नाक बंद होणे म्हणजे काय?
नाकाच्या आतल्या थरांमध्ये सूज येणे याला नाक बंद होणे किंवा नाकात अडथळा येणे म्हणून पारिभाषित केला जाते. हे सर्दी चे सर्वात सामान्यपणे पाहिल्या जाणाऱ्या लक्षणांपैकी एक आहे. ही स्थिती सामान्यत: एक किरकोळ आजार आहे आणि औषधांशिवाय अगदी अल्प कालावधीत याचे निराकरण होते. याचा परिणाम सर्व वयोगटातील लोकांना होतो विशेषतः लहान मुलांना. नाक बंद होणे हे बऱ्याचदा इतर रोग स्थिती जसे ॲलर्जी किंवा सर्दीसोबत संबंधित असते.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
नाक बंद होण्याच्या परिस्थितीसह तुम्ही खालील लक्षणे अनुभवू शकता :
- श्वास घ्यायला त्रास होणे.
- नाकामध्ये काहीतरी जमा आहे असे वाटणे.
- वाहते नाक आणि डोळे.
- श्वास आणि चवीची कमी झालेली संवेदना.
- त्रासदायक झोप.
क्वचितच, तुम्ही पुढील लक्षणे अनुभवू शकता :
- नाकामध्ये वेदना आणि रक्तस्त्राव.
- श्लेष्मामध्ये रक्त असणे.
- नाकामध्ये कठीण पापुद्रा तयार होणे.
- जास्त प्रमाणात लाळ वाहने.
- घरघर.
- डोकेदुखी.
- गिळताना त्रास होणे.
ही दुर्मिळ लक्षणे सायनुसायटीस आणि दमा सारख्या इतर कारणांशी संबंधित आहेत.
याची मुख्य कारणं काय आहेत?
नाकाच्या आतील रक्तवाहिन्यांची सूज, टिशुची सूज आणि नाकपुड्यांमध्ये श्लेष्माचा स्राव वाढल्याने तुम्हाला नाक बंद झाल्यासारखे वाटू शकते. परिस्थिती जी तुमच्या नाकाच्या आतील थराला त्रास देऊ शकते आणि त्यामुळे सूज येऊ शकते ते आहेत :
- ॲलर्जीक ऱ्हाईनिटिस.
- सायनुसायटीस.
- थंडी.
- नाकात वाढलेले मास (नॅझल पॉलिप्स).
- बाह्य घटक.
- ओटीसीस मीडिया (कानाचा संसर्ग).
- दमा.
याची निदान आणि उपचार कसे केले जातात?
तुमचे डॉक्टर तुम्हालाला श्वसनमार्गाच्या संसर्गाबद्दल किंवा ॲलर्जीसारख्या रोगाच्या कोणत्याही परिस्थितीच्या इतिहासाबद्दल काही प्रश्न विचारतील. तुमचे डॉक्टर पॉलीप्स सारख्या अडथळ्याचे कारण बघण्यासाठी तुमच्या नाकाची तपासणी करतील.
उपचारांमध्ये डीकंजेस्टन्ट समाविष्ट आहेत जे तोंडावाटे घेतले जाऊ शकतात किंवा स्थानिक पातळीवर स्प्रे किंवा नॅझल ड्रॉप्स म्हणून वापरले जाऊ शकतात. डीकंजेस्टंट्स सोबत, नाक बंद होण्याच्या कारणांवर आधारित तुमचे डॉक्टर इतर औषधं देऊ शकतात.
नॅझल पॉलिप्सच्या बाबतीत झालेल्या वाढीचा आकार कमी करण्यासाठी सहसा औषधं दिली जातात. जर ही औषधं प्रभावी नाही ठरली तर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जाऊ शकतो.