नेफ्रायटिस म्हणजे काय?
नेफ्रायटिस ही एक अशी स्थिती आहे ज्यात एक किंवा दोन्ही मूत्रपिंड सूजतात आणि दाह होतो. मानवी शरीरात मूत्रपिंड एक महत्वाचा अवयव आहे कारण तो इतर कचरा उत्पादनांसह अतिरिक्त पाणी साफ करण्यात मदत करतात आणि शरीरात प्रथिनंसारखे आवश्यक पोषक तत्त्व ठेवतात. मूत्रपिंडाला नुकसान झाल्यामुळे शरीर मूत्रामार्गे प्रथिनेसारख्या आवश्यक पोषक तत्त्वांचा नाश होते. नेफ्रायटिस दोन प्रकारचा आहे:
- ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, ज्यामध्ये ग्लोमेरुलीला सूज येते, शरीरापासून अनावश्यक घटकांचे आणि पाणी फिल्टरिंग प्रभावित होते.
- इंटरस्टिशियल नेफ्रायटिस, ज्यामध्ये इंटरस्टिटियम, म्हणजे मूत्रपिंडातील ट्यूबल्सच्या रिक्त जागामध्ये सूज येते आणि मूत्रपिंडाचे कार्य प्रभावित करतात.
त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
नेफ्रायटिसचे लक्षणे खालीलप्रमाणे आहेतः
- ताप आणि सामान्य आजारपणाची भावना.
- शरीरात सूज आणि दाह सूज.
- पाणी धारण करून ठेवल्यामुळे वजन वाढणे.
- मल, उलट्या किंवा मूत्र मधून रक्त येणे.
- मूत्र निर्मितीमध्ये बदल.
- रॅश.
- मळमळ आणि उलटी.
- अतिसार.
त्याचे मुख्य कारणे काय आहेत?
नेफ्रायटिसचे अचूक कारण स्पष्ट नसले तरी ते नेफ्रायटिसच्या प्रकारावर अवलंबून ते बदलू शकतात.
ग्लोमेरुलोनेफ्रायटिस यामुळे होऊ शकतो:
- रोगप्रतिकार प्रणालीमध्ये बिघाड होणे.
- कर्करोगा चा इतिहास.
- हायड्रोकार्बन सॉलव्हेंट्सच्या संपर्क.
- रक्त किंवा लिम्फॅटिक प्रणाली विकार.
- व्हायरल इन्फेक्शन्स, हृदय संक्रमण आणि फोड.
- ल्यूपस नेफ्रायटिस.
- ग्लोमेरुलीच्या बेसल लेयरला प्रभावित करणारे विकार, जे फिल्टरेशनमध्ये भूमिका बजावतात.
- वेदनाशामकच्या अतिरीक्त वापरामुळे मूत्रपिंड रोग.
इंटरस्टिशियल नेफ्रायटिस यामुळे होऊ शकतो:
- औषधांचा दुष्परिणाम.
- रक्तातील अतिरिक्त यूरिक ॲसिड आणि कॅल्शियम.
- संक्रमण.
- रक्तातील पोटॅशियमची कमतरता.
- ऑटोमिम्यून डिसऑर्डर.
- ॲलर्जीक प्रतिक्रिया.
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?
ग्लोमेरुलोनेफ्रायटिसचे निदान असे केले जाऊ शकते:
- उदराचे सीटी स्कॅनिंग.
- छातीचा एक्स-रेस.
- मूत्रपिंडच्या अल्ट्रासाऊंड इमेजिंग.
- इंट्राव्हेनस पेयलोग्राम.
- क्रिएटिनिन क्लिअरन्स, प्रथिने, लाल रक्तपेशी, यूरिक ॲसिड इत्यादि ओळखण्यासाठी मूत्र चाचणी.
इंटरस्टिशियल नेफ्रायटिसचे निदान असे केले जाऊ शकते:
- रक्तातील बॅन आणि क्रिएटिनिनची पातळी तपासणे.
- पूर्ण रक्त गणना (कॉम्प्लिट ब्लड काउन्ट).
- मूत्रपिंडच्या अल्ट्रासाऊंड इमेजिंग.
- मूत्र चाचणी.
- किडनी बायोप्सी.
दोन्ही प्रकारच्या नेफ्रायटिसचे उपचार स्थितीच्या कारणावर अवलंबून असते. कारणे नियंत्रित केल्याने रोगाची स्थिती आटोक्यात ठेवण्यात मदत होते. नेफ्रायटिसला नियंत्रित ठेवायला मदत करणारे काही उपाय:
- रक्तदाब ताब्यात ठेवण्यासाठी मीठाचे प्रमाण मर्यादित करणे.
- अनावश्यक उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथिने प्रमाण मर्यादित करणे.
- अँटी-इंफ्लॅमेटरी औषधे.
- अति-उच्च रक्तदाब (अँटी हायपरन्टेन्सिव्ह) औषधोपचार (अधिक वाचा: उच्च रक्तदाब उपचार).
- किडनीच्या बाबतीत किडनी प्रत्यारोपण किंवा डायलिसिसची आवश्यकता असू शकते.