सारांश

रेबीज हा आजार अशा विषाणूंमूळे होतो, जे रेबीजग्रस्त प्राण्याच्या लाळेच्या माध्यमातून पसरतात. रेबीजचे बरेच वाहक आहेत, ज्यात सर्वात अधिक आहेत कुत्री आणि वटवाघुळे. विषाणूग्रस्त प्राण्याच्या चाव्याने किंवा त्याची लाळ उघड्या जखमेच्या संपर्कात आल्यास पसरतात. एकदा पसरले की विषाणू शरीरात निवास करायला सुरु करातात आणि मज्जातंतू प्रणालीवर आक्रमण करून कोमा किंवा उपचार न केल्यास शेवटी मृत्यूस कारणीभूत ठरतात. रेबीजचे दोन  प्रकार आहेत- आक्रमक आणि परजीवी. रेबीजच्या प्रमूख लक्षणांमध्ये प्रकाशाप्रतीची संवेदनशीलता, वेदना आणि स्नायूं अकडणे,लाळेचे अतिप्रमाणात गळणे, आणि पाण्याची भीती वाटणे समविष्ट आहे. आजारांच्या प्रगत चरणांमध्ये, कोमा किंवा पक्षघात होण्याची भीती अधिक असते. रेबीजच्या उपचारांमध्ये संपूर्ण ग्रस्त भागाला धुणे, आणि रेबीजरोधक लसींच्या मात्रा पुढील काही आठवडे घेणे समाविष्ट आहे. रेबीजचा उपचार वेळेत न झाल्यास काही गंभीर परिणाम होण्याच्या शक्यता असतात. काहींना झटके येणे,श्वसन थांबणे,आणि मेंदूवर सूज येण्याचा अनुभव येतो. रेबीज पूर्णपणे बरा  होऊ शकतो आणि वेळेत उपचार झाल्यास रेबीज झालेले लोक सुदृढ व सामान्य जीवन जगू  शकतात.

Rabies symptoms

रेबीज प्रगतीशील आजार आहे, म्हणजे आजाराची प्रगती झाल्यास लक्षणे तीव्र होतात. व्यक्तीला विषाणूने ग्रासल्यानंतर किती वेळ जातो यावर रेबीजचे उपचार अवलंबून आहेत. रेबीजची लक्षणे विकसित व्हायला 30 ते 60 दिवस लागतात. रेबीज संक्रमणाच्या भिन्न चरणांमधील लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • प्रारंभ
    संक्रमण झाल्यानंतर सुरूवातीच्या दिवसांमध्ये, जखम झालेल्या जागेच्या सभोवतालच्या भागात संवेदना किंवा वेदना जाणवतात. यासोबतच थोडा त्रास जसे खाजवणे, आजाराची पहिली चिन्हे आहेत, जी साधारणतः फार गंभीरतेने घेतली जात नाहीत.
  • प्रोड्रोमल
    काही वेळाने कणकण होणे, मळमळ, थंडी भरणे, सर्दी, आणि ताप अशी चिन्हे दिसतात. स्नायूंमध्ये वेदना जणवणे, चिडचिडपणाची जाणिव यासारखी लक्षणे या चरणात दिसतात. हे चिन्हे नित्यक्रमाच्या विषाणूजन्य संक्रमणाची किंवा तापाच्या सामान्य प्रकारातली असण्याचा गैरसमज होतो.
  • तीव्रतेचा न्युरोलॉजीक काळ
    काही वेळानंतर, लक्षणे अतीशय तीव्र होतात, ज्याने खूप ताप येतो, संभ्रमाची अवस्था होते, आणि स्वभावात आक्रमकता येते. या चरणात आजाराचे दौरे येणे सामान्य आहे. कंप, आंशीक पक्षाघात, प्रकाशाची भीती वाटणे, श्वसन जलद होणे (अतीवायुविजन), आणि अती प्रमणात लाळगळती  ही काही लक्षणे दिसून येतात.
  • अंतीम चरण
    रेबीजग्रस्त लोकांना पाण्याच्या संपर्कात आल्यावर भीती किंवा भयाचे झटके येतात. या स्थितीला हायड्रोफोबिआ किंवा जल भय म्हणून जाणले जाते. या चरणात, महत्वाचे अवयव काम करायचे बंद झाल्याने ग्रस्त व्यक्तीला जीवंत ठेवण्यासाठी कृत्रिम श्वसोच्छ्वास आणि उपचारांवर ठेवले जाते. शेवटी, व्यक्ती कोमामध्ये जातो/जाते  आणि स्नायूंच्या हालचाली मर्यादीत होण्यासोबतच श्वसनाला त्रास होतो.हे अल्पकालीन चरण आहे आणि काही दिवसातच मृत्यू होतो.

Rabies treatment

व्यक्तीला चावा घेतल्याची वेळ, चावा घेतलेला प्राणी, आणि लक्षणं दिसण्याच्या प्रकारावरून उपचारांचा मार्ग निर्धारीत होतो. रेबीजच्या उपचरांची आदर्श प्रक्रीया अशी आहे:

  • जखम झालेला भाग  औषधयुक्त साबण आणि पाणी वापरून कमीतकमी 15 मिनीटे पूर्णपणे धुणे आणि निर्जंतूक करणे. त्वचेवर छिद्र पडले असल्यास त्यावर साबणाच्या पाण्याचे झोत मारले जातात.तातडीची आवश्यकता नसल्यास, जखमा न शिवता उघड्या ठेवण्याला प्राधान्य दिले जाते.
  • तत्पश्चात, टिटॅनस आणि/किंवा प्रतिजैविकांची लस टोचतात.
  • प्राथमिक व्यवस्था केल्यावर,व्यक्तीला रेबीजची लस टोचतात. जर व्यक्तीला पाळीव प्रण्याने चावा घेतला असेल आणि लक्षणे अस्पष्ट असतील, तर डॉक्टर प्राणी आणि व्यक्ती दोघांनाही काही दिवस देखरेखीखाली ठेवण्याला प्राधान्य देतात.पाळीव प्राणी देखरेखीखाली ठेवता न येण्याच्या बाबतीत, रेबीजच्या प्रभावाचा अंदाज घेण्यासाठी शेजारपाजारच्या जागेची प्राथमिक चाचणी करतात. प्राथमिक चाचणी नंतर, प्राण्यामध्ये रेबीजचे तत्व सापडल्यास त्या प्राण्याला कृत्रिमरित्या मारल्या जाते व रेबीजची संपुर्णपणे तपासणी केली जाते. प्राणी निरीक्षणाखाली ठेवली गेली असल्यास आणि रेबीजची वागणूक न दिसल्यास लसीकरणाची आवश्यकता उरत नाही.
  • प्राण्याने चावा घेतलेल्या व्यक्तिमध्ये रेबीजच्या चिन्हांची शंका असल्यास डॉक्टर तातडीने लसीकरणाचे उपचार प्रारंभ करतात. इम्युनोग्लोबीन लसीच्या मदतीने रेबीज प्रतिजैविके दिली जातात  जी आजारासोबत लढतात आणि रेबीज विषाणूंना वास्तव्य करण्यापासून परावृत्त करतात. पंधरा दिवसात 5 लसी  याप्रमाणे हे लसीकरण केले जाते. काही डॉक्टर लसींच्या या  मात्रा सावधगिरीचे पाऊल म्हणून विशेषतः चावा घेतलेला प्राणी निरीक्षणासाठी उपलब्ध नसल्यास, घ्यायचा सल्ला देतात. जंगली प्राण्याने चावलेले असल्यास हे औषधोपचार तात्काळ केले जातात.
  • ज्या घटनांमध्ये लक्षणे आपला प्रभाव दाखवायला आरंभ करतात आणि रुग्ण लसीकरणाच्या चरणाच्या बाहेर असल्यास निश्चेष्टतेपासून परावृत्त करण्यासाठी औषधोपचार करतात. स्नायू शिथिल करणारी, आणि भय दूर सारणारी औषधे व वेदनाशामके विहित केली जातात. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान व्यक्तीला काळजीपूर्वक निरीक्षणाखाली ठेवले जाते आणि आजाराच्या प्रगतीशी संबंधीत प्रत्येक गुण शोधला जातो.असे कुठलेही चिन्ह लक्षात आल्यास तातडीने डॉक्टरांना सूचित करावे.

जीवनशैलीचे व्यवस्थापन

वेळेत निदान झाल्यावर, रेबीजचे व्यवस्थापन व निवारण शक्य आहे,  ज्यामूळे ग्रस्त व्यक्ती पूर्णपणे सामान्य व सुदृढ जीवन जगण्यास समर्थ असतो. रेबीजच्या उपचारांचे काही दुष्परिणाम आहेत जे काही काळ टिकून राहतात. या दुष्परिणामांमध्ये वेदना, मळमळ, पोटांचे विकार, आणि गुंगी येणे समविष्ट आहे. हे दुष्परिणाम काही काळात बरे  होतात. तरीही, आजार परतून येऊ नये यासाठी व्यक्तीचे संरक्षण आवश्यक आहे. वन्य प्राण्यांच्या संगतीचे किंवा काही साहसपूर्ण जीवनशैलीचे चयन केले असल्याने रेबीजच्या संपर्कात आले असल्यास, भविष्यात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. शेजारी अशी काही घटना घडलेली असल्यास भरकटणाऱ्या प्राण्यांवर नियंत्रण मिळवावे व स्थानिक स्वराज्य संस्थेला( पंचायत किंवा नगरपालिका) सूचित करावे.

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Energy & Power Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for problems like physical and sexual weakness and fatigue, with good results.

Dr Rahul Gam

Infectious Disease
8 Years of Experience

Dr. Arun R

Infectious Disease
5 Years of Experience

Dr. Neha Gupta

Infectious Disease
16 Years of Experience

Dr. Anupama Kumar

Infectious Disease

Medicines listed below are available for Rabies. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

OTC Medicine NamePack SizePrice (Rs.)
Rabipur Vaccine1 Injection in 1 Packet244.51
Carig 1200 IU Injection1 Injection in 1 Packet350.0
Berirab P 300 Injection 2 Ml1 Injection in 1 Packet5286.5
Verorab 2.5 Injection1 Injection in 1 Packet337.0
Zuvirab Vaccine1 Injection in 1 Packet245.8
Abhay Rab Vaccine1 Injection in 1 Packet351.15
Vaxirab N Injection1 Injection in 1 Packet236.25
RABISHIELD 100IU INJECTION 2.5ML1379.0
Thrabis Vaccine1 Vaccine in 1 Vial715.51
Berab Vaccine1 Injection in 1 Packet235.2
Read more...
Read on app