नोकार्डिओसीस काय आहे?
नोकार्डिओसीस हा संसर्गजन्य रोग आहे जो माती आणि पाण्यामध्ये सापडतो जो फुफ्फुस मेंदू आणि त्वचेला प्रभावित करतो. नोकार्डिओसीसचे दोन प्रकार आहेत:
- फुफ्फुस (पल्मोनरी )प्रकार जो श्वासेच्या माध्यमातून होतो.
- प्राथमिक त्वचा (क्यूटॅनियस) ज्यामुळे बॅक्टरीया उगळ्या जखमेच्या माध्यमातून प्रवेश करतो.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
जर नोकार्डिओसीसमुळे फुफ्फुसाचा संसर्ग होत असेल तर तुम्ही खालील लक्षणे अनुभवू शकता:
जर मेंदू किंवा मेरुदंड (स्पायनल कॉर्ड) यांना नोकार्डिओसीसमुळे संसर्ग होत असेल तर तुम्ही पुढील लक्षणे अनुभवू शकता:
जर त्वचा नाकार्डिओसिसमुळे प्रभावित होत असेल तर खालील लक्षणे दिसून येतीलः
- त्वचेचा अल्सर.
- लहान गाठी.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
नाकार्डियासिस हा संसर्ग आहे जो नोकार्डिया ॲस्टेरॉइस्ड बॅक्टेरियामुळे होतो. हा बॅक्टेरिया असलेल्या मातीवरील वायुचा श्वास घेतल्यानेच या बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो. या जीवाणूंच्या इतर प्रजाती शरीरात खुल्या जखमांच्या माध्यमातून प्रवेश करु शकतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती दुर्बल आहे अशांना हा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. उदा. कर्करोग, एचआयव्ही संसर्ग, इम्यूनोसप्रेसंट थेरपीच्या प्रक्रियेतून पीडित लोक आणि बरेच काही. हा रोग वेगाने इतर अवयवांमध्ये, विशेषकरुन मेंदूमध्ये पसरतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
शारीरिक परीक्षण आणि तपशीलवार इतिहास घेणे हे संसर्गित फुफ्फुसातील श्वासाचा आवाज कमी करण्यात मदत करते. थुंकीचे सकारात्मक कल्चर परीक्षण (पॉसिटीव्ह कल्चर टेस्ट) आणि द्रवपदार्थांचे परीक्षण बॅक्टेरियाच्या संसर्गाची पुष्टी करतील. निदानाची पुष्टी करण्यासाठी छातीचा एक्स-रे आणि सीटी स्कॅन केला जातो.
नाकार्डिओसिसच्या उपचारासाठी, सल्फोनामाइड्स निर्धारित केले जातात. उपचार काही आठवड्यांसाठी सुरु असतो. उपचारांसाठी इतर औषधांमध्ये इमीपेनेम आणि सीलास्टॅटिन, मेरोपेनेम, सेफोटॅक्सिम, सेफट्रायएक्सोन एमिपीसिलिन, मायनोसाइक्लिन, आणि अमीकासिन यांचा समावेश आहे.
रुग्णाला तर्कशुद्ध आणि त्वरित उपचार दिला पाहिजे कारण आक्रमकपणे आणि वेळेवर उपचार न केल्यास हा रोग घातक ठरू शकतो.