न्युमोकॉकल आजार म्हणजे काय?
न्युमोकॉकल आजार हा न्युमोकॉकास या बॅक्टरीया मुळे होतो. हा विविध प्रकारात दिसून येतो, पण यावर उपचार होऊ शकतात आणि 90% बाबतीत हे गंभीर नसते. ह्या आजाराचे आक्रमक व आक्रमक नसणारे असे प्रमुख प्रकार आहेत. हा आजार प्रामुख्याने याच्या सर्व प्रकाराच्या नियमित लसीकरण करून थांबवल्या जाऊ शकतात.
याची प्रमुख कारणे व लक्षणे काय आहेत?
याची प्रमुख कारणे व लक्षणे परिणाम झालेल्या अवयवांवर अवलंबून असतात, मुख्यतः कानाच्या संसर्गाची लक्षणे दिसून येतात. ह्या आजारामधून येणाऱ्या स्थिती पुढीलप्रमाणे आहेत:
- विना आक्रमक न्युमोकॉकल आजार- कानातील संसर्ग, ब्रोंकायटीस व सायनुसायटिस सारखे श्वसनाचे आजार.
- आक्रमक न्युमोकॉकल आजार- रक्तातील बॅक्टेरीयाच्या संसर्गामुळे थंडी व ताप; न्युमोनिया मुळे ताप आणि श्वसनाच्या अनैसर्गिकतेसोबत छातीत दुखणे; मेनिंजायटीस मानेच्या कठिणतेचे कारण आहे, जागाबदल आणि प्रकाशाशी संवेदशीलता आणि घामट त्वचेमुळे सेप्सिस, जागाबदल, वाढलेले हृदयाचे ठोके व खूप दुखणे.
याची प्रमुख कारणे काय आहेत?
न्युमोकोकल बॅक्टेरीया व त्याचा शरीरातील प्रसार ही या आजाराची प्रमुख कारणे आहेत. हा बॅक्टरिया हवेतून तोंडावाटे किंवा नाकावाटे शरीरात येतो व घशावाटे शरीराच्या बऱ्याच भागात पसरतो जसे की फुफूसे, कान किंवा मेंदू. जेव्हा लोकं त्यांच्या रोगप्रतिकारक प्रक्रियेशी तडजोड करतात, बॅक्टरिया विविध स्थितीचे व इतर लक्षणांचे कारण होतात.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
शारीरिक तपासणी पासून निदानाची सुरुवात केली जाते, ज्यामुळे डॉक्टरांना संसर्गाची पूर्णपणे कल्पना येते. गंभीर स्थितीत डॉक्टर काही तपासण्यांचा सल्ला देतात ज्यामध्ये फुफूसे, सांधे व छातीचे एक्स-रे घेतले जातात.
न्युमोकोकल आजारापासून बचावासाठी सर्वात सामान्य पद्धती म्हणजे लसीकरण. जेव्हा रुग्णाला आधीपासून हा रोग झालेला असतो, तेव्हा प्राथमिक उपचारात लक्षणे विकसित झाल्याचा स्वभाव जाणून घेतला जातो.
आजार ज्याप्रमाणे शरीरात पसरतो, व जे रूप धारण करतो त्यानुसार उपचार पद्धती बदलतात.काही छोट्या बाबतीत, ती व्यक्ती आपापले औषध घेऊन त्याचे निवारण करू शकतात. आक्रमक न्युमोकोकाल आजारासाठी, मोठ्या प्रमाणातील औषधांच्या डोसांचा सल्ला दिला जातो. काही गंभीर बाबतीत, त्या व्यक्तींना दवाखान्यात दाखल करावे लागते.