पिनकृमी संसर्ग काय आहे?
पिनकृमी हे परजीवी असतात, जे मानवाच्या कोलोनमध्ये (मोठ्या आतळ्यांमध्ये) किंवा गुदाशयामध्ये राहतात. हे कृमी थ्रेडवर्म्स म्हणून देखील ओळखले जातात. वैद्यकीय भाषेत, पिनकृमी संसर्ग एन्टरोबियासिस म्हणून ओळखले जाते. हे कृमी मानवी शरीरात टिकून राहतात आणि वाढतात परंतु इतर प्राण्यांना प्रभावित करीत नाहीत. एकदा एखाद्या व्यक्तीला पिनकृमीचा संसर्ग झाल्यास, हे कृमी पोटामध्ये परिपक्व होतील आणि नंतर पुनरुत्पादन करण्यासाठी गुदा भागात अंडी घालतील.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सर्वात सामान्य लक्षणे जी पिनकृमी संसर्गाशी संबंधित असतात, त्यामध्ये समावेश होतो:
- गुदामध्ये खाज.
- खाजेमुळे झोपण्याच्या त्रास.
- सौम्य मळमळ.
- भूक कमी होणे.
- परत परत होणारी पोटदुखी.
- वजन कमी होणे.
- चिडचिड.
याची मुख्य कारणं काय आहेत?
पिनकृमी हा त्याच्या अंड्यांच्या संपर्कात आल्याने पसरतो जी एवढी लहान असतात की उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. खराब स्वच्छतेमुळे, गुदा क्षेत्रातील अंडी संसर्गित व्यक्तींकडून दुसऱ्या पृष्ठभागावर हस्तांतरित केल्या जाऊ शकतात, ज्याला नंतर इतरांकडून स्पर्श केला जाऊ शकतो. संपर्कानंतर तोंडात बोट ठेवल्याने आणि अंडी गिळल्याने हा संसर्ग होतो.
पिनकृमीची अंडी संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या वैयक्तिक वस्तूंवर आढळू शकतात.
दुर्मिळ प्रकरणांमध्ये, पिनकृमीची अंडी व्यक्तींमध्ये संसर्गित वायू आत घातल्याने प्रवेश करू शकतात.
त्याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
काही प्रकरणांमध्ये, संसर्गित व्यक्तीच्या अंडरवेअरवर पिनकृमी सहजपणे दिसतात. अंडरवेअरमध्ये किंवा शौचालयामध्ये पिनकृमी दिसण्याची शक्यता रात्रीच्या वेळेस जास्त असते कारण त्याच वेळेस मादा पिनकृमी अंडी घालीत असते. पिनकृमी दिसण्यामध्ये पांढरी आणि सुतासारखी असतात.
गुदा क्षेत्रातून सूक्ष्मदर्शकाखालील नमुना तपासण्यासाठी डॉक्टर एक ओलसर कापसाचा गोळा वापरू शकतात.
टेप टेस्ट ज्यामध्ये, गुदा क्षेत्रातून नमुना गोळा करण्यासाठी स्पष्ट टेप वापरणे समाविष्ट असते, सूक्ष्मदर्शकाखाली पिनकृमीच्या अंड्यांचा शोध घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
पिनकृमी पासून सुटका मिळवण्यासाठी विविध औषधं आणि उपचारांचा वापर केला जातो. ही औषधे याद्वारे कार्य करतात:
- कृमींची ग्लुकोज शोषण्याची क्षमता अवरोधित करणे ज्यामुळे ते जिवंत असतात.
- कृमींना दुर्बळ करून.
संसर्गाचा प्रसार थांबविण्यासाठी आपले हात स्वच्छ ठेऊन योग्य स्वच्छता राखून ठेवा.