पेरीकार्डायटिस काय आहे ?
पेरीकार्डियम हा हृदयाच्या पृष्ठभागावर दुहेरी-स्तरित पातळ थर असतो, ज्याला दाह, लालसरपणा आणि सूज येण्याला पेरीकार्डायटिस म्हटले जाते. कधीकधी,अतिरिक्त द्रवपदार्थ पेरीकार्डियल लेयरमध्ये संचयित होतात, ज्यास पेरीकार्डियल इफ्युजन म्हणतात. पेरीकार्डायटिस हा एक अल्पकालीन विकार आहे जो अचानक होतो आणि तीन महिन्यांनंतर कमी होतो. हा सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतो परंतु सामान्यत: हे 16 ते 65 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये पाहिला जातो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?
पेरीकार्डायटिसमुळे छातीत वेदना होऊ शकतात ज्या खूप तीव्र असतात आणि खोकतांना, अन्न गिळतांना आणि दीर्घ श्वास घेतांना अधिकच वाईट होऊ शकतात. पेरीकार्डायटिसची इतर लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- कोरडा खोकला.
- चिंता.
- थकवा.
- पाठीत, मानेत आणि खांद्यांमध्ये वेदना.
- झोपत असतांना श्वासच्या समस्या.
- पोट फुगणे.
- पाय आणि पावलांना सूज येणे.
- असामान्य हृदयाचे ठोके.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
कारण बहुतेकदा अज्ञात असते, परंतु हे बऱ्याचदा खालील कारणांमुळे होते:
- बॅक्टरीअल संसर्ग.
- फंगल संसर्ग.
- व्हायरल संसर्ग ज्यामुळे सर्दी आणि निमोनिया होतो.
- कर्करोग.
- एचआयव्ही संसर्ग.
- किडनी निकामी पडणे.
- क्षयरोग.
- हृदयविकाराचा झटका.
- फेनिटोइन, आयसोनियाझिड आणि काही कर्करोगाच्या औषधांसारखी औषधे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
पेरीकार्डायटिसचे निदान करण्यासाठी पुढील चाचण्यांचा वापर केला जातो:
- इमेजिंग चाचण्या
यात छाती आणि हृदयाच्या एमआरआय, छातीचा एक्स-रे, इकोकार्डियोग्राम, इलेक्ट्रोकर्डिओग्राम आणि हृदयाचे सीटी स्कॅन समाविष्ट आहे. - लॅब चाचण्या
ट्रोपोनिन आय चाचणी हृदयाचे स्नायू, ब्लड कल्चर, संपूर्ण रक्त गणना (कम्प्लिट ब्लड काऊंट), ट्यूबरक्युलिन त्वचेची चाचणी, एचआयव्ही चाचणी, ॲन्टिन्यूक्लियर अँटीबॉडी चाचणी आणि एरिथ्रोसाइटस सेडीमेंटशन दर यांना झालेल्या नुकसानाची चाचणी या चाचण्या केल्या जाऊ शकतात.
उपचार कारणांवर अवलंबून असतात. खालील उपचार कारणांवर अवलंबून आहेत:
- संसर्गाचा प्रकारावर आधारित औषधे
अँटिबायोटिक्सचा वापर बॅक्टेरियल संसर्गासाठी, फंगल संसर्गासाठी अँटीफंगल औषधे आणि व्हायरल इन्फेक्शन्ससाठी अँटीवायरल्सचा वापर केला जातो. - इतर औषधे
शरीरातील संचयित द्रव काढण्यासाठी प्रेडनिसोन आणि डाययूरेटिक्ससारखे कॉर्टिकोस्टिरॉईड्स - पेरिकार्डिओसेंटेसीस
सुईचा वापर करून पिशवीतून द्रव बाहेर काढण्याची ही प्रक्रिया आहे. - पेरीकार्डिएक्टॉमी
ही गंभीर प्रकरणात वापरली जाणारी शस्त्रक्रिया आहे आणि पेरीकार्डियम चा नुकसान झालेला भाग काढून टाकणे यात समाविष्ट आहे. हे केवळ दीर्घकालीन पेरीकार्डायटिससाठी वापरले जाते.