प्रीक्लॅम्पसिया आणि इक्लॅम्पसिया काय आहे ?
प्रीक्लॅम्पसिया ही अशी परिस्थिती आहे जेव्हा काही गर्भवती महिलांचा रक्तदाब अचानक वाढतो. ही परिस्थिती त्या महिलांसाठी विशिष्ट आहे ज्यांना रक्तदाबा संबंधित प्रॉब्लेम आधी नव्हते. फार गंभीर केसेसला इक्लॅम्पसिया म्हणतात, जे 2०० पैकी 1 प्रीक्लॅम्पसिया असलेल्या महिलेला होते,जिथे महिलेला रक्तदाब वाढल्यामुळे आकडी येऊ शकते .
याचे मूख्य चिन्हे आणि लक्षण काय आहेत?
एका व्यक्तीचे लक्षणे दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळे असू शकते. तरीही, खालील सर्व लक्षणांचा समावेश आहे:
- प्रीक्लॅम्पसिया: शरीरातील फ्लुइड परत मिळवणे त्यामूळे वजन वाढते, डोकेदूखी, दृष्टी दोष, मळमळ, पोटात दुखणे आणि कमी मूत्र विर्सजन होणे.
- इक्लॅम्पसिया: चेहऱ्यावर आणि हातावर सूज येणे, अंधुक दिसणे, तोल जाणे, काही क्षणांसाठी दृष्टी जाणे, आणि शुद्ध हरपणे.
याचे मुख्य कारण काय आहे?
प्रीक्लॅम्पसिया चे अचूक कारण सांगणे कठीण आहे, तरीही डॉक्टर च्या सल्ल्याप्रमाणे कमी किंवा अयोग्य आहार ,कमी रक्त प्रवाह किंवा गर्भाशयाकडे कमी रक्त प्रवाह असणे ,किंवा काही जनूकीय कारणांमूळे ही परिस्थिती ओढवू शकते. प्रीक्लॅम्पसिया मध्ये, नेहमीचा वाढलेला रक्तदाब सोडून प्लासेंटा मध्ये असलेल्या विकारामूळे किंवा प्रथिनांच्या वाढीमुळे हे होऊ शकते असा डॉक्टरांचा विश्वास आहे.
याचे निदान आणि उपचार काय आहे?
प्रीक्लॅम्पसिया आणि इक्लॅम्पसिया च्या निदानासाठी, डॉक्टर आधी रक्तदाबाची पातळी तपासतात आणि थोड्या थोड्या वेळानी त्यावर लक्ष ठेवतात. ते थोडे रक्ताचे सॅम्पल घेऊन ब्लड काउंट, गोठण्याच्या वेळ बघण्यासाठी प्लेटलेट्स, मूत्रपिंड आणि यकृताचं कार्य सुद्धा तपासतात. याव्यतिरिक्त, मूत्रामधील प्रथिनांची पातळी तपासू शकतात आणि क्रिएटिनाइन पण तपासतात.
प्रीक्लॅम्पसिया आणि इक्लॅम्पसिया ची आदर्श उपचारपद्धती म्हणजे बाळाचा जन्म होणे, आणि हे बाळाच्या वाढीवर आणि आईच्या स्थिती वर पण अवलंबून असते. अशा केसेस मध्ये जिथे सौम्य परिस्थिती असते, डॉक्टर आराम करायला सांगू शकते, रक्तदाबासाठी औषधे आणि नियमित रक्त चाचणी सांगू शकतात. काही गंभीर केसेस मध्ये, डॉक्टर गर्भवती महिलेला दवाखान्यात भरती व्हायला सांगू शकते. जर व्यक्तीला इक्लॅम्पसिया असेल, तर डॉक्टर आकडीला प्रतिबंध करण्यासाठी अँटिकोऊलसन्ट लिहून देऊ शकतात. प्रीक्लॅम्पसिया आणि इक्लॅम्पसियाचे सगळे लक्षण बाळंतपणानंतर 6 आठवड्याच्या काळात जायला पाहिजे हे अपेक्षित असते.