लचक भरणे - Sprain in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

April 25, 2019

July 31, 2020

लचक भरणे
लचक भरणे

लचक भरणे काय आहे ?

लचक भरणे ही अशी स्थिती आहे जिथे लिगामेन्ट जे शरीरातील हाडांना एकमेकांसोबत जोडतात, ते शारीरिक क्रियेदरम्यान जास्त प्रमाणात ताणले जातात किंवा फाटतात. सर्वात सामान्यपणे हे टाचेवर परिणाम करतात, पण हे हाताच्या लिगामेन्टमध्ये सुद्धा होऊ शकते. असे सांगितले जाते की अमेरिकेत दर दिवशी लचक भरण्याची 30,000 प्रकरणे दिसून येतात.

त्याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत ?

मुख्य लक्षणांमध्ये समाविष्ट आहे :

  • प्रभावित भागाचा ओडिमा (सूज).
  • वेदना.
  • शरीरातील प्रभावित भाग हलवण्यास असमर्थता.
  • प्रभावित क्षेत्रात जखम (ब्रुसिंग).
  • प्रभावित भाग नाजूक झाल्यासारखा वाटणे.

लचक भरणे ग्रेडनुसार विभागले जाऊ शकते:

  • ग्रेड 1 सौम्य: भार सहन करू शकतो.
  • ग्रेड 2 मध्यम: लिंपिंग (टाचेत लचक भरण्याच्या बाबतीत).
  • ग्रेड 3 गंभीर: चालण्यात अक्षमता.

याची मुख्य कारणं काय आहेत ?

अस्थिबंधनावर (लिगमेंट्स) अनावश्यक अत्याधिक ताण सांध्यांना विस्थापित करू शकतो. यामुळे सांधे ताणले जाऊ शकतात किंवा त्यांचे नुकसान होऊ शकते. चालताना शरीराचा अयोग्य ढब या सारख्या क्रिया, चालताना किंवा धावतांना किंवा खाली पडल्याने टाच मुरगळणे यामुळे लचक भरू शकते. वारंवार गंभीर लचक भरल्याने लिगामेंट आणि सांध्यांना स्थायी नुकसान पोहोचू शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

रुग्णाला लचक भरण्याच्या कारणांबद्दल विचारणा करून मुख्य निदान केले जाते. इतर स्थितींपासून वेगळे करण्यासाठी डॉक्टर प्रभावित क्षेत्राची शारीरिक तपासणी करू शकतात. सौम्य पल्पेशन (स्पर्श व दाब यांच्या साहाय्याने परीक्षा करणे) लचकेचे निदान करण्यात देखील मदत करू शकते. प्रभावित क्षेत्राच्या क्रियांची श्रेणी देखील निरीक्षित केली जाऊ शकते. स्थिती तपासण्यासाठी इमेजिंग तंत्रांचा वापर जसे एक्स-रे, स्ट्रेस एक्स-रे, एमआरआय (MRI) स्कॅन आणि अल्ट्रासाऊंड केला जाऊ शकतो.

प्रभावित अंगांची हालचाल न करणे यावर लचकेचा उपचार लक्ष केंद्रित करतो. प्रभावित क्षेत्राला आराम देणे चांगले आहे; बर्फ वापरणे हे वेदनादायक प्रकरणांचे निराकरण करण्यात मदत करू शकते. प्रभावित क्षेत्राला गुंडाळून दाब दिल्याने त्याला अतिरिक्त आधार मिळू शकतो आणि सूज कमी करण्यात मदत होते. बऱ्याच बाबतीत गैर-शस्त्रक्रिया पद्धती सामान्यतः पुरेशी असतात. फिजियोथेरपीचा पूर्ण कोर्स संपूर्ण हालचाल आणि ताकद परत मिळवण्यासाठी मदत करू शकेल. वेदना मुक्त करण्यासाठी औषधे लक्षणांचे निराकरण करण्यात मदत करू शकते.

लचक ही व्यवस्थापित केले जाऊ शकते कारण योग्य काळजी घेतल्याने त्यात सुधारणा करता येते. प्रभावित क्षेत्राला न हलविल्याने आणि वरील उपायांचे अनुसरण केल्याने याचे त्वरित निराकरण होऊ शकते.

 



संदर्भ

  1. National Institute of Arthritirs and Musculoskeletal and Skin Disease. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Is there a test for sprains and strains?
  2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Sprains and Strains.
  3. Orthoinfo [internet]. American Academy of Orthopaedic Surgeons, Rosemont IL. Sprained Ankle.
  4. Hospital for Special Surgery [Internet]: New York, USA; Ankle Sprain Types and Treatments.
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Sprains.

लचक भरणे साठी औषधे

Medicines listed below are available for लचक भरणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.