिरपणा.
- मुंग्या येणे.
- अस्वस्थता.
- ओळ्खण्यायोग्य निळा,पांढरा आणि लाल डागांसोबत रंगांमध्ये बदल.
- प्रभावित भाग हलवणे कठीण होते.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
रेनॉड्स फिनॉमेना हा सामान्यतः काही व्यक्तींच्या हाताची बोटं आणि पायांमधे अतिसंवेदनशील रक्तवाहिन्या असल्याने होत असतो. प्राथमिक रेनॉड्स फिनॉमेना हा आयडियोपॅथीक आहे ( जिथे कारण अज्ञात असते) आणि दुय्यम रेनॉड्स फिनॉमेनाची कारणे पुढील असू शकतात :
- काही स्थिती जसे स्वयंप्रतिकार (ऑटोइम्युन) रोग आणि संधिवात.
- शीतदंश (फ्रॉस्टबाईट).
- औषधे, ज्यांमध्ये बीटा ब्लॉकर आणि काही किमोथेरॅपीटिक एजंटचा समावेश होतो.
- यांत्रिक कंपन.
- अथेरोस्क्लेरॉसिस (धमन्यांचे संकुचन आणि कठोरता).
- धुम्रपान.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
संपूर्ण वैद्यकीय इतिहास आणि कसून केलेल्या शारीरिक तपासणीच्या आधारावर निदान केले जातात, त्यानंतरच्या चाचण्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो :
- ऑटोइम्युनिटीची उपस्थिती तपासण्यासाठी रक्त चाचणी.
- नेलफोल्ड कॅपिलरोस्कोपी नावाच्या चाचणीचा वापर करून नखांच्या खालच्या रक्तवाहिन्यांचे परीक्षण.
- नख्यांच्या खाली असलेल्या टिश्यूंचे अत्यंत सूक्ष्म परीक्षण.
- कोल्ड स्टीम्युलेशन टेस्ट.
परिस्थितीच्या व्यवस्थापनामध्ये खालील उपाय समाविष्ट आहे:
- जीवनशैलीतील बदल, जसे की:
- हल्ल्याचे पहिले लक्षण दिसताच लवकरात लवकर हात उबदार पाण्यात भिजवा.
- थंड वातावरणात हात गरम ठेवणाऱ्या मशीन चा वापर (हँड वॉर्मर) आणि हातमोजे यांचा वापराने हात आणि पाय गरम ठेवा.
- याला चालना देणारी काही औषधे आणि ताण टाळा.
- रेनॉड्स फिनॉमेना थांबविण्यासाठी धूम्रपान सोडणे हा एक महत्वाचा बदल आहे.
- औषधे:
- रक्तदाब औषधे जसे की कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स आणि अँजिओटेन्सिन-रिसेप्टर ब्लॉकर जे प्रभावित क्षेत्रात रक्त वाहिन्या विस्तृत करून रक्ताचे वाहन वाढवतात, ते दिले जाऊ शकतात.
- सिल्डेनाफिल किंवा प्रोस्टेसायक्लिन्स वापरुन कॉम्प्लिकेशन (अल्सर) चा उपचार केला जाऊ शकतो.
- लक्षणांपासून आराम मिळवायला खालील औषधे वापरली जाऊ शकतात:
- टॉपिकल मलम.
- सिलेक्टिव्ह-सेरोटोनिन-रीअपटेक इन्हिबिटर(एसएसआरआय-SSRIs)
- कोलेस्ट्रॉल-कमी करणारी (स्टॅटिन) औषधे.