त्वचेचा कर्करोग - Skin Cancer (Melanoma) in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 25, 2019

March 06, 2020

त्वचेचा कर्करोग
त्वचेचा कर्करोग

त्वचेचा कर्करोग  काय आहे ?

त्वचेचा कर्करोग हा कर्करोग च्या प्रकारांमध्ये सगळ्यात कॉमन आहे. ही परिस्थिती त्वचेवर असामान्य  सेल्स च्या वाढीमुळे होते जे संपूर्ण शरीरात पसरण्यास सक्षम असतात . त्वचेचा कर्करोगाचे जर वेळेत निदान झाले तर याचा परिणामकारक उपचार होऊ शकतो.

याचे मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहे ?

त्वचेचा कर्करोग तीन भागात विभाजित होतो,  प्रत्येकाचे थोडेसे वेगळे लक्षणं आणि चिन्हं आहेत. तिन्ही प्रकारच्या त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण आणि चिन्ह खालील प्रमाणे आहेत:

  • बेसल सेल त्वचेचा कर्करोग - सगळ्यात कॉमन प्रकारचा त्वचेचा कर्करोग आहे, जे साधारणपणे लहान चमकदार किंवा अपारदर्शक पांढरा लम्प सारखा दिसतो.
  • स्क्वेमौस सेल त्वचेचा कर्करोग - खडबडीत पृष्ठभागासह गुलाबी लम्प दिसतो.
  • मेलॅनोमा - त्वचेच्या पृष्ठभागावर काळे डाग किंवा लम्प दिसतो.

हे लम्प किंवा ओरखडे सतत येत असतात आणि वेळेनुसार संपूर्ण शरीरावर यांची वाढ होते.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

त्वचेच्या  कर्करोग होण्याचे प्राथमिक कारण सूर्याच्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांमध्ये जास्त काळ संपर्कात राहणे आहे.

त्वचेचा कर्करोग कमजोर इम्यून सिस्टिम असलेल्या  लोकांमध्ये आणि ज्या लोकांची त्वचा लाईट किंवा गोरी असते, हे त्वचेच्या सेल्स मध्ये मेलॅनिन ची निर्मिती कमी झाल्यामुळे होते त्या लोकांना होऊ  शकते.

त्वचेचा कर्करोग होण्याचे इतर कारणे खालील प्रमाणे आहे:

  • जास्त प्रमाणात मस  असणे.
  • आधी त्वचेच्या कर्करोगाने प्रभावित असणे.
  • ठिपके असणारी त्वचा.

त्वचेच्या कर्करोगाचे साधारणपणे त्वचारोगतज्ञ् किंवा सामान्य डॉक्टर निदान करू शकतो.

जर रुग्ण त्वचेच्या कर्करोगाची लक्षणे दाखवत असेल तर त्याच्या निदानाच्या खात्रीसाठी बायोप्सी ही कॉमन चाचणी केली जाते. बेसल त्वचेच्या कर्करोगामध्ये , रोग किती पसरलेला आहे हे जाणून घेण्यासाठी पूढील चाचण्यांची गरज असते, तरीही, बाकी दोन प्रकारच्या कर्करोगामध्ये सुद्धा पुढील चाचणीची गरज असते. या चाचणीमध्ये फाईन नीडल ॲस्पिरेशन (एफएनए) चाचणी लिम्फ नोड वर कर्करोग किती पसरला आहे हे जाणून घेण्यासाठी केली जाते.

त्वचेच्या कर्करोगावरील उपचारावर मेलॅनोमा नसलेल्या त्वचेच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया न करता उपचार होऊ शकतो.यामध्ये क्रायोथेरपी, अँटीकॅन्सर क्रीम, फोटोडायनेमिक थेरपी, किंवा रेडिओथेरपी उपलब्ध आहे.

मेलॅनोमा त्वचेच्या कर्करोगामध्ये, सुरवातीचे उपचार हे नॉन मेलॅनोमा त्वचेच्या कर्करोगासारखेच आहे,  मेलॅनोमा त्वचेच्या कर्करोगाच्या पूढील प्रगत स्टेज ला प्रभावित त्वचेचे टिशू काढून नवीन टाकण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक आहे.



संदर्भ

  1. National Health Service [Internet] NHS inform; Scottish Government; Overview - Skin cancer (non-melanoma).
  2. American Cancer Society [Internet] Atlanta, Georgia, U.S; Skin Cancer Image Gallery.
  3. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Skin Cancer (Including Melanoma)—Patient Version.
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Skin Cancer.
  5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Skin Cancer.

त्वचेचा कर्करोग साठी औषधे

Medicines listed below are available for त्वचेचा कर्करोग. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Medicine Name

Price

₹41.8

Showing 1 to 0 of 1 entries