मोशन सिकनेस काय आहे?
मोशन सिकनेस हा प्रवास करतांना अचानक वाटणारी मळमळ किंवा उलट्या होणे होय. लहान मुले ,गर्भवती महिला, आणि काही विशिष्ट औषध घेणारे लोकांनां हे होऊ शकते. जेव्हा डोळ्यांच्या, कानाच्या, स्नायूंच्या आणि सांध्यांच्या मज्जातंतू कडून पाठवले जाणारे हालचालींचा सिग्नल मेंदूच्या सिग्नल सोबत जुळत नाही तेव्हा सेन्सेशन जाणवते.
याचे मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?
- मळमळ आणि उलट्या.
- पोट खराब होणे.
- डोके हलके वाटणे.
- घाम येणे.
- त्वचा निस्तेज होणे .
- डोकेदूखी.
गंभीर लक्षणे खालील प्रमाणे आहे
- शरीराचा तोल जाणे.
- चक्कर येणे
- तोंडातून लाळ गळणे.
- श्वास कमी होणे.
- आजारी वाटणे
याचे मुख्य कारणं काय आहेत?
जेव्हा मेंदूला कान, डोळे, स्नायू आणि सांध्या सारख्या ज्ञानेंद्रियांकडून विजोड सिग्नल मिळतात तेव्हा मोशन सिकनेस चे लक्षणे दिसतात. उदा. विमानात बसलेला व्यक्ती त्यातील गोंधळ पाहू शकत नाही पण शरीराला ते जाणवते. ह्या विजोड सिग्नल मूळे अस्वस्थता आणि मोशन सिकनेस होतो.
याची कारणे खालील प्रमाणे आहे;
- शारीरिक, दृश्य किंवा आभासी हालचाल.उदा. बोटीने, कारने, किंवा ट्रेनने प्रवास करणे.
- झोपेची कमतरता ह्या परिस्थितीत वाढ करू शकतात.
- अम्युजमेंन्ट राईड आणि बगीच्यातील खेळण्याची साधने मोशन सिकनेस वाढवू शकतात.
याचे निदान आणि उपचार काय आहे?
निदानासाठी खालील स्टेप्स दिल्या आहे:
- बऱ्याच केसेस मध्ये मोशन सिकनेस स्वतःच बरे होते.
- लक्षणावरून कारणाचा शोध घेतला जातो.
- प्रयोगशाळेतील चाचणीची काही गरज नाही.
- शारीरिक तपासणीत हालपीक मानोव्हर सारखी चाचणी मोशन सिकनेस ची खात्री करण्यासाठी केली जाते.
उपचारामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
- मळमळ कमी करण्यासाठी अद्रक चा तुकडा मदत करू शकतो.
- मोशन सिकनेस कमी करण्यासाठी स्कोपोलामीन, डायमेनहायड्रेट आणि मॅक्लीझिन सारखी औषधे दिली जाते.
खालील प्रतिबंधित उपाय घायचे सुचवले आहे:
- क्षितिजाकडे किंवा एकाच जागेवर असलेल्या वस्तूकडे अंतरावरून एकटक बघत राहणे, निग्रहाने बॅलन्स परत मिळवल्यामुळे आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी मदत मिळते त्यामुळे तोल सांभाळण्यात मदत होते आणि मोशन सिकनेस कमी होतो.
- प्रवास करतांना वाचणे किंवा विजेची उपकरणे वापरणे टाळावे.
- धूम्रपान, दारू, कॅफेन, उग्र वास, तेलकट आणि मसालेदार खाणे टाळावे.
- प्रवासाच्या आधी हलके जेवण घ्यावे.
- पाठ सरळ ठेवून डोळे बंद करून आणि मान सरळ स्थितीत ठेवून आरामदायक स्थितीत बसणे.
- कार चालवतांना च्यूविंग गम चघळल्याने सिकनेस कमी होते परंतू याचे कारण माहित नाही.