पेनकिलर चे दुष्परिणाम काय आहे?
पेनकिलर किंवा वेदना शामक औषधे ही नार्कॉटिक्स नावाच्या ड्रग्स पासून बनलेली असतात. सामान्यपणे शारीरिक दुखणे लवकर बरे व्हावे यासाठी ते घेण्याचा सल्ला दिला जातो. सामान्य पेन किलर मध्ये ॲस्प्रिन, ईब्युप्रोफेन आणि नॅप्रॉक्सेन यांचा समावेश होतो. हे सामान्यपणे फार्मसी मध्ये उपलब्ध असून त्यासाठी कोणत्याही प्रिस्क्रिप्शनची गरज भासत नाही. तरी बराच काळ व सतत पेन किलर घेण्यानी इतर त्रास होऊ शकतात.
याच्याशी निगडित प्रमुख चिन्हे व लक्षणे काय आहेत?
प्रिस्क्रिप्शन पेन किलर मुळे दिसणारे सामान्य परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:
वरील लक्षणे औषधे घेतल्यावर लगेच दिसून येतात. काही व्यक्तींमध्ये जसे ते औषध घेतात, तसे लगेच परिणाम दिसून येतात. तरी हे लगेच दिसणारे परिणाम त्याच व्यक्तींमध्ये दिसतात जे सतत पेन किलर चे सेवन करत नाही. सततच्या वापरात ह्या लक्षणांची शक्यता कमी असते पण इतर लक्षणे दिसू शकतात जी पुढीलप्रमाणे आहेत:
- व्यसन
पेनकीलरच्या वापरासोबत येणारा मोठा धोका म्हणजे त्याचा गैरवापर व व्यसन. पेनकीलर मधील ड्रग्स तत्काळ मिळणारा आराम व मुख्य प्रक्रियेला एका पातळीपर्यंत कमी करणे व आनंद दायी अनुभव देणे ह्यासाठी बनलेली असतात. जी व्यक्ती पेन किलर चे सातत्याने सेवनकरतेत त्यांना ह्या परिणामाची सवय झालेली असते व ती गरज नसते तेव्हाही पेन किलर चे सेवन सुरू करते. - सहनशीलता
जी व्यक्ती पेन किलर चे सातत्याने सेवन करते त्यांना ह्या औषधांची सहनशीलता विकसित होते, म्हणजे त्यांना हाच परिणाम दिसण्यासाठी औषध जास्त प्रमाणात/मोठ्या डोजमध्ये घ्यावे लागते. - हार्मोन्स चे असंतुलन
पेन किलर च्या अती वापराचा परिणाम हा पुरुषांमध्ये टेस्टोरस्टेरॉन च्या व स्त्रियांमध्ये ऑस्टरोजेन च्या कमी पातळ्या असा दिसून येतात. याचे इतर परिणाम जसे गरम वाफा, मासिक पाळी मध्ये अनियमितता आणि कमी लिबिडो या स्शरूपात दिसून येतात.
याची प्रमुख कारणे काय आहेत?
ही औषधे मुख्यतः तीव्र वेदनांपासून लगेच आराम मिळावा म्हणून दिली जातात. तरी, कर्करोग, यासारख्या आजाराने ग्रासित व्यक्तिला वेदना कमी करण्यासाठी पेन किलर्सचा मोठा डोज दिला जातो. मज्जासंस्थेवर होणाऱ्या औषधांच्या परिणामामुळे याचे दुष्परिणाम दिसून येतात.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
रक्ताची पातळी तपासून, वैद्यकीय इतिहास घेऊन, शारीरिक तपासणी व चाचण्या करून योग्य निदान केले जाते. पेनकीलरचे सेवन कमी करणे, पूर्णपणे थांबवणे किंवा नैसर्गिक उपचार यापैकी एक सल्ला डॉक्टर देतात. नैसर्गिक खाद्य पदार्थ जसे चिंच, आले ही जळजळ विरहित असतात व वेदना कमी करण्यास मदत करतात.
पेन कीलर वरील अवलंबन कमी करायला इतर उपाय, जसे योगा व प्राणायाम सुचवले जाऊ शकतात.