पॅराकोक्सीडियोआयडोमायकोसिस काय आहे?
पॅराकोक्सीडियोआयडोमायकोसिस फंगल रोग आहे जो सुरुवातीला फुफ्फुसांवर प्रभाव पाडतो आणि शेवटी त्वचा आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. पॅराकोक्सीडियोआयडोमायकोसिसचा उपचार न केल्यास संभाव्य स्थिती जीवघेणी ठरू शकते. पण, हा एक दुर्मिळ फंगल रोग आहे. हा रोग सामान्यतः लोबो रोग किंवा पीसीएम म्हणून ओळखला जातो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
पॅराकोक्सीडियोआयडोमायकोसिस प्रामुख्याने त्वचेला आणि फुफ्फुसांना प्रभावित करतो. त्याची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात:
- वजन अचानक आणि वेगवान प्रमाणात कमी होणे.
- लिम्फ नोड्स मध्ये सूज.
- लिम्फ नोड्समध्ये पस किंवा द्रव जमा होणे.
- सतत खोकला.
- ताप.
- श्वास घेण्यात अडचण.
- थकवा.
- वाढलेले यकृत.
- वाढलेली प्लिहा (स्प्लिन).
- तोंड आणि घशात जखम.
मुलं जी पॅराकोक्सीडियोआयडोमायकोसिसने संसर्गग्रस्त असतात त्यांमध्ये त्वचेवर घाव आणि लिम्फ नोड्समध्ये सूज अशी लक्षणे दिसू शकतात. प्रौढांमध्ये फुफ्फुसे प्रभावित होऊ शकतात आणि लक्षणे त्यानुसार बदलू शकतात.
हा संसर्ग पूर्णपणे निरोगी व्यक्तींना हौऊ शकते मात्र कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये लक्षणे अधिक गंभीर असतात.
फार कमी लोकांमध्ये, पॅराकोक्सीडियोआयडोमायकोसिसची कुठलीही लक्षणे दिसत नाहीत.
याची मुख्य कारणं काय आहेत?
पॅराकोक्सीडियोआयडोमायकोसिस पॅराकोक्सीडॉइडस ब्रॅसिलिन्सिस नावाने ओळखल्या जाणाऱ्या फंगसमुळे होतो. श्वास घेतांना हवेमध्ये जन्मणारे फंगल स्पोअर्स (एअर बॉर्न फंगल स्पोअर्स) व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. जसे हे स्पोअर्स फुप्फुसांमध्ये प्रवेश करतात, तसे ते सक्रिय फंगीमध्ये रूपांतरित होतात, जे नंतर शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
या संसर्गाचे निदान रुग्णाकडून गोळा केलेल्या थुंकीच्या किंवा पसच्या नमुन्यातून प्रयोगशाळेच्या विश्लेषणाद्वारे केले जाते. निदानाची पुष्टी करण्यासाठी सूक्ष्मदर्शकाखाली टिश्यूंच्या नमुन्यांचे मूल्यांकन देखील केले जाऊ शकते.
स्थितीचे निदान करण्यासाठी रक्त तपासणी देखील उपयुक्त ठरू शकते. संसर्गाच्या तीव्रतेची माहिती मिळविण्यासाठी, फुफ्फुसातील फंगल संसर्ग झालेले डागदार क्षेत्र शोधण्यासाठी डॉक्टर छातीचा एक्स-रे देखील करू शकतात.
पॅराकोक्सीडियोआयडोमायकोसिसचा उपचार प्रभावीपणे अँटिफंगल औषधे, जसे कि इट्राकोनॅझोल आणि एम्फोटेरिसिन बी च्या मदतीने केला जातो. संसर्ग झालेल्या व्यक्तीस फंगस पासून संपूर्णपणे सुटका मिळावण्यासाठी उपचार कमीतकमी एक वर्ष सुरु ठेवावा लागू शकतो.