पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे काय?
पल्मनरी एम्बॉलिझम ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये ब्लड क्लॉट मुळे फुफ्फुसातील रक्त पेशी बंद होतात. जेव्हा क्लॉट रक्त पेशी मधून जाऊन फुफ्फुसापर्यंत जातो व तिथे स्थिरावतो तेव्हा हे घडून येते. क्लॉट जास्त प्रमाणात असल्यास किंवा मोठा झाल्यास ही स्थिती जीवघेणी ठरू शकते. तो फुफ्फीसांना खराब करतो व रक्तातील कमी ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने शरीराच्या विविध भागांना होणारा ऑक्सिजन चा पुरवठा कमी होतो.
याची प्रमुख चिन्हे व लक्षणे काय आहेत?
पल्मनरी एम्बॉलिझम असणाऱ्या जवळ जवळ निम्म्या लोकांमध्ये त्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. बाकी निम्म्या लोकांमध्ये खालील लक्षणे दिसतात:
- श्वसनात त्रास.
- कफा मध्ये रक्त दिसणे.
- छातीत दुखणे.
- पोटरी किंवा मांडीवर सूज येणे.
- पायावर लालसरपणा, नाजूकपणा किंवा स्पर्श केल्यावर दुखणे.
याची प्रमुख कारणं काय आहेत?
हे मुख्यतः डीप व्हेन थ्रॉम्बोसिस या स्थितीमुळे होते, ज्यामध्ये पायाच्या शिरांमध्ये रक्ताचा क्लॉट तयार होतो. जेव्हा हा क्लॉट तुटतो व फुफ्फुसाकडे जातो तेव्हा पल्मनरी एम्बॉलिझम होते.पल्मनरी एम्बॉलिझमची इतर कारणे खालील प्रमाणे आहेत:
- शस्त्रक्रिया, उदा. जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया.
- हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी.
- काॅन्ट्रासेप्टिव्ह पील्स.
- हृदय व फूफ्फुसांच्या विकारासारखी वैद्यकीय स्थिती.
- गर्भधारणा व बाळाचा जन्म.
- आनुवंशिकता.
- स्थूलता.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
पल्मनरी एम्बॉलिझम हे निदान करण्यासाठी अवघड असले तरी निदानाची तंत्रे वापरून डॉक्टर योग्य निदान करण्याचा प्रयत्न करतात:
- व्यक्तीचा सखोल वैद्यकीय इतिहास.
- शारीरिक तपासणी व लक्षणांची उपलब्धता तपासणे.
- इमेजिंग चाचण्या.
- रक्त तपासण्या.
याच्या उपचारांचे ध्येय क्लॉट विरघळवून त्याचे पुन्हा तयार होणे थांबवणे हे असते. खालील उपचार तंत्रे पल्मनरी एम्बॉलिझम साठी वापरली जातात:
- प्राणायाम.
- रक्त पातळ करणे व क्लॉट मोठा होण्यापासून थांबवणे आणि नवीन क्लॉट तयार होऊ न देणे यासाठी अँटीकॉॲग्युलंट औषधांचा सल्ला दिला जातो.
- क्लॉट विरघळवण्यासाठी थ्रॉम्बोलीटीक औषधांचा सल्ला दिला जातो.
उपचार प्रक्रिया:
- व्हेना कावा फिल्टर: व्हेना कावा व्हेन मध्ये फिल्टर टाकला जातो जो क्लॉट ला फुफ्फुसापर्यंत जाण्यापासून थांबवतो.
- कॅथेटर च्या मदतीने क्लॉट काढून टाकणे: ह्या प्रक्रियेमध्ये फुफ्फुसात एक ट्यूब सोडली जाते व क्लॉट काढून टाकले जातात.