ऑस्टियोपेनिया म्हणजे काय?
ऑस्टियोपेनिया एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये हाडांची घनता कमी असते,त्यामुळे हाडे सामान्यांपेक्षा कमकुवत होतात. ऑस्टियोपेनिया हा ओस्टियोपोरोसिसच्या विकासाचे एक पूर्वचिन्ह आहे आणि यात फ्रॅक्चर चा जोखीम वाढतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सामान्यपणे, ऑस्टियोपेनिया हा लक्षणहीन आहे आणि हे केवळ तेव्हाच लक्षात येते जेव्हा एखाद्या व्यक्तीला निश्चित कारणा शिवाय फ्रॅक्चर होते किंवा फक्त किरकोळ मार लागूनही हाड तुटते. याने इतर हाडांना फ्रॅक्चरचा धोका असतो आणि ऑस्टियोपोरोसिस चेतावणी चिन्ह म्हणून घेतले पाहिजे.
याचे मुख्य कारणं काय आहेत?
या अवस्थेचे कारण मल्टिफॅक्टोरियल आहे आणि हाडांच्या शक्तीवर प्रभाव पाडणाऱ्या परिस्थितींवर अवलंबून आहे, जे भिन्न लोकांसाठी वेगळे आहे. या स्थितीशी संबंधित मुख्य कारणांमध्ये हे समाविष्ट आहे:
- हाडांच्या आरोग्याचा खराब/अपुरा कौटुंबिक इतिहास.
- विविध वैद्यकीय परिस्थिती ज्यात ग्लूटेन किंवा गहू ची ॲलर्जी असलेल्या व्यक्तीमध्ये सेलिॲक रोगाचा समावेश होतो ज्यामुळे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चे कमी शोषण होऊ शकते.
- स्टेरॉईड्स सारखी विविध औषधे ज्यामध्ये ग्लुकोकोर्टिकोइड (दीर्घकालीन वापरासह) समाविष्ट आहे.
- लठ्ठपणा.
- तरुण महिला ॲथलीट्स.
- खाण्याचे विकार.
- वृद्धिंगत (विशेषत: रजोनिवृत्तीनंतर).
- कोणत्याही कारणामुळे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता.
- व्यायामाची कमतरता किंवा निष्क्रियता.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
कौटुंबिक आणि वैद्यकीय इतिहासासह डॉक्टर लक्षणांचा संपूर्ण इतिहास घेतील त्यानंतर प्रभावित भागाची तपासणी केली जाईल. अपुरे हाडांचे आरोग्य किंवा ऑस्टियोपेनिया असण्याबद्दल डॉक्टरांना शंका असल्यास तो पुढील चाचण्या सुचवतील
- प्रथम चाचणीनंतर दोन ते पाच वर्षांनी हाडांच्या घनतेची चाचणी आणि पुनरावृत्ती चाचणीची शिफारस केली जाईल.
- फ्रॅक्चरच्या प्रकरणात प्रभावित क्षेत्राचे एक्स-रे.
- ड्युअल-एनर्जी एक्स-रे किंवा ॲब्सॉर्बशिओमेट्री (डीईएक्सए) स्कॅन.
ऑस्टियोपेनियाचा उपचारः
- ऑस्टियोपेनिया ऑस्टियोपोरोसिस जितका गंभीर नाही आणि म्हणून त्याला जास्त औषधोपचाराची आवश्यकता नसते. हाडांचे संरक्षण करणे आणि त्यांचे सामर्थ्य सुधारणे हे ऑस्टियोपेनियाच्या उपचाराचे लक्ष्य आहे.
- ऑस्टियोपेनियाचे निदान झालेल्या व्यक्तीने कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी च्या पूरकांचे सेवन करणे आवश्यक आहे.
- व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमनी समृध्द पदार्थयुक्त आहार सुचवला जातो. आणि यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे कि दही, चीज, भाज्या जसे पालक आणि ब्रोकोली, सॅलमन सारख्या माशांचा, कडधान्य, ब्रेड आणि मोसंबीचा रस यांचा समावेश आहे.
- वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि वजन व्यवस्थापन.
- हाडांच्या अनुकूल जीवनशैलीचा अवलंब करणे.
- धूम्रपान आणि दारू टाळणे.