अकाली पौगंडावस्था म्हणजे काय?
अकाली पौगंडावस्था ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये पौगंडावस्था सुरु होण्याच्या सामान्य वयाच्या आधी पौगंडावस्थेचे लक्षणे दिसू लागतात. जर 8 वर्षाच्या आतील मुलींमध्ये आणि 9 वर्षाच्या आतील मुलांमध्ये पौगंडावस्थेचे चिन्हे दिसू लागले तर त्याला अकाली पौगंडावस्था असे मानले जाते.
याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?
पौगंडावस्थेशी संबंधित शारीरिक बदल होणे हे सर्वात लवकर दिसून येणारे चिन्हे आहेत. मुलींमध्ये स्तनांची वाढ दिसून येते, जी एकतर्फी असू शकते. त्याचवेळेस काखेतील केसांची वाढ देखील दिसू शकते. योनिलिंगा मध्ये वाढ असू शकते किंवा नाही. ऋतुप्राप्ती ही स्तन वाढी नंतर 2 ते 3 वर्षांनी दिसून येणारी घटना आहे. पौगंडावस्थे पूर्वी, मुलींमध्ये बरेच पुरळ दिसू शकतात. मुलांमध्ये वृषणाच्या वाढीसोबत अंदशयाची आणि जननेंद्रियाची देखील वाढ होते. यासोबत प्रवेगात वाढ, पुरळ, कंठ फुटणे आणि इतर दुय्यम लैगिंक अवयवांची वाढ दिसून येते.मुली व मुलं दोघांमध्ये पण जघन मध्ये केसांची वाढ दिसून येते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
पौगंडावस्था हा वाढीतील सामान्य भाग आहे. विविध घटकांवर अव्यवमुख वाढ अवलंबून असते. अनुवंशिकदृष्ट्या सुध्दा हे निश्चित करता येतं.जर पालकांमध्ये किंवा भावंडांमध्ये अकाली पौगंडावस्था असेल तर दुसऱ्या मुलांमध्ये सुध्दा ते दिसू शकते. पर्यायी, हायपोथॅलॅमस मध्ये ट्यूमर हे अँड्रोजनच्या तीव्र वाढीसाठी कारणीभूत असू शकते. अकाली पौगंडावस्थे मध्ये लवकर लैंगिक वाढ होते ज्यामुळे मुली आणि मुलांमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन सारख्या हॉर्मोन्स ची लवकर सुरुवात होते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
शरीरात घडणारे बदल इतके सूक्ष्म असतात की सुरुवातीला ते लक्षात येऊ शकत नाहीत. त्यामुळे खात्री करण्यासाठी, बायोकेमिकल तपासणी केली जाऊ शकते ज्यामध्ये शरीरातील अँड्रॉजेन्स ची पातळी तपासण्यात येते. निदान नक्की करण्यासाठी एक्स-रे आणि हॉर्मोन्स पडताळणीच्या तपासण्या केल्या जाऊ शकतात. मुलांमधील वाढलेली टेस्टोस्टेरॉन ची पातळी आणि मुलींमधील ऑस्टे रेडिओल पातळी ही अकाली पौगंडावस्थेची निर्देशक आहेत. यासोबत थायरॉईडची पातळी देखील तपासली जाऊ शकते.
उपचार हे कारणांवर अवलंबून आहेत. ट्यूमर असल्यास शस्त्रक्रिया करण्याची गरज भासू शकते. नाहीतर, हॉर्मोन्स ची पातळी नियमित करण्यासाठी हॉरर्मोन सोडणाऱ्या गोनेडोट्रॉपीन सारखे अँटागोनिस्ट्स देण्यात येऊ शकतात. सीमारेषेवरच्या प्रकरणांमध्ये, वयाच्या 8-9 वर्षात जे मुलं अकाली पौगंडावस्थेची चिन्हे दर्शवतात, त्यांना विना उपचार ठेवण्यात येऊ शकतं आणि फक्त त्यांची देखरेख करणे आवश्यक आहे.