पस म्हणजे काय?
पस हे मृत टिश्यू ,पांढऱ्या रक्त पेशी आणि जिवाणूंचे मिश्रण आहे. पांढऱ्या पेशी शरीरात प्रवेश करू पाहणाऱ्या जिवाणू विरुद्ध लढतात, त्यामुळे जवळपास चे टिश्यू मरतात आणि त्यामुळे पस ने भरलेली कॅव्हिटी बनते ज्याला ॲब्सेस म्हणतात. हे शरीरातील कुठल्याही भागात किंवा अवयवावर होऊ शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
शरीराचा कोणता भाग प्रभावित झाला आहे यानुसार लक्षण वेगवेगळी असतात. पस शी संबंधित सामान्य लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- वेदना.
- ताप.
- थंडी वाजणे.
- प्रभावित जागेवर फुगवटा बनणे .
- सूज आणि दाह.
- प्रभावित जागा गरम होते आणि लालसरपणा होते.
कोणती जागा प्रभावित झाली आहे,त्यानुसार त्या स्नायूंची किंवा अवयवाची हालचाल प्रभावित होते.
याचे मुख्य कारणं काय आहेत?
पस खालील कारणांमुळे होऊ शकतो:
- जेव्हा जिवाणू तूमच्या त्वचेत शिरतात तेव्हा त्वचेवर फोड येतो आणि दाह होण्याची क्रिया सुरु होते. हे सामान्यपणे गुप्तांगामध्ये, काखेत, हातापायावर,नितंबावर होते. जिवाणू कापलेल्या जागेतून, जखमेतून खरचटलेल्या जागेतून आत शिरतात. त्वचेच्या फोडामुळे होणारा पस घाम किंवा तेल ग्रंथी बंद झाल्यामुळे सुद्धा होऊ शकतो.
- शरीरात सुद्धा शस्त्रक्रियेमुळे, इजा किंवा संसर्ग झाल्यामुळे फोड येतो जो जवळपासच्या स्नायूमध्ये पसरतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
डॉक्टर प्रभावित जागा पूर्णपणे तपासतात आणि पस होण्या मागचे कारण जाणून घेण्यासाठी टेस्ट सुचवतात. याच्या निदानावर आधारित ते योग्य उपचार सांगतात. यासाठी खालील निदान पद्धती वापरण्यात येतात.
- जिवाणूच्या हल्ल्यावर शरीराचा प्रतिसाद काय होता हे तपासण्यासाठी आणि संसर्गाची विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी रक्त तपासणी करणे.
- बायोप्सी.
- लघवीमध्ये शुगरची उपसस्थिती जाणून घेण्यासाठी लघवीची चाचणी करणे. यात शुगर असणे मधुमेहाचे लक्षण आहे.
- जर व्यक्तीच्या शरीराच्या आतील भागात फोड झाले असतील, तर प्रभावित जागेचे सखोल परिक्षण करायला एक्स-रे काढणे.
पस चे उपचार त्याच्या कारणावर अवलंबून असतात. त्वचेच्या छोट्या फोडांमधून निघणाऱ्या पसला कोणत्याही उपचाराची गरज नसते. छोट्या फोडांना गरम पाण्याने शेकले तरी ते उपयोगी ठरते. कारणानुसार डॉक्टर खालील उपचाराचे पर्याय देऊ शकतात.
- संसर्गावर उपचार करण्यासाठी अँटिबायोटिक्स.
- काप मारुन ड्रेनेज पद्धतीने संपूर्ण पस बाहेर काढणे.
- आतील अवयवांमध्ये जर पस झाला असेल तर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते.