न्यूरोलेप्टिक मॅलिग्नन्ट सिन्ड्रोम - Neuroleptic Malignant Syndrome in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 26, 2019

July 31, 2020

न्यूरोलेप्टिक मॅलिग्नन्ट सिन्ड्रोम
न्यूरोलेप्टिक मॅलिग्नन्ट सिन्ड्रोम

न्यूरोलेप्टिक  मॅलिग्नन्ट सिन्ड्रोम काय आहे?

न्यूरोलेप्टिक मॅलिग्नन्ट सिन्ड्रोम(एनएमएस) ही गंभीर परिस्थिती आहे जी अँटिसायकॉटिक औषधे घेतल्यामूळे होते. अँटिसायकॉटिक औषधे अल्झायमर, पार्किनसोनीज्मबायपोलार डिसऑर्डरनैराश्य, आणि चिंता या रोगांसाठी घेतात. ही दुर्मिळ गोष्ट आहे, जे साधारणपणे माणसांमध्ये दिसून येते. जर यावर उपचार केला नाही, तर यात मृत्यू येऊ शकतो; म्हणून, एनएमएस च्या  पहिल्या लक्षणापासूनच दवाखान्यात जाणे आवश्यक आहे .

भारतीय लोकसंख्येमध्ये एनएमएस झालेल्या लोकांची संख्या 100 केसेस मधून 1.40 -1.41 इतकी अँटिसायकॉटिक चा वापर केल्याने आहे.

याचे मूख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

अँटिसायकॉटिक औषधे सुरू केल्यावर किंवा डोस वाढवल्यानंतर व्यक्तीला याची लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे  व्यक्ती 1-2 आठवड्यात अनुभवू शकतो:

  • 38o सेल्सियस पेक्षा जास्त पण 40 सेल्सियस पेक्षा कमी ताप.
  • स्नायू कठोर होणे.
  • कंपन.
  • हालचाल करण्यास कठीण जाणे.
  • बोलण्यास कठीण जाणे.
  • गोंधळ.
  • हृदयाचा वेग वाढणे.
  • श्वासाचा वेग वाढणे.
  • मानसिक स्वास्थ बिघडणे.
  • अनियंत्रित रक्तदाब.
  • घाम येणे.
  • अनैच्छिक लघवी होणे (इंकाँटिनेन्स).
  • क्रिएटिनाइन किनेज च्या पातळीमध्ये वाढ होणे.
  • लघवीमध्ये प्रथिने मिळणे.

याचे मूख्य कारणे काय आहेत?

अँटिसायकॉटिकस मूळे डोपामाईन रिसेप्टर च्या कार्यात अडथळा येऊन एनएमएस होते. डोपामाईन हे मज्जातंतूला मॅसेज पोहोचविण्याच्या कामात मदत करते.  या यंत्रणेचं ठळक कारण अजूनही माहित नाही.

एनएमएस होण्याचा धोका वाढवण्याचे इतर कारणे खालील प्रमाणे आहे:

  • 2 किंवा जास्त अँटी- सायकॉटिक्स चा वापर करणे.
  • अँटी- सायकोटिक्स च्या मात्रेत अचानक वाढ करणे.
  • डिहायड्रेशन.
  • बधिरीकरणाच्या औषधाचा वापर करणे .
  • डोपामाईन रिसेप्टर वर काम करणारे औषध कमी करणे .
  • उलट्या थांबवणारे औषध घेणे.
  • पूर्वी एनएमएस ची हिस्टरी असणे.

याचे निदान आणि उपचार कसे करतात?

एनएमएस साठी विशिष्ट टेस्ट उपलब्द्ध नाही आहे. त्यामुळे, तुमचे डॉक्टर बऱ्याच टेस्ट सांगतील ज्यामध्ये ब्लड टेस्ट, इलेकट्रोलाईट टेस्ट, आणि युरीन टेस्ट चा समावेश आहे. कधीकधी, तुमचे डॉक्टर इमेजिंग टेस्ट किंवा इलेकट्रोएन्सेफेलोग्राम (इएफजी) करायला सुचवतील.

एनएमएस ही एक गंभीर परिस्थिती आहे, त्यामुळे त्वरित उपचार आवश्यक आहे.प्रथम, तुमचे डॉक्टर औषधामुळे एनएमएस होत असेल तर ते औषध थांबवतील. नंतर, लक्षणावर उपचार केला जाईल. हायपरथर्मिया (उच्च रक्तदाब), साठी तो कमी करण्यासाठी कमी झालेले द्रव आणि इलेकट्रोलाईट्स च्या माध्यमातून ते भरून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमचे डॉक्टर एनएमएस चा धोका कमी करणारी नवीन औषधे लिहून देतील पण नियमित नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. साधारणपणे, 7 -14 दिवसात बरे वाटू लागते.



संदर्भ

  1. Merck Manual Professional Version [Internet]. Kenilworth (NJ): Merck & Co. Inc.; Neuroleptic Malignant Syndrome
  2. Brian D. Berman. Neuroleptic Malignant Syndrome; A Review for Neurohospitalists . Neurohospitalist. 2011 Jan; 1(1): 41–47. PMID: 23983836
  3. Pradyot Sarkar et al. Prevalence of neuroleptic malignant syndrome in 672 consecutive male in-patients. Indian J Psychiatry. 2009 Jul-Sep; 51(3): 202–205. PMID: 19881049
  4. Simon LV, Callahan AL. Neuroleptic Malignant Syndrome. [Updated 2019 May 11]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
  5. Gautam Bhandari. Neuroleptic Malignant Syndrome. Association of Physicians of India; [Internet]