पेरिफेरियल न्यूरोपॅथी काय आहे?
पेरिफेरियल मज्जासंस्था ही शरीरातील संदेश पोहोचवण्याची संस्था आहे जी सेंट्रल मज्जा संस्थेकडून येणारे संदेश मेंदू आणि पाठीचा कणा, आणि इतर शरीरातील भागाततून येणाऱ्या संदेशाच्या दळणवळणाचे काम करते. ह्या संदेशामध्ये इंद्रियांकडून येणारे संदेश जसे थंड हात, स्नायूंच्या आकुंचनाने संदेश जे शरीराच्या हालचालीला मदत करतात, आणि इतर. पेरिफेरियल मज्जासंस्थेला इजा होण्याला पेरिफेरियल न्यूरोपॅथी म्हणतात.
याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
कोणत्या नर्व्हला इजा झाली आहे यावर त्यांचे लक्षणे आणि चिन्हे अवलंबून आहेत.
- मोटर नर्व्ह ला इजा होणे
स्नायूमध्ये क्रॅम्प्स येतात, स्नायू अशक्त होतात, स्नायूला लचक बसने किंवा आकुंचने . - सेन्सरी नर्व्ह ला इजा होणे
यामुळे संवेदना जाणून घेण्यास जसे स्पर्श, वेदना आणि तापमानातील बदल असमर्थता येते, आणि मोटर कॉर्डीनेशन जसे चालणे, बटन लावणे, इत्यादी करणे कठीण जाते. - ऑटोनॉमिक नर्व्ह ला इजा होणे
ह्यामुळे घाम येणे पलटते, गरमी सहन होत नाही, आणि आतील अवयवांशी संबधित प्रश्न निर्माण होते.
याचे मुख्य कारण काय आहे ?
पेरिफेरियल न्यूरोपॅथी चे जास्त प्रचलित असलेले कारण म्हणजे मधूमेह होय. आरोग्याशी संबंधित इतर कारणे खालील प्रमाणे आहेत:
- व्हिटॅमिन्स च्या पातळीमध्ये कमी होणे.
- नर्व्ह ला इजा होणे.
- दारूचे व्यसन.
- लाईम रोग आणि जुलाब सारखा संसर्ग होणे.
- रक्त वाहिन्यांचा दाह.
- दीर्घकालीन यकृताचा रोग.
- दीर्घकालीन मूत्राशयाचा रोग.
- ऱ्हुमॅटॉइड आर्थ्रायटीस.
- एचआयव्ही, हर्प्स आणि व्हेरिसेला- झोस्टर विषाणूचा संसर्ग.
- शरीरात जास्तीचे विषारी पदार्थ जसे अर्सेनिक, पारा आणि शिसे असणे.
याचे निदान आणि उपचार काय आहेत?
पेरिफेरियल न्यूरोपॅथी च्या निदानामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- मधूमेह आणि व्हिटॅमिन्स च्या कमतरते च्या निदानासाठी रक्ताची चाचणी.
- नर्व्ह कंडक्शन चाचणी.
- एक्स-रे, सीटी स्कॅन आणि मॅग्नेटिक रिजोनान्स इमेजिंग (एमआरआय) सारख्या इमेजिंग पद्धती .
- इलेकट्रोमायोग्राफी.
- नर्व्ह बायोप्सी.
पेरिफेरियल न्यूरोपॅथी चे उपचार कारणावर उपचार करून आणि लक्षणांना कमी करून केले जातात. खालील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या नेहमीच्या पद्धती आहे:
- मधुमेहावर उपचार आणि तो कमी करणे.
- व्हिटॅमिन्स चे इंजेकशन देणे किंवा तोंडावाटे सप्लिमेंट्स देणे.
- एखाद्या औषधामुळे हा रोग होत असेल तर ते बंद करणे .
- कॉर्टिकोस्टेरॉइड्स.
- इम्युनोग्लोब्युलिन इंजेकशन.
- इम्यूनोसप्रेसंट.
- नर्व्ह च्या दुखण्यासाठी वेदनाशामक औषधे देणे.
- संवेदना कमी झाल्यामूळे पायाला इजा होण्यापासून वाचवण्यापासून नेहमीच मोजे किंवा शुज घालून राहणे.