प्लांटर फॅसायटीस काय आहे?
प्लांटर फॅसिया हा एक जाड टिशू आहे जो पायाच्या तळाशी म्हणजेच पायाच्या तळव्याशी उपस्थित असतो. फॅसिया हा बाणाच्या दोरी सारखा दिसतो कारण तो टाचेच्या हाडांना पायाच्या बोटाशी जोडतो. प्लांटर फॅसियावर येणाऱ्या सुजेला प्लांटर फॅसायटीस म्हणतात. हे बऱ्याचदा वारंवार नोंदविल्या जाणाऱ्या पायाच्या तक्रारींपैकी एक आहे आणि यामुळे जोरदार अक्षमता येऊ शकते.
त्याच्याशी संबंधित मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
जसे की ही स्थिती लिगामेंटवर सूज आल्यामुळे होत असते, प्लांटर फॅसायटीसच्या प्राथमिक लक्षणांमध्ये टाचेच्या वेदना आणि पायाच्या तळव्यांमध्ये वेदना होऊ शकतात, जे लालसरपणा आणि टाचेच्या क्षेत्रात सुजेसोबत येऊ शकतात. कधी कधी या वेदनांना जळणाऱ्या संवेदना समजले जाऊ शकते. वेदना तीव्र किंवा सुस्त असू शकतात. सामान्यतः, सकाळी पायांवर उभे राहिल्यानंतर वेदना अनुभवली जाते.
वेदनांमध्ये आणखीनच बिघाड होऊ शकते जेव्हा पायाचा वापर शारीरिक क्रियांसाठी जसे चालणे, धावणे किंवा पायऱ्या चढणे यांच्यासाठी केला जातो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
प्लांटर फॅसायटीस पुढील कारणांनी होऊ शकतो:
- खेळांमध्ये व्यस्त असताना टाचेच्या हाडांवर ताण आल्याने.
- वजन जास्त असणे.
- जास्त वेळेसाठी उभे राहिल्याने.
- दीर्घ काळासाठी हिल्स घातल्याने.
- पायांच्या कमान वर थोडासा आधार असलेले फुटवेअर घातल्याने.
- जास्त प्रमाणात धावल्याने.
- उडी मारताना होणारी दुखापत.
- हिल स्पर (हाडांची वाढ).
आर्थराईटिस सारख्या काही रोगांमुळे प्लांटर फॅसायटीसचा धोका वाढतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
स्थितीचे निदान करण्यासाठी डॉक्टर प्रथम त्या वेदनाची सुरुवात, तीव्रता आणि अलीकडील क्रिया ज्यात आपण गुंतलेले असाल याबद्दल विचार करतील. लक्षणे आणि शारीरिक तपासणीचे वर्णन डॉक्टरांना स्थिती निर्धारित करण्यात मदत करते. डॉक्टर दुखापतीचे चिन्ह बघतील जसे की:
- लालसरपणा.
- दाह किंवा सूज.
- ताठरता.
निदानाची पुष्टी करण्यासाठी आणि कुठल्याही अंतर्निहित स्थितीचे कारण ओळखण्यासाठी इमेजिंग चाचणी जसे की एक्स-रे केले जाऊ शकते.
प्लांटर फॅसायटीसचा उपचार करण्यासाठी डॉक्टर पेनकिलरचा सल्ला देऊ शकतात, ज्यामुळे सूज कमी होईल आणि त्वरित आराम मिळेल. इतर उपायांचा समावेश आहेः
- आराम करणे.
- झोपताना किंवा इतर शारीरिक क्रिया करताना रात्रीचे स्प्लिंट (पाय, हात, इ चे मोडलेले हाड जागी नीट स्थिर बसावे यासाठी त्याभोवती बांधण्यासाठी वापरतात ती लाकडी फळी) वापरणे.
- आरामदायक फुटवेअर घालणे.
वेळेसोबत लक्षणे बरी होतात कारण लिगामेंट ताणापासून बरी होतात.
काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.
स्वतःची काळजी घेण्याच्या उपायांमध्ये दाह सूज आणि वेदना कमी करण्यासाठी पाय 15-20 मिनिटे गरम पाण्याच्या टबमध्ये भिजवून घेणे समाविष्ट असते.