न्यूमोथोरॅक्स काय आहे?
फुफुसाला आतून आणि बाहेरून आवरण असते त्याला प्लेयूरा म्हणतात. या दोन आवरणाच्या मध्ये जागा असते तिला प्ल्युरल कॅव्हिटी म्हणतात जी हवा किंवा फ्लुइड ने भरलेली असते, पण ही कॅव्हिटी सहसा कोसळते आणि कमी प्रमाणात प्ल्युरल फ्लुइड यामध्ये राहते.
जेव्हा हवा या कॅव्हिटी मधून झिरपते, म्हणजेच, दोन प्ल्युरी च्या मध्ये, तेव्हा न्यूमोथोरॅक्स होतो. दुसरा न्यूमोथोरॅक्स हा फुफुसाच्या तपासणीमुळे होऊ शकतो. प्राथमिक न्यूमोथोरॅक्स हा कोणत्याही रोगाच्या अनुपस्थितीत होतो आणि हा स्वयंप्रेरित आहे.
कधीकधी, फसलेली हवा हृदयाची जागा बदलवू शकते आणि इतर रचना जसे अन्नाची नळी आणि रक्तभिसरणावर परिणाम करू शकते. या परिस्थितीला, टेन्शन न्यूमोथोरॅक्स म्हणतात, हे जीवघेणे ठरू शकते आणि वैद्यकीय आणीबाणी असू शकते.
याचे मूख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
न्यूमोथोरॅक्स च्या प्रकारावरून त्याचे लक्षणे बदलू शकतात. टेन्शन न्यूमोथोरॅक्स व्यतिरिक्त रुग्णाला सौम्य अस्वस्थ वाटू शकते आणि आपल्याला न्यूमोथोरॅक्स आहे याची जाणीवही होत नाही. श्वास घ्यायला त्रास होणे आणि छातीत दुखणे हे सामान्य लक्षणे आहेत. हे रुग्णाला वैद्यकीय मदत मिळण्याच्या आधी होऊ शकतात. वैद्यकीय लक्षणांमध्ये कमी ऑक्सिजन, श्वसनाचा वेग वाढणे,आणि कमी रक्तदाब याचा समावेश होतो.
टेन्शन न्यूमोथोरॅक्स हे खूप स्पष्ट आहे. हे गंभीर दुखापत, रेस्क्युसीटेशन, व्हेंटिलेशन या केसेस शी संबंधित होते. रुग्णाला श्वसनाचा त्रास होऊन ऑक्सिजन ची मात्रा कमी होते. सुरवातीला, टॅचीकार्डिया आणि टॅचीपनॉइआ दिसू शकते याच्या मागोमाग हैपॉक्सिया, सायनोसिस आणि हायपोव्हेंटिलेशन होऊ शकते. श्वासनलिका एका बाजूला सरकते. फार कमी वेळा, रुग्ण पोटात दुखण्याची तक्रार करू शकतो.
याचे मूख्य कारण काय आहे?
प्ल्युरल कॅव्हिटी मध्ये बुडबुड्याच्या फुटण्यामुळे हवा आत घुसते त्याला ब्लेब किंवा इजा म्हणतात. फुफुसे आतमध्ये संकुचित होतात, त्यामुळे श्वसनाच्या शक्तीवर परिणाम होतो. टेन्शन न्यूमोथोरॅक्स जेव्हा स्नायूला इजा होते तेव्हा हे होते यामध्ये प्ल्युरल कॅव्हिटी मध्ये हवेचा झोत आत येतो पण बाहेर जान्यावर प्रतिबंध येतो. त्यामुळे,प्रत्येक श्वासाबरोबर फुफुसे जास्तीत जास्त आकुंचतात.
न्यूमोथोरॅक्स होण्याचा धोका धूम्रपान, अस्थमा, उंच-बारीकअंगकाठी, सीओपीडी, सिस्टिक फायब्रोसिस, इत्यादी मूळे आणखी वाढतो.
याचे निदान आणि उपचार काय आहे?
याच्या निदानाची खात्री वैद्यकीय तपासणीद्वारे, एक्स-रे किंवा सीटी स्कॅन द्वारे केली जाते. न्यूमोथोरॅक्स च्या स्वभावावर आणि आकारावर याचे उपचार अवलंबून असते. लहान न्यूमोथोरॅक्स असेल तर, रुग्ण उपचारनंतर लगेचच त्याच दिवशी घरी जाऊ शकतो आणि फॉलो-अप गरजेचे असते.
टेन्शन न्यूमोथोरॅक्स च्या केसेस मध्ये किंवा काही जास्त गंभीर केसेस मध्ये, छातीमधून हवा बाहेर काढण्यासाठी ताबडतोब नीडल आत टाकणे आवश्यक आहे. पुढे, चेस्ट ट्यूब आत टाकतात. हे परत होण्याचा धोका आहे; त्यामूळे, काळजी घेणे आवश्यक आहे.