मायलोडायप्लास्टिक सिंड्रोम काय आहे ?
हाडाच्या आतील जागेत मऊ टिशू असतात त्याला बोन मॅरो म्हणतात, त्यामध्ये स्टेम सेल्स असतात. या स्टेम सेल्स अपरिपक्व असतात ज्या लालरक्त पेशी (आरबीसी), पांढऱ्या रक्त पेशी(डब्ल्युबीसी), आणि प्लेटलेट्स मध्ये रूपांतरित होतात. आरबीसी हे ऑक्सिजन वाहून नेतात, डब्ल्युबीसी संसर्गाविरुद्ध लढतात आणि प्लेटलेट्स रक्त गोठवण्यात मदत करतात. जेव्हा मायलोडायप्लास्टिक सिंड्रोम (एमडी एस ) किंवा मायलोडीसप्लासिया होतो, तेव्हा स्टेम सेल्स आवश्यक रक्त पेशी मध्ये विकसित होत नाही आणि बोन मॅरो मधेच मरतात. निरोगी रक्त पेशींच्या कमतरतेमुळे ॲनेमिया, संसर्ग, रक्तस्त्राव, ज्या पेशींची कमी आहे त्यानुसार होऊ शकतो.
याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहे ?
याचे सुरवातीचे लक्षणे नाही आहे, पण खालील लक्षणे दिसू शकतात:
- थकवा.
- अशक्तपणा.
- वारंवार संसर्ग होणे.
- ताप.
- निस्तेज त्वचा.
- श्वास घ्यायला त्रास होणे.
- रक्तस्त्राव होणे.
- हाडाचे दुखणे.
- वजन कमी होणे.
- भूक कमी होणे.
- त्वचेच्या खाली रक्तस्त्रावामुळे डाग दिसतात.
याचे मुख्य कारणे काय आहेत?
एमडीएस च्या कारणावरून ते खालील प्रकारात डिव्हाइड होते:
- प्राथमिक एमडीएस: कारण माहित नाही आहे. हा सर्वात सामान्य प्रकार आहे.
- द्वितीय एमडीएस: केमोथेरपी सारख्या उपचारामुळे हे होऊ शकते. याला उपचारा- संबंधित एमडीएस असेही म्हणतात.
एमडीएस हे अनुवांशिक नाही आणि कुटुंबामध्ये आढळत नाही, काही दुर्मिळ कारणामुळे, हे पालकांकडून मुलांकडे जाऊ शकते.
याचे निदान आणि उपचार काय आहे?
एमडीएस च्या निदानासाठी खालील टेस्ट करतात:
- रक्त चाचणी: ब्लड काउंट मध्ये बदल होणे आणि सामान्य आणि असामान्य सेल्स रक्तात सापडणे.
- बोन मॅरो चाचणी: लोकल बधिरीकरण करून सुई च्या मदतीने बोन मॅरो मिळवतात, आणि यात स्टेम सेल्स च्या कमतरतेची चाचणी करतात.
- सायटोजेनेटिक चाचणी: हे रोगाचे प्रकार ओळखायला मदत करतात.
साधारण आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी इतर चाचण्या जसे एक्स-रे आणि इलेकट्रोकार्डिओग्राम करतात.
नेमका उपचार करणे बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे जसे एमडीएस चे प्रकार, वय, साधारण आरोग्य, इत्यादी. एमडीएस च्या उपचारासाठी खालील पर्याय उपलब्ध आहे:
- केमोथेरपी: हे केमिकल उपचार पद्धती आहे जे बोन मॅरो मधील असामान्य सेल्स ची संख्या कमी करते.
- स्टेम सेल्स ट्रान्सप्लान्टेशन: स्टेम सेल्स डोनर कडून रुग्णाच्या बोन मॅरो मध्ये प्रत्यारोपीत केले जातात पण हे निवडक रुग्णांमध्येच होऊ शकते.
- औषधोपचार: यात विविध औधं येतात जसे इम्यून बुस्टर, बायोलॉजिकल मॉडीफायर, केमोथेरपी औषध, इत्यादी.
- सपोर्टिव्ह काळजी: जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी हे उपचाराचे आधारस्तंभ आहे.