सारांश
स्नायुदुखी बहुतेकदा स्नायू किंवा स्नायूंचे समूह अतीप्रमाणात वापरल्याने किंवा अती श्रम केल्याने होते, आणि हे एक व्यापक कारण आहे. स्नायूदुखी तीव्र किंवा दीर्घकालीन असू शकते. स्नायूदुखीची लक्षणे प्रामुख्याने स्नायुदुखीच्या कारणांवर अवलंबून असतात. स्नायुदुखीची सर्वसामान्य कारणे थकवा येणे, तणाव असणे, शरीराची ढब चुकीची असणे, दुखापत होणे आणि संसर्ग होणे ही आहेत. स्नायुदुखीचे सामान्यतः काही दिवसातच स्वतःहून निराकरण होते. तथापि, दीर्घकालीन स्नायुदुखीचे कारण अंतर्भूत अस्वस्थता असू शकते. रक्त तपासणी, इमेजिंग चाचण्या आणि शारीरिक तपासणी वापरून निदान केले जाऊ शकते. मुरगड आल्यामुळे आणि स्नायू ताणल्याने होणाऱ्या स्नायुदुखीवर, उष्ण गाद्यांनी शेकणे, विश्रांती घेणे यासारख्या घरगुती उपायांचा वापर करुन उपचार केला जाऊ शकतो. इतर उपचार पर्यायांमध्ये फिजिओथेरपी, वेदनाशामक औषधोपचार आणि शस्त्रक्रिया समाविष्ट आहे.